Skip to main content

संडे स्पेशल (पुडाच्या वड्या / बाकर वड्या)

लेखक स्वाती राजेश यांनी शनिवार, 15/03/2008 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुडाच्या वड्या: हिवाळ्यात कोथिंबीर स्वस्त मिळत असल्याने पुडाच्या वड्या घरोघरी केल्या जातात. ही चितळेच्या बाकरवडीची रेसिपी नसून कोल्हापुरी बाकरवडी आहे. साहित्यः कोथिंबीर ६ मोठ्या गड्ड्या (साधारण १/२ किलो) २-३ कांदे बारीक चिरलेले २ लसूण गड्डी २ इंच आले २ टे.स्पून धणे-जीरे पावडर ३/४ वाटी वाळलेल्या खोबर्‍याचा कीस २ टे.स्पून खसखस, तीळ प्रत्येकी २ टे.स्पून गोडा मसाला (काळा मसाला) २ टे.स्पून तिखट (चवीनुसार) १/४ टी.स्पून हिंग, हळद प्रत्येकी १ टी.स्पून साखर मीठ चवीनुसार तेल तळण्यासाठी ४ वाट्या बेसन १ वाटी मैदा १.प्रथम कोथिंबीर निवडून अदल्यादिवशी स्वच्छ धुवून कापडावर/पंचावर वाळवावी.
Taxonomy upgrade extras

आधुनिक दान

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 14/03/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
बरेचदा लोक मुंबईला समजण्यात चूक करतात. कोणाला ती भावनाशून्य वाटते कोणाला ती रूक्ष वाटते, कोणाला ती बाकीच्यांची पर्वा न करता सतत धावत राहणारी वाटते. पण हे मुंबईला आयुष्यातून १-२ वेळा वा कधीच भेट न देता केवळ चित्रपटातून मुंबईला पाहणार्‍यांचे मत झाले. खरी मुंबई वेगळीच आहे आणि ती वेळोवेळी स्वत:चे वेगळे दर्शन घडवते. एका लेखकाने तिचे अचूक वर्णन केले आहे. तो म्हणतो, मुंबईच्या रेल्वेत दारातले लोक तुम्हाला आत घुसू देणार नाहीत पण एकदा का तुम्ही आत शिरलात की हेच लोक तुम्ही दारातून खाली पडू नये म्हणून तुमचा तोल सावरतील. तुम्हाला दरवाज्यात उभे राह्यला बळ देतील.

लहरी राजा, प्रजा आंधळी...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 14/03/2008 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
खालील बातमी वाचून वरील शिर्षक आठवले... मुख्यमंत्री सहायता निधीचे तीन तेरा..! 14 Mar 2008, 1218 hrs IST मुंबई मटा ऑनलाइन प्रतिनिधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधला पैसा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या गरजू नागरिकांना दिला जात असावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा भ्रम आहे असेच समजा. २००३ ते २००५ या वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतले कोट्यवधी रूपये कबड्डी मॅच, महिला फुटबॉल मॅच, गझन संमेलन तसेच मराठी नटाच्या एका फॅन क्लबच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वाटला गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ती आली, तिने पाहिलं .. आणि तिने जिंकलं....

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 14/03/2008 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आमचं माहेर समस्त प्राणीमात्रांचं घर. समस्त प्राणीमात्रांचं याचा शब्दशः अर्थ सगळ्या प्राण्यांच्(पाळीव) आणि माणसांचं. म्हणजे घरात प्राणी हे हवेतच. कायम वस्तीला असलेले प्राणी म्हणजे २ कुत्री आणि १ मांजर आणि असलंच तर त्या मांजरीची पिल्लं. माझ्या लहानपणी आम्ही इचलकरंजी इथे डेक्कन कॉ.ऑप.मिल्स च्या क्वार्टर्स मध्ये रहात होतो. तिथले माझे बालपणीचे दिवस म्हणजे खरं सांगायचं तर सुवर्ण अक्षरात लिहावेत असे दिवस होते. एक घर आणि घराबाहेर बाग, त्या बागेत एक मोठे पायरी आंब्याचे झाड, एक मोठे फणसाचे झाड, सिताफळ,पपई आणि काही फुलांची झुडुपे... बाग छोटी असली तर मला खूप आवडायची.

विडंबन-गुत्त्याच्या रे उंबरठ्यावर आपण दोघे.

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 14/03/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा- आपण दोघे ही रुपेश देशमुख यांची गझल. कधी न संयमी, सदा अनावर आपण दोघे; गुत्त्याच्या रे उंबरठ्यावर आपण दोघे. तापवून रे उगाच डोके भांडण करतो; थंड ओततो सोडा त्यावर आपण दोघे. तेच तेच ते बोलत बसता उजाडते ही; एकमेका म्हणतो आवर; आपण दोघे. बिल आणतो कशास साकी; कुणी द्यायचे? शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे. जरी माहिती, कधी नशेला शेवट नाही; कधी तरी राहू भानावर आपण दोघे.

या दोन ओळी घ्या... पुढचे शेर लिहा........

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 14/03/2008 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
या दोन ओळी गेले खूप दिवस मनात घोळताहेत... मिपाकरांनी पुढचे शेर लिहावेत... ऐन प्रवाही नाव बुडू दे, भरकटू दे तारू हात सोडूनी गेला त्याला हाक नको मारु

विनोदाचा बादशाह - दादा कोंडके

लेखक शेखर यांनी शुक्रवार, 14/03/2008 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कोंडके हे बहुरंगी व्यक्तिमत्व माहित नसलेला माणूस उभ्या महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी चित्रपटास त्यांचे योगदान खुप मोठे आहे. प्रेक्षकांना नेमके काय हवे आहे याची चांगलीच जाण त्यांना होती. कमरेखालचे विनोद असे हिणावणारे सुद्धा त्यांचे चित्रपट मिटक्या मारत बघत / बघतात. 'अपना बझार' मध्ये काम करता करता दादा सेवादला कडे आकर्षित झाले. वसंत सबनीस लिखित नाटक 'विच्छा माझी पुरी करा' हा दादांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट. ह्याच नाटकाने दादांना ओळख दिली. दादांचे पितासमान गुरु बाबा उर्फ भालजी पेंढारकर यांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट. ह्या चित्रपटानंतर दादांनी कधीच मागे वळून बघितले नाही.

मजेशीर नावे

लेखक मनस्वी यांनी शुक्रवार, 14/03/2008 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
काल मित्राबरोबर गप्पा मारत असताना त्याने एक मजेशीर गोष्ट सांगितली. त्याच्या ओळखीत एक कुटुंब आहे त्यांच्या मुलांची नावे आहेत - थेंब आणि ठिपका आमचा ग्रुप १०-१५ मिनिटं हसतच सुटला. त्याला म्हणालो की टिंग्या सोडू नकोस म्हणून. पण तो म्हणाला टिंग्या नाही.. खरच आहेत. मग अशाच काहीच्या काही नावांवर चर्चा आणि खीखी - ख्याख्या सुरु झाली. तुम्हाला माहित आहेत का अशी मजेशीर नावे...?? मनस्वी

सगळ्याना ओपन चॅलेंज........र ला ट न जुळवता चारोळी

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 14/03/2008 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
केशवसुमार तात्या, डांबिसकाका, धमु, सगळे डॉन ,सगळे अभिजीत ,सॄष्टीलावण्य मावशी..सगळ्याना ओपन चॅलेंज र ला ट न जुळावता चारोळी लिहुन दाखवा?

प्रश्नच प्रश्न चहूकडे...

लेखक सृष्टीलावण्या यांनी शुक्रवार, 14/03/2008 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुळेकाठच्या एका दुकानात एक गिर्‍हाईक येते. दुकानदाराचे लक्ष नाही. गिर्‍हाईक घुटमळते. शेवटी आपल्या दुकानात चोर शिरला असावा अश्या दृष्टीने पाहून दुकानदार वसकन् त्याच्यावर ओरडतो, "क्वाय हवांय?" "अहो, असे अंगावर काय येताय?" "मग काय मुका घेऊ तुमचा?" गिर्‍हाईक ओशाळते. भीत भीत विचारते, "डिक्शनरी मिळेल काय?" "एक का हजार मिळतील, पोटमाळ्यावर हव्व्या तितक्या आहेत." "पण..." "पण नाही आणि परन्तु नाही, आमचा नोकर रजेवर आहे. समोरच्या पेण्टराच्या दुकानातून आणा शिडी आणि घ्या हवी ती शोधून आणि हो, अर्ध्या तासात खाली उतरा. आम्ही रात्री दुकान ८ च्या ठोक्याला दुकान बंद करतो.