Skip to main content

'सारे तुझ्यात आहे' आल्बमचा प्रकाशनसोहळा

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 21/03/2008 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
'सारे तुझ्यात आहे' या आल्बमच्या (ध्वनि तबकडीच्या - सीडी च्या) प्रकाशनाचा सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक मंडळात काल दि. २०-०३-२००८ रोजी पार पडला. सहा ते आठ अशी वेळ दिली होती. ठीक साडेसहाला म्हणजे भारतीय वेळेप्रमाणे बरोबर सुरू झाला. श्री. हेमंत बर्वे यांनी सुत्रसंचालनास सुरुवात केली. चुरचुरीत शैलीत मसुदा (स्क्रिप्ट) लिहिला होता. स्वागतकाचे काम तबकडीचे निर्माते आणि कवियित्री गीतकार जयश्रीताईचे पती श्री अविनाश अंबासकर यांनी भूषविले.

कविता सुचे कुणाला ...

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 21/03/2008 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा शांता शेळकेयांची सप्रतिम रचना काटा रुते कुणाला आणि चतुरंगशेठने केलेले सुरेख विडंबन 'बाटा' रुते.. कविता सुचे कुणाला आक्रंदतात कोणी मज स्फूट हे सुचावे हा कर्मभोग आहे ! सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? मजला विडंबनाचा पण शाप हाच आहे ! काही लिहू पहाता होतो अनर्थ तेथे प्रतिसाद सर्व येथे तिरपेच येत आहे ! हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना की ह्यात गुंतलेला परकीय हस्त आहे ?

वसंतागमनाचा पहिला दिवस नक्की कोणता?

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 21/03/2008 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीप्रमाणे (भूगोलाच्या पुस्तकात शिकल्यानुसार) २१ मार्च हा 'वसंतसंपात' दिन आहे. म्हणजे ह्या दिवशी सूर्य उत्तरायणातून प्रवास करताना संपात बिंदूतून जातो ह्या दिवशी १२ तासाचा दिवस आणि १२ तासाची रात्र असते. (असाच संपात योग पुन्हा 'शरदसंपात' म्हणून २१ (की २२?) सप्टेंबर रोजी असतो). तेव्हा २१ मार्च हाच वसंतागमनाचा प्रथम दिवस हवा. शंका घेण्याचे कारण असे की 'गूगल' संकेतस्थळावर आज (२० मार्च) 'फर्स्ट डे ऑफ स्प्रिंग' असे दाखविले आहे. तेव्हा जाणकारांनी अधिक विवेचन करावे ह्या हेतूने ही चर्चा.

'बाटा' रुते..

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 21/03/2008 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
कै.शांताबाई शेळक्यांची अप्रतिम रचना 'काटा रुते कुणाला' हे स्फूर्तिस्थान! 'बाटा' रुते कुणाला आक्रंदतात कोणी 'अनवाणि' ही चलावे हा 'पुण्य'योग आहे! सांगू कसा कुणाला सल 'आतल्या खिळ्याचा'? चिरकाल 'योजनेचा' मज शाप हाच आहे! रस्ते करु पहाता रुजतोच 'अर्थ' तेथे कंत्राटि काम तेही विपरीत होत आहे! जन मूढ, बेरकी का, 'नेते'च ते कळेना 'कर'भार वाढवोनी मी रिक्तहस्त आहे! चतुरंग

बोले हो बॉस कुणाला (विडंबन गीत), काटा रूते कुणाला (मूळ गीत)

लेखक प्रा सुरेश खेडकर यांनी गुरुवार, 20/03/2008 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
बोले हो बॉस कुणाला,आक्रंदतात कोणी मज प्यूनने बोलावे, हा दैवयोग आहे. सांगा देऊ कोणाला,ऑर्डर ही हाफ चहाची अन् ग्लास ही पाण्याचा,मी उठून घेत आहे. स्टेनोस वदू पाहतो,घडतो अनर्थ तेथे पार्ट्यांचा खर्च माझा,सगळाच वेस्ट आहे. मज ना प्रमोशन देती,ना इंक्रीमेंट काही आयुष्य ओघळोनि,मी कारकुनची आहे. ============================================ प्रा.सुरेश खेडकर ( झेंडूची फुले परंपरा) http://www.orkut.com/CommMsgPost.aspx?cmm=28868095

Is the US economy heading for a collapse?

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 20/03/2008 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
Is the US economy heading for a collapse? वाचा या इथे http://www.rediff.com/money/2008/mar/20mrv.htm आय टी चे काय होणार्...अन त्यापेक्षाही यु एस चा इतीहास आहे की जेंव्हा जेंव्हा असे काही होते आहे असे वाटले तेंव्हा यु एस ने स्वतः कोठेतरी युद्ध सुरु केले आहे........

अथांग सागर

लेखक सुवर्णमयी यांनी गुरुवार, 20/03/2008 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
अथांग सागर येती लाटा सागराच्या स्पंदनाची आगळीशी देहबोली फेनफुले खळाळत नभाकडे झेपावली गतीमान जसा जसा सागराचा श्वास होई ऊर त्याचा फेसाळत खाली वर झेप घेई भावनांच्या आवेगाने क्षणक्षण उचंबळे थरथरले वाळूचे कण कण इवलाले नभातल्या चंद्रामुळे खुळी चांदणी जाहली मिठीमध्ये किनाऱ्याच्या फेनफुले विसावली एकामागे एक येते खळाळत लाट लाट लपाछपीमध्ये होते दिनरात नि पहाट थांग लागेना अजुनी माणसाला मानसाचा मन अथांग सागर खळाळणाऱ्या लाटांचा!

गावातली होळी

लेखक भोचक यांनी गुरुवार, 20/03/2008 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
होळी आठवली की मला माझं लहानपण आठवतं. माझं गाव आठवतं नि होळीची मजाही आठवते. गावात मध्यावर आमचं दुकान. या दुकानाच्या समोरचा रस्ता खालच्या आळीकडे जाणारा. या रस्त्याच्या तोंडावरच आमची होळी असायची. गावात होळीची मजा दिवाळीपेक्षाही जास्त असायची. कारण फटाके उडविण्यातली मजा गावात तेव्हा खरोखरच नव्हती. होळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची. होळीच्या आजूबाजूला सगळी मच्छी विक्रेत्यांची दुकानं होती. मच्छी बोंबिल यांचा वास घेत घेतच होळीच्या जागेची सफाई सुरू होत असे. आणि त्यानंतर होळी खोदली जायची.

मिपाकरांच्या कट्ट्याला शुभेच्छा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 20/03/2008 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, येत्या शनिवारी मिसळपावकरांचा पहिलावहिला कट्टा पुण्यात साजरा होतो आहे, ही मिसळपावच्या दृष्टीने आणि मला वैयक्तिकरित्या खूप खूप आनंद देणारी गोष्ट आहे. गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मिसळपाव डॉट कॉम सुरू झाले आणि आजमितीस मिसळपाव इथपर्यंत वाटचाल करू शकले, याचे सर्व श्रेय केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांनाच जाते! मंडळी, अहो शेवटी तुम्हीआम्ही सर्वजण संगणकाच्या, आंतरजालाच्या या आभासी दुनियेतली माणसं!