मुक्त
आभाळातून बरसून ही
पानावरच्या दवासम अस्तित्व
मिसळायच नाही वाहायच नाही..
अनाहूतपणे भेटून ही
स्वप्नांचा कापसासम स्पर्श
बांधून नाही हूरहूर नाही..
भेटीची ओढ असूनही
अनवट वाटेसम गूढ
टाळणार नाही विसरणार नाही..
काव्यरस
जाधवगड,जेजुरी व मयुरेश्वर एक धावती भेट
बरोब्बर एक वर्षांपूर्वी म्हणजे १४ फेब्रुवारीला मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने मोरगावला जाणे झाले होते. लग्नाची वेळ थोडी वेगळीच होती. ना सकाळचा ना संध्याकाळचा असा दुपारी ४ वाजून ११ मिनिटांचा मुहूर्त होता. मुंबईहून गाडीने साडे तीन चार तासात पोहचणे शक्य होते. पण असाही संपूर्ण दिवस तर जाणारच होता म्हणून आमच्याबरोबर येणाऱ्या स्नेह्यांशी चर्चा करून सकाळी लवकरच निघून वाटेत जमेल ती ठिकाणे बघत मोरगावला पोहचायचे ठरवले.
मार्ग ठरला नवी मुंबई-पुणे-सासवड-जाधवगड-जेजुरी-मोरगाव व रात्री परत माघारी.
वाजवा रे वाजवा
वाजवा रे वाजवा.
'आता सावध सावधान समयो' लग्नात शेवटचे मंगलाष्टक सुरू होते ."वाजंत्री बहु गलबला न करणे"ही ओळ सुरू झाली की बाहेर उभे असलेले बॅंडवाले सज्ज होतात.भटजींनी "शुभमंगल सावधान"म्हटले, की बॅंडचा दणदणाट सुरू होतो.बहुतेक वेळा,कानठळ्या बसवणारा, असह्य होणारा ; क्वचित सुरेल स्वरांची,मधुर गाण्याची रिमझिम करडणारा .वाजंत्री कसेही असोत;पूर्वीतरी, लग्नकार्यात बॅंड अनिवार्य वअत्यावश्यक असे.लग्नाच्या आधीचे दिवशी नवर देवाकडचे लोक (वर्हाड) येतात,तेव्हा त्यांचे स्वागतासाठी बॅंड तयार हवाअसे.नाही तर त्यातल्या काही लोकांना तो अपमान वाटे.त्यांचे स्वागत, वाजत गाजत होणे आवश्यक असे.
कण
नदीच्या प्रवाहात दोन अनोळखी आणि दूरचे दगड एकमेकांना भेटावेत तशी माणसांच्या समुद्रातील आपली भेट. जिथे भेटलो तिथेच नदीचा सागर झाला. निदान आपल्यापुरते तरी नवीन दगडांवर आदळणे थांबले. पूर्वी आधार शोधणारे हात आता एकमेकांच्या आधाराला सज्ज होते. माणसांची स्वयंभू नदी तशीच वाहत होती. मनाला वाटलं तेव्हा आपणही प्रवाहात पुन्हा मिसळायचो, पण आता आवडत्या वळणावर क्षणभर विश्रांती घेताना प्रवाहाच्या मागे पडायची फिकीर नसायची. मातीत रुजलेल्या बी सारखा मी तुझ्यातून अंकुरत होतो. ना मला वाढायचं होतं ना फळाफुलांनी बहरण्याची आस होती. धरतीतून उगवलेला अंकुर आकाशाच्या ओढीनेच वाढत असतो.
मिसळपाव
