Skip to main content

आमार बांगला सोनार बांगला

लेखक भोचक यांनी शनिवार, 10/05/2008 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत. मराठी मन मात्र या विषयावर विभागले गेल्यासारखे दिसते. वर्तमानपत्रातील प्रतिक्रिया, ब्लॉग्ज यावरून ते दिसतेय. पण बंगाली लोकांचा भाषाभिमान याविषयी एक चांगला लेख येथे वाचला. मला तो आवडला आणि पटलाही. http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/mumbai/0805/10/1080…

संगणक उद् बोध

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 10/05/2008 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्री गणेशायः नमः नारद म्हणे नर्ड मुनीवर शंका अजाणांच्या करा दूर सोपे करून सांगा सत्वर संगणकाचे गूढ नारदा भक्तीभावे श्रवण कर संगणक महान अवतार आला कराया जगाचा उद्धार नर्ड म्हणे सांगी जनास रे वसतो साता समुद्रापार बाल फाटक ऋषी थोर उघडली विश्वात घरोघर सुक्षमृदू गवाक्षे संगणकी गवाक्षामधून घडते विश्वाचे दर्शन शोधुन काढी महाज्ञान गुगल ऋषींच्या कृपेने उघडी गवाक्षे एकामागे एक वेगळे रूप धरी प्रत्येक करी कामे झणी कित्येक मानव जणू बहुमेंदूंचा जे मूढ आधाशी होती अमाप खिडक्या उघडती खचीत संगणका लोळवती कोसती फाटक ऋषीला फुका जगी पसरले संगणक जाल जोडून
Taxonomy upgrade extras

दह्या वर भागवावे ते असे !

लेखक मुन्गी यांनी शनिवार, 10/05/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक दूधवाला भय्या दही घेउन बेस्ट बस मधे चढ्तो (त्याच्या साइकली ची कुणितरी अगदी 'मनसे' लावलेली असते) बस मधे खुप गर्दी असते पण पुढे एक जागा रिकामी दिसते , तर तो तिथे जाउन बसतो , त्याला माहीत नसते कि ती ज़ागा महिलांसाठी राखीव आहे . पुढ्च्या स्टाप ला काही बायका बस पकडतात , पुढे येतात अन त्याला म्ह्ण्तात - बाई : " ओ भय्या उठो , ये ज़ागा हमारी है , हम महिलाए हैं " भय्या : " अरे बेहेनजी , ठीक है आप महिलाए हैं लेकिन हम भी तो दही लाये हैं " ~X(
Taxonomy upgrade extras

एक नीरीक्शन

लेखक नन्या यांनी शनिवार, 10/05/2008 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी नन्या, बरेच वेळा मीपा ला, पाहुणा आसतो. पण नीरीक्शन असे की, सकाळी सदस्य बरेच पण पाहुणे कमी, दुपारी पाहुणे बरेच, सदस्य कमी. असे का?

शाकाहार :- काही नवीन पैलु

लेखक मन यांनी शनिवार, 10/05/2008 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला. ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही. मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय. मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते. जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी. जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी. माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः- १.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंव

रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?

लेखक ईश्वरी यांनी शनिवार, 10/05/2008 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या.

दुसरी संधी

लेखक मुक्तसुनीत यांनी शनिवार, 10/05/2008 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रात्री पडल्यापडल्या झोपायच्या काही क्षण आधी सरलेल्या वर्षांचा आढावा मनात नकळत घेतला जात होता. सतत बदलत असणार्‍या आपल्या आयुष्यातल्या चढउताराकडे पाहताना प्रश्न पडत होता : बापरे , तोच का मी हा ? हेही झाले आपल्याबाबतीत , नाही का ? "कहां कहां से गुजर गये" या सारखे विचार येत होते. सर्वच गोष्टी काही काळवंडून टाकणार्‍या नव्हत्या. काही आनंदाचे क्षण होते , काही चिमूटभर यशाचे , काही रोमांचक प्रसंगही. झोप लागता लागता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली : "लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" - अर्थात "दुसर्‍यांदा मिळणारी संधी हाच तुमच्या आमच्या आयुष्याचा स्थायिभाव आहे".

विडंबन

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 10/05/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल

फक्त मी नावास कर्ता शेष आता
बायको ही लांडगा मी मेष आता

केस पिकले, दात पडले, भिंग सजले
केव्हढा बदलून गेला वेष आता

म्हैस ही बसते, पुन्हा उठतेच कोठे!!
आणि लाजेचा न उरला लेश आता

नाते ना 'ते' राहीले

लेखक भ्रमर यांनी शुक्रवार, 09/05/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले. कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते.
Taxonomy upgrade extras

मी गेल्यावर

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 09/05/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्