Skip to main content

तुलना नको!

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 01/03/2021 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक वेगळा विचार मांडणारा लेख इथे देतो आहे. वेगळा अशासाठी की काही लोक अमुक तमुक मिळाले नाही म्हणून निराश होतात,हव्या त्या प्रमाणात मिळाले नाही म्हणून निराश होतात,चिडतात. अशा वेळी काही लोक सल्ला देतात. "त्या अमुक तमुक व्यक्तीकडे बघ.त्याला तर तुझ्यापेक्षा कमी सुविधा मिळाल्या तरीही तो बघ तुझ्या पेक्षा जास्त यशस्वी झाला." किंवा याच्या उलट "तो तमुक व्यक्ती बघ.त्याच्या तुलनेत तुझं बरं चाललंय.कशाला काळजी करतोस उगाच?" हे दोन्ही सल्ले तुलना करण्यास सुचवतात.ही तुलना करणे चुकीचे का आहे हेच सांगणारा हा छोटासा उद्बोधक लेख. तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल?

भाषा : बोली आणि प्रमाण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/03/2021 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (दिनांक २१ फेब्रुवारी ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने मुंबईच्या सामना वृत्तपत्राच्या रविवार ‘उत्सव’ पुरवणीत दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ ला प्रकाशित झालेला निमंत्रित लेख आजच्या ब्लॉगवर.) : कोणत्या भाषेला प्रमाण वा कोणत्या भाषेला आपण बोली संबोधतो? एखादी बोली ही एखाद्या विशिष्ट प्रमाण भाषेशी संबंधीत असते की आपण शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, शासकीय, प्रांतिक (आणि जातीयसुध्दा) वगैरे भेद मान्य करत त्या त्या बोलींना त्या प्रदेशाच्या प्रमाण भाषेतील क्षेत्रिय घटक बोली ठरवून मोकळे होतो?

बाबा महाराज डोंबोलीकर आणि आर्थिक षडरिपू....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 01/03/2021 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख हा तद्दन फालतू असून, खूप विचार करत बसू नका. ज्यांच्या कडे, वेळ नसेल, त्यांनी लेख वाचायची तसदी घेतली नाही तरी चालेल, कारण, खालील लेखांत कुठलेही मौलिक ज्ञान नाही आणि काही मौलिक ज्ञान मिळाल्यास, तो योगायोग समजावा....सर्वज्ञ मंडळींनी, आपला मौलिक वेळ वाया घालवू नये, ही विनंती.... ------------------------------- हळद लागवड झाली आणि मी रिकामटेकडा झालो...

खोटं कsssधी बोलू नये!

लेखक आजी यांनी सोमवार, 01/03/2021 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात प्रत्येकजण खोटं बोलतोच. कधी न कधी. खूप वेळा. काहीजण तर नेहमीच खोटं बोलतात. मीही अनेकदा खोटं बोलले. लहानपणी तर बरेचदा. "अमुक अमुक कुणी केलं? तू केलंस का?" ह्या आई-वडिलांच्या, मोठ्या भावाच्या प्रश्नाला मी नेहमी,"मी नाही बाई, कुणास ठाऊक, मला काय माहीत?"अशी खोटी उत्तरे दिली आहेत. "दुधावरची साय कुणी खाल्ली?"-"मी नाही खाल्ली. "इथलं नेलकटर कुठाय?"-"मला काय माहीत?" "ह्या डब्यातला सुई दोरा कुठं गेला?"-"मी नाही घेतला. शप्पत. मला माहीत नाही." खोटं बोलणारेच जास्त शपथा घेतात. तशीच मीही वारंवार शपथ घ्यायची. लहानपण सरलं. तारुण्य आलं, तशी खोटं बोलण्याची कारणं बदलली.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 28/02/2021 19:50 या दिवशी प्रकाशित केले.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

४ ४ ४ ४ ४ ४ ४

तुझे चालणे दरवळून जाते.......

लेखक किरण कुमार यांनी रविवार, 28/02/2021 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाला कसा थांगपत्ता नाही कसे झाकले नभाला धुक्याने इथे अतृप्त सुर्य व्यक्त होतो जराशा कवडश्यातूनी मुक्याने ............ प्रवासा पुन्हा हाक अस्तित्व देते गंधीत मृदाचे तृणांचे शहारे इथे स्पर्श ओला निळ्या सागराचा गगनातूनी जणू थव्यांचे पहारे ............. इथे धुंद असते अशी शर्वरी की कुठे चांदणे विरघळून जाते किती बोलणे ते चमकत्या विजेचे तुझे चालणे मात्र दरवळून जाते .............. - किरण कुमार

रोनाल्ड रॉस, मलेरिया आणि भारत

लेखक मनस्विता यांनी रविवार, 28/02/2021 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरु झाला की मलेरियाची (हिवताप) साथ हमखास असते. एके ठिकाणी वाचलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी मलेरियामुळे १००० मृत्यू नोंदवले जातात. असा हा मलेरिया हजारो वर्षे जुना आजार मानला जातो. पूर्वी युरोप आणि अमेरिकेमध्येदेखील मलेरियाचा धुमाकूळ होता. असं म्हणतात की रोमन साम्राज्याचा पाडाव होण्यात काही अंशी मलेरिया हा आजार कारणीभूत होता.  पूर्वी असे मानले जायचे की मलेरियाची लागण पाणथळ किंवा दलदलीच्या ठिकाणाहून येणाऱ्या दूषित हवेमुळे होते. त्यामुळे त्याचे नाव mal (दूषित) aria (हवा) ह्या इटालियन शब्दावरून पडले.

शेवटचा अश्रू

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 27/02/2021 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.

शिक्षणाचे मानसशास्त्र: गोष्ट सांगत गणित शिकवा ... २

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 27/02/2021 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री कुणालाच नीट झोप लागली नाही. सायलीला नक्की काय करावे समजत नव्हतं. आई बाबांना सांगावे का? **************************************************************************** गोष्टीची सुरवात ... मागची पोस्टसाठी इथे टिचकी मारा. **************************************************************************** पण न विचारता दुसऱ्यांच्या घरात गेलीस कशाला म्हणून रागावले तर? आई बाबांचे रागवलेला चेहेरे स्वप्नात पाहुन सायली दचकून जागी होत होती.

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 27/02/2021 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! लॅटीन लिपीतून मराठी मजकूर लिहिणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! माझ्या फोनमधे मराठी/देवनागरी किबोर्ड इन्स्टॉल होत नाही, फोनमधे देवनागरीत कसं लिहायचं ते मला माहित नाही अशा थापा मारणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! फोनमधे देवनागरीत लिहायला फार वेळ लागतो म्हणणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! मित्र, छत्रपती हे शब्द 'मिञ', 'छञपती' असे टंकणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! 'हिंदी' शब्द मराठीत घुसवणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! आताच्या 'घडीची' सर्वात मोठी 'बातमी देणार्‍यांना' मराठी दिनाच्या शुभेच्छा! मराठीची लक्तरं करणार्‍या जाहिर