पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर.
झाला बुवा एकदाचा तो बहुप्रतीक्षित घटस्फोट!
किती ग वाट बघायची त्यासाठी?
किती वेळा देव पाण्यात ठेवायचे? (त्यांना सर्दी-पडसंच नव्हे, आताशा न्युमोनिया पण व्हायला लागला होता...)
त्याच्या `बाहेरख्याली'पणाबद्दल तिनं जाहीर संशय घ्यायला सुरवात केलीच होती. परदेशी माणसांबरोबरचं लफडंही चव्याट्यावर आण्लं होतं. तरी त्याला काही शुद्ध नव्हती. त्याचं वेगळंच गणित सुरू होतं. त्याला घरचं अन्न गोड लागेनासं झालं होतं. बायकोने भरवलेलं आधी जे अम्रुत लागायचं, ते आता कडू जहर लागायला लागलं होतं. तुला घटस्फोट घ्यायचा तर घे, मी `बाहेरख्याली'पणा सोडणार नाही, असंच त्याला सुचवायचं होतं.
मिसळपाव