एक चांगला पायंडा
प्राध्यापक जयंत नारळीकरांनी सुरू केलेली "आयुका" ही संस्था सगळ्यांनाच किमान ऐकूनतरी माहित असेल. तिथे खगोलशास्त्राचा अभ्यास चालतो हेही सुज्ञास सांगणे न लगे. तुम्हाला असं वाटत असेल की मी पुन्हा काहीतरी खगोलशास्त्राबद्दल लिहिणार असेन. नाही, या वेळेस मला वेगळ्याच विषयाकडे मिपाकरांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. आणि का प्रश्न आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असावा असं मला वाटतं.
आयुकामधे आत्ता विश्वरचनाशास्त्राबद्दल एक कॉन्फरन्स सुरु आहे. त्यासाठी एकूण मिळून जवळजवळ १५० लोक तरी पुण्यात येऊन जातील. यात अनेक परदेशी पाहुणेही आहेत.
मिसळपाव