Skip to main content

मराठी पुस्तकाचं प्रकाशन

लेखक बी टी गॉडवीट यांनी बुधवार, 01/10/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी छंद म्हणून लघुकथा लिहितो. यातील काही वेगवेगळ्या मासिकांमधून वेळोवेळी प्रसिद्धही झाल्या आहेत. या कथांचे पुस्तक प्रकाशित करण्याची माझी इच्छा आहे. परंतू वेगवेगळ्या लोकांचे मराठी प्रकाशकांबद्दलचे अनुभव ऐकून प्रकाशकांचे दरवाजे ठोठावण्याची माझी इच्छाही नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. दुसरं म्हणजे मी कुणी प्रस्थापित लेखक नाही किंवा माझं पुस्तक कितपत खपेल याची आज काहीच खात्री नाही. त्यामुळे प्रकाशकाच्या दॄष्टिनं ही व्यावसायिक जोखीम आहे. त्यामुळे प्रकाशक यात रस घेणार नाहीत हे सहाजिक आहे.

आय्.एन्.टी

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी बुधवार, 01/10/2008 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुंबईच्या N.C.P.A. सभाग्रुहात आय्.एन्.टी ची अंतिम फेरी पार पडली पण राहुन राहुन एकच प्रश्ण मनात येत होता की आय्.एन्.टी चे परिक्शक खरोखर एव्हडे परिपुर्ण आहेत का........????????????????????? कारण दरवर्शी प्रमाणे यंदाही स्पर्धकानी आयोजकावर घेतलेले तोंडसुख दरवर्शी प्रमाणे यंदाही सावळ्या गोंधाळात ही स्पर्धा पार पडली तसेच स्पर्धकानी परिक्षकांवर पारर्शलिटीचे आरोप केलेत

शेवटची भेट!!!

लेखक क्षितिजा यांनी बुधवार, 01/10/2008 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज तुला शेवटची भेटायला आलेय. तुझ्या मैत्रीच्या सर्व आठवणींची आज मी समग्र मूर्ती झालेय. आज तुला शेवटची भेटायला आलेय. हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन. तुझ्याशी भेटण्याचं मनात आलं आणि तडक आलेय निघून. हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन. या नंतर असे येता येणार नाही. संसाराची गाडी ओढताना हे समजून घ्यावे लागेल तुलाही. या नंतर असे येता येणार नाही. मैत्रिणीची आठवण ठेवशील ना? दोघेही व्यवहारात रमल्यावर माझी विचारपूस करशील ना? मैत्रिणीची आठवण ठेवशील ना? ही माझ्या लग्नाची पत्रिका. चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका! ही माझ्या लग्नाची पत्रिका.

मी!!!

लेखक स्व यांनी बुधवार, 01/10/2008 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
व्यावहारिकदृष्ट्या बिनकामाच्या माहितीचा अफाट खजिना ......

ओढ परतीची

लेखक अनिरुध्द यांनी बुधवार, 01/10/2008 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
पाखराला ध्यास लागला दूर देशी जाण्याचा दुसरी माती, दुसरी नाती अनुभवण्याचा पाखरा जा दूर देशी मन त्याचे त्यालाच सांगे दे झुगारुन बंधन इथले नकोत काही पाश मागे उडोनी जाई पाखरु जाई ते दिगंतरा धडपड, खटपट पुन्हा नव्याने मांडण्या संसार सारा एकटेच ते सदैव आता नसे सोबत्यांचा मेळा आठव येई घरट्याची येई आता कंटाळा
Taxonomy upgrade extras

कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे

लेखक धनंजय यांनी बुधवार, 01/10/2008 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : पुढील लेख कल्पनिक नाही. अनुभवाचे वर्णन आहे. --------------------------------------------------------------------------------- एखाद्या रणरणत्या दुपारी काही निमित्त असतं, आपण एकटे चालत चाललो असतो. म्हणतो, "रस्ता रिकामा कसा? इतकीही काही उन्हं नाहीत..." तसं आपलं आपल्याला ठीकठाकच वाटतं. पोचायचं तिथे पोचल्यावर कोणीतरी गडूभर पाणी आपल्यासमोर ठेवतं. पाणी घशाखाली उतरताना अंगावर काटा येतो. मग कळतं की त्या घोटाकरिता जीव केवळ तडफडत होता. अशीच, पण याहून कितीतरी मोठी जाणीव मला वयाच्या पंचविसाव्या वर्षी झाली.

अळु-वालाची आंबट गोड रसभाजी

लेखक लवंगी यांनी बुधवार, 01/10/2008 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
आईची अजुन एक मला आवडणारी डिश .. साहित्य - ३ वाट्या सोललेले वाल, ६-७ काड्या भाजीच अळु बारीक चिरलेल, १ बारीक चिरलेला छोटा कांदा , तेल, मीठ, गुळ, चिंच मसाला - ४ पाकळ्या लसूण, १ काडी दालचिनी, ३ हिरव्या मिरच्या कृती - पातेल्यात ३ मोठे चमचे तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परता. कांदा शिजल्यावर अळु-वाल घालून चांगली वाफ आणावी. वाल शिजत आले की मीठ आणि वाटलेला मसाला घालावा. बोराएवढ्या चिंचेचा कोळ घालावा. थोडे पाणी घालावे. एक चांगली उकळी आणून त्यात थोडा गुळ घालावा. मंद आचेवर ५ मिनिट शिजवावे. ही भाजी आपल्या आवडी प्रमाणाने गोड तिखट आंबट करता येते. वरुन कोथिंबीर पेरावी.

सार्थक्..(एक मुक्त प्रवाह)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/10/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर.. ४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!:) पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??" अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत...

"काय करूं मी बोला,घरी बाळ ना पुन्हां"ललिताचं जीवशास्त्र

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 30/09/2008 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
"ते इवलंस मृत- शरिर माझ्या हातावर होतं,आणि माझ्या हाताच्या बोटांच्या टोकांवर त्याचं डोकं संभाळलं होतं आणि त्याचे इव्हलेशे कुल्हे माझ्या हाताच्या तळव्यावर सामावून गेले होते.मला त्यावेळी रडूं पण आवरंत नव्हतं.पण काय करणार?" गडकऱ्याना तिन मुली.त्यांची धाकटी मुलगी त्यामानाने हुषार होती.तिला पहिल्यापासून वैद्दकीय शास्त्राची आवड,आणि तिच्या मनासारखे परिक्षेत मार्कस मिळून ती कॉलेज मधून पहिली आली होती.गडकरी तिच्या बद्दल नेहमीच मोठ्या विश्वासाने बोलत असायचे.