दिवाळीतले चमत्कार-४
राणेंची लगीनघाई
----------
सकाळी सकाळी निवांत "प्रहार' वाचत बसलेल्या नारायण राणेंना नीलिमाताईंनी हलवलं.
""अहो उठल्या उठल्या पेपर काय वाचत बसलाय? चला, अंघोळ उरकून घ्या!''
""अगं, आज दिवाळीचा पहिला दिवस. कॉंग्रेसमध्ये आल्यावर माझ्या मुख्यमंत्रिपदाची सुद्धा ही पहिली दिवाळी. आणि तू अंघोळ वगैरे काय म्हणतेस? "अभ्यंगस्नान' म्हणावं! आणि "पेपर' काय म्हणतेस? "प्रहार' म्हणावं! काही फरक आहे की नाही?'' राणे जरासे चिडक्या स्वरात म्हणाले.
""अहो, इथपर्यंत पोचण्याआधी तुम्ही कुणाकुणाच्या नावानं अंघोळ करत होता ना, म्हणून तेच डोक्यात बसलंय.''
""असो. चला, आटपा लवकर. छान सुगंधी उटणं लावते. गरम पाणी काढून ठेवलंय.
मिसळपाव