Skip to main content

पयला पयला प्यार

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 28/10/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
बा लय खुश व्हता. खारीतली २५ गुंठ रोडटच जमीन ईकलीवती. तीस लाख आलते. मंगलवारी माजा १७ वा वाडदीवस. 'मिथन्या हिकड ये. हे झे तुज्या वाडदीवसाचे ' बा न बलीवल आन पाच हजार काडून दिल्लं मी सुसाटलो ९३२२ १७ ३३ १४ सूर्‍याला मोबाइल लावला. सूरेश म्हात्रे. माजा लंगोटीयार . ईतका लंगोटी क खारीन ऊतराचा आसल न माज्याकड लंगोटी नसल त त्याची लंगोटी घालाचू. 'सूर्‍या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.' सूर्‍या आला 'क रं बाला क बोल्तोस? 'आर बान मोप पैशे दिल्लन वाडदीवसाला. आपन बलीशेट कड बसू बीयर पीवाला.' 'तूजा वाडदीवस हाय ? वाडदीवस हाय ? मंग बलीशेटकड कनाला बसाचा ? आपन पनवेलला जावाचा.

स्ट्रॉबेरी जेली

लेखक वल्लरी यांनी मंगळवार, 28/10/2008 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : जिलेटिन 25 ग्रॅ. स्ट्रॉबेरी (साल काढलेली) दूध 1 कप, पिठीसाखर 50 ग्रॅ. व्हेनिला आइसक्रीम 200 ग्रॅ. घट्ट क्रीम 1/2 कप 4 स्ट्रॉबेरी सजविण्यासाठी. कृती : कोमट पाण्यात जिलेटिनला थोडावेळ ठेवावे (१०-१५ मिनिटे). स्ट्रॉबेरी, दूध, साखर,क्रीम आणि आइसक्रीमला मिक्सरमधून काढून घ्यावे. जिलेटीनला मंद आचेवर शिजवून घ्यावे. जेव्हा हे पूर्णपणे विरघळून जाईल तेव्हा मिल्कशेकच्या मिश्रणात जिलेटीन टाकून मिक्सरमधून काढावे. तयार मिश्रणाला ग्लासमध्ये टाकावे व फ्रीज मध्ये 2-3 तास सेट होण्यासाठी ठेवावे. वरून स्ट्रॉबेरीने सजवून सर्व्ह करावे.

लक्ष्मीपूजन

लेखक सनातन यांनी मंगळवार, 28/10/2008 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आश्‍विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते. या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. आज आपण लक्ष्मीपूजनासंदर्भात माहिती पाहूया. १.

येथे रोकडा भेटेल..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 28/10/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडळी, कसं वाटतंय मिपाचं मुखपृष्ठ? साला, इतर कुठल्या संस्थळाचं मुखपृष्ठ इतकं श्रीमंत आहे काय? हज्जार रुपिया अने काजू मिठाई, अने सुको मेवो! :) सू बोले छे? :) असो, हे लक्ष्मीपूजन सर्व मिपाकरांना मालामाल बनवो हीच शुभकामना...! :) मिपा व्यवस्थापनाकडून सर्वांना एक हजार सहाशे पंचाऐशी रुपये सप्रेम भेट! कृपया स्वीकार करावा! :) आपला, (पैसेवाला) तात्या.

`ब्लॉग माझा' विजेत्यांची यादी!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 27/10/2008 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
`स्टार माझा'नं अखेर वेबसाइटवर `ब्लॉग माझा'चा अधिक्रुत निकाल जाहीर केला आहे. एकदा शूटिंग रद्द झालं, आता बघू! या विषयावरची आधीची चर्चा : http://www.misalpav.com/node/3984

आठवण

लेखक अभिज्ञ यांनी सोमवार, 27/10/2008 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव करांच्या स्मृती प्रमाणे तात्या उर्फ विसोबा खेचर ह्यांनी ह्या दिवाळित रौशनी चे पुढील भाग द्यावयाचे कबूल केले होते. तरि संबधितांना त्याची आठवण करून द्यावी म्हणून हा खटाटोप. :)

निःशब्द होता सारा परिसर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 27/10/2008 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-रिझवी) जहाली असता अर्धी रात्र निःशब्द होता सारा परिसर दाहलेल्या मनाची ऐका रंजलेली ही नीतिकथा धुमसलेले उश्वास येती वणव्यातून चांदण्या सांगती डोळे मिचकावून लोळ हा धुराचा असेल आला धरतीवरून सांगुया ढगाना विझविण्या पाणी शिंपडून चंद्र सांगे चांदण्याना ऐकून हा कोलाहल नसे तसे काही जाहले त्या धरतीवर गोरगरीब बिचारे राहती त्यांच्या वस्तीवर घामाच्या दाहाने जाळ पेटती हृदयावर सांगती चांदण्या प्रवाही होण्या सागराला जलधारा ओसंडण्या सांगती त्या मेघाला सांगे चंद्रमा जेव्हा आग लागे हृदयाला अश्रूंच्या जलधारा विझवीती त्या आगीला श्रीकृष्ण सामंत

साध्‍वी प्रज्ञासिंह कोण?

लेखक विकी शिरपूरकर यांनी सोमवार, 27/10/2008 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीयच नव्‍हे तर विदेशी प्रसार माध्‍यमांमध्‍येही चर्चिले जाणारे नाव. आजवर ज्ञात असलेली पहिली संशयित हिंदू दहशतवादी महिला. कट्टर हिंदुत्‍ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्‍या चर्चेचा विषय ठरलीय ते मालेगावच्‍या स्‍फोटात संशयित आरोपी म्‍हणून. प्रखर राष्‍ट्रवादी विचार, शब्‍दांना असलेली धार आणि परखड वक्‍तृत्‍वशैली असलेली ही साध्‍वी.

राजला मारायला आलेल्या बिहारीचे एन्काउंटर

लेखक इनोबा म्हणे यांनी सोमवार, 27/10/2008 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
बातमी इथे वाचा. या घटनेनंतर सर्व बिहारी नेत्यांनी एकत्र येऊन पोलिसांचा निषेध केला आहे. लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधांनांची भेट घेउन या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. बिहारी नेते 'राहूल चांगला मुलगा होता,तो कोणी अतिरेकी नव्हता व त्याला पोलिसांनी विनाकारण मारले' असा कांगावा करीत आहेत. झी चोवीस तास या वाहीनीवर राहूल राज च्या पराक्रमाचा विडीओ दाखवला जात आहे. या विडिओमधे हा तरुण बसच्या खिडकीतून बाहेर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसतो आहे तरीही लालूप्रसाद हा मुलगा निर्दोष असल्याचे सांगत आहेत.

बापू सोनावणे..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/10/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन रेषेवरील, रेषेखालील, २००७-२००८ वगैरे वगैरे इत्यादी कुठल्याही अक्षरात मोडत नाही याची मला कल्पना आहे! आपल्याला नाय जमत बा तुमची ती रेषेवरची उभी की आडवी अक्षरे!