Skip to main content

अण्णांना मानवंदना..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 03/01/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांना मानवंदना..! इच्छुकांनी वरील संस्थळावर येऊन अण्णांना लेखी मानवंदना देण्याचे करावे.. राष्ट्रपतींच्या हस्ते अण्णांना भारतरत्न हा किताब मिळाल्यावर वरील मानवंदनांचे संकलन करून त्या पुस्तकरुपाने अण्णांना देण्याची सदर संस्थळ चालकांची योजना आहे.. आपला, (भीमसेनभक्त) तात्या.

माझे मन.....

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 03/01/2009 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता पूर्णपणे माझी नाही. कुठेतरी मी हिंदीत ही कविता अर्धवट एकलेली आहे पण त्या दिवशी दुपारी अचानक माझ्या गुणगूणण्यातून ही छोटी शी कविता तयार झाली.
Taxonomy upgrade extras

आजचे राशी भविष्य

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 03/01/2009 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपाकरांचे भविष्य कथन करण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. चू भू द्या घ्या) मेष आज आठवड्याचा पहिला दिवस. आज तूम्हाला महत्वाची कामे पूर्णत्वास न्यायची आहेत. आज कधी नाही ते बॉस ची बोलणी खावी लागणार नाहीत. कारण तो आज सुट्टीवर आहे. वृषभ दिवसाची सूरूवात छान होईल. (त्याचा कालच्या भांगेशी काही संबंध नाही). मन प्रसन्न ठेवा. जमल्यास काम करण्याचा प्रयत्न करा. महिलांना आजचा दिवस चांगला जाइल. पाकक्रियेत नवीन दृष्टांत लाभेल. त्याचा प्रयोग जोडीदारावर करण्यास कचरू नका. मिथून आजचा दिवस खर्चाचा.

तो माणूस भणंग होता

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 03/01/2009 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
निराधार माझे स्वत्व बुडवताना पाण्यातून उठला तो 'माझा'च तरंग होता . चित्रातला मी अर्थ शोधताना मज सापडला जो रंग तवंग होता . आरश्यात आपुला भाव पाहताना परि दिसला मज तो मनुष्य कबंध होता . पळभर मनी जगलो लाख मरताना जन म्हणतील तो माणूस भणंग होता
Taxonomy upgrade extras

शेवटच स्टेशन

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 03/01/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे गाडित खचाखच गर्दी होति.जिव गुदमरला होता.. एकदाची सुटली...१-२ स्टेशन वर थांबली.. काहि आत आले काहि बाहेर गेले...एका मुलान बसायला जागा दिली... आरामात बसलो,गाडिन वेग घेतला.गाडी लयात धावत होति.. खिडकीतुन गार वारा येत होता...कधि डोळा लागला कळाले नाहि..१ स्वप्न कि काय कळेना..एक घर दिसल,माझच होत.. बरेच लोक जमले होते,मित्र होते ,नातेवाइक होते. आत गेलो तर, हि कोप~यात रडत बसली दिसलेली,बायकांच्या घोळक्यात. काय प्रकार कळेना,जमीनिवर कुणीतरी झोपले होते.. नाका कानांत कापसाचे बोळे,अंग पांढ~या कपड्यान झाकलेल... त्यावर हार, गुलाल,जवळ जावुन पाहिल अन,हबकलोच तो मीच होतो..खाडकन जागा झालो..पाहिल तर गाडी थांबल

पनीर बटर मसाला

लेखक कोलबेर यांनी शनिवार, 03/01/2009 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
पनीर बटर मसाला माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर साहित्य : पनीर ४०० ग्रॅम क्रिम (हाफ ऍंड हाफ) १ टेबल स्पुन लोणी काजु पेस्ट (१०-१५ काजुंची) जिरे १ टी स्पुन तमालपत्र १-२ चवी पुरते मीठ १ चमचा साखर कश्मिरी लाल तिखट पावडर २ मोठे चमचे हळद चिमुटभर १ चमचा गरम मसाला मसाल्यासाठी : दालचिनी १ काडी, मिरे ८-१०, लवंग ५-६ १ मोठ्या कांद्याची पेस्ट टोमेटो प्युरी (३ टोमेटोची) आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट कृती : एका भांड्यात तेल तापवावे.

मी आलो.

लेखक रेझर रेमॉन यांनी शुक्रवार, 02/01/2009 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी आलो आणि नवी पृथ्वी, माझ्या पायी पसरली. मी आलो आणि नवा स्वर्ग माझ्या शीरी उतरला मी या पृथ्वीवर आलो आणि हा माझ्यासाठी शांत निवारा ठरला हे ग्रह-तार्‍यांच्या देवतांनो.... हा राजा तुम्हाला नम्रपणे आपल्या हॄदयाचा नजराणा अर्पण करतोय.