Skip to main content

असाच एक सुंदर दिवस

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 06/01/2009 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
तस पाहील तर समुद्राच आकर्षण अस मला फारस कधी जाणवलच नव्हत. कदाचित मुंबईचा बरबटलेला समुद्र किनारा आणि गलिच्छ पाणी त्याला कारणीभूत असेल. ती माणस वहावणारी गर्दी अगदी नकोशी वाटायची. मला बघून मुंबईचा समुद्रा केविलवाण हसायचा. म्हणायचा- तरूणपणी माझा रूबाब तू बघायला हवा होतास. किंवा कदाचित माझे गोव्या- कोकणातले भाऊबंद तरी बघायला हवेस तू. आणि असाच एक दिवस अचानकच कोकणात जाण्याचा योग आला. माझ्या आईच आजोळ वेंगूर्ल्याच, तिथेच जवळ उभ्यादांड्याला वडिलोपार्जीत घर. घर म्हणजे अगदी परीकथेच मॉडेल समोर ठेवूनच बांधलेल. समोरच सुंदर सुंदर झाड. आणि परसाच्या बाजूला समूद्र किनारा.

नाताळी बाजार

लेखक शाल्मली यांनी मंगळवार, 06/01/2009 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत आल्यापासूनच नाताळचा सण कसा साजरा होतो ते पाहण्याची उत्सुकता होती. नाताळ हा जर्मनीतील एक मुख्य सण. आपल्याकडे जशी दिवाळी तसाच इथे नाताळचा सण अतिशय आनंदात, उत्साहात आणि आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतात असे ऐकून होते. नाताळच्या आधीच्या चार रविवारी ऍडवेंट साजरे केले जात असल्याने साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच सगळीकडे सणाचे वातावरण होऊ लागले होते. बाहेर वातावरणात गुलाबी थंडी तर घराघरांत सर्वत्र झगमाट दिसू लागला. इथे प्रत्येक जण आपले घर सुशोभित करतो. आता घराघरांत दिव्यांच्या माळा आणि आकाशदिवे दिसू लागले. अनेकांनी बागेतली झाडे सुद्धा दिव्यांच्या माळा सोडून उजळवून टाकली.

अर्धांगीनि

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 06/01/2009 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिळता नजरेस नजर गोड्शी लाजलिस तु पुन्हा भेट झाली मधाळशी हसलिस तु, विचारता नाव तुझे किति बावरलीस तु नावाने मारता हाक किति खुललीस तु चुंबिता अधर तुझे पाकळी झालिस तु घेता मिठित तुजला रतिरुप झालीस तु शब्द माझे होते कविता झालिस तु शब्द संपले होते, मौनातुन संवाद्शी तु पुर्णत्व आले पौरुषत्वाला जशी अर्धांगीनि झालिस तु @Avinash

देव पावला!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 05/01/2009 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर महागड्या वस्तू वापरायची आपली लायकी नाही. दुसरं म्हणजे, लहानपणापासून कधी तशी सवय नाही. स्वस्तातल्या वस्तू घ्यायच्या, म्हणजे त्या संख्येनं जास्त घेता येतात, असेच बाळकडू. त्यामुळं आयुष्यात पहिल्यांदा, वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्याच पैशांनी सहाशे रुपयांची कॉटन पॅंट घेतली, तेव्हा केवढं अप्रूप वाटलं होतं मला स्वतःलाच! घड्याळं, पेनं, कुठलीच वरच्या श्रेणीतली गोष्ट घ्यायची सवय नव्हती. नाही म्हणायला, अलीकडे, विशेषतः लग्नानंतर बायकोच्या आग्रहाला, हट्टाला बळी पडून कधीमधी अशा खरेद्या करू लागलो होतो. नवीन घड्याळ घ्यायचं बरेच दिवस मनात होतं. पण पुढे ढकलत होतो.

मराठी भाषा

लेखक smartsagar यांनी सोमवार, 05/01/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कपडे घातले तरी हृदय अजून मराठी आहे तोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत. पिझा, बर्गर खाल्ल्यावरही पोट पुरणपोळीच मागतं ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी मन मराठी चारोळीच मागतं. मात्रुभूमि सोडली की आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं भाषा सोडली की अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं. वडाची झाडं मोठी होऊनही परत मात्रुभूमिकडे झुकतात कितीही दूर गेलं तरी पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात. काहीही बदललं तरी हृदय अजून मराठी आह॑. सागर देसाई ९४०३३६९७३४

मुड

लेखक शितल यांनी सोमवार, 05/01/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मुडी मिपाकर, मस्त पैकी मुड मध्ये येऊन, मी "मुड" बद्दल लिहित आहे. :) तर मुडी मिपाकरहो, या "मुड"चा महिमा अघाध आहे. जेव्हा पासुन आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणिव यायला लागते तेव्हा पासुन हा "मुड" आपल्या मध्ये शिरतो, तो आपला इहलोकी प्रवास संपल्यावरच तो जातो. :) लहान बाळ कधी खुप छान हसुन बोलक्या डोळ्यांतुन आपल्याशी हु, हु करत असते. काही तरी बोलत असते, स्वत:च्या विश्वात हरवुन स्वारी खेळत असते. तर कधी आपण त्याच्या ओळखीचे असलो तरी आपल्याकडे काही न बोलता गप पहात बसते. आपल्या कडे फारसे लक्ष न देता स्वत:च्या विचारात गढुन गेल्या सारखा चेहरा करून बसते.

हरीश्चंद्र्गड [१२-१४ डिसेंबर]

लेखक संताजी धनाजी यांनी सोमवार, 05/01/2009 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी नुकताच हरीश्चंद्र्गडावर जाऊन आलो. हा गड माळशेज घाटाजवळ आहे. खरेतर ह्या गडावर मी तिसर्र्‍यांदा जात आहे. परंतु ह्या वेळी तीन दिवसांचा ट्रेक केल्यामुळे गड नीट पाहता आला. खुप मजा आली :) ब्लॉगस्पॉट्वर ब्लॉगही लिहीला आहे. तो इथे वाचा. फक्त छायाचित्रे जूलै मध्ये रतनगडावर जाऊन आलो होतो. रतनगड भंडारदर्‍याजवळ आहे.