संवाद दोघींचा
ओ राणी सरकार उठा उठा ६. ३० वाजले !
ए थांब ना प्रगती ! झोपू दे ना ५ मिनिटे अजून !
अजिबात नाही या तुझ्या अशा आळशीपणामुळे आजकाल तुला आवरायला रोजच उशीर होतो आणि मग शेवटी गडबड करत नीट न आवरता तशीच जातेस. घाणेरडी
बरं बरं असू दे !
अगं असू दे काय राणी म्हणून मिरवतेस ना ? आम्ही तुझ्या मैत्रिणी बर्या म्हणायच्या तुझ्यापेक्षा
हो बाई .बास कर तुझी वटवट. जाते मी आवरायला !
राणी आजचा दिवस लक्षात आहे ना ?
का गं?
आज आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस असतो !
कुणाचा ?
अग विसरलीस ? इंद्रायणीचा गं !
हो खरंच की ! बर झालं आठवण केलीस ते . नाहीतर रोजच्या सारखं लोणावळ्याला फक्त वडापाव घेऊन निघालो असतो दोघी.
मिसळपाव