Skip to main content

तर...

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 11/05/2021 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
मळभ हटले की सूर्य सापडतोच असं नाही. तोवर रात्रही झालेली असू शकते. प्रकाश वाट्याला आला की तो मनाप्रमाणे नसतो उधळायचा. आपलं मन म्हणजे खोल गुहा- उभी की आडवी ते नाही माहीत. कदाचित दोन्हींच मिश्रण असावं. त्यामुळेच तर कधी खूप खोलात गेल्यासारखं वाटतं तर कधी खूप मागे. कुठून आणायचा मग इतका सारा प्रकाश, स्वत:चं मन पादाक्रांत करायला? बरं गुहेचं हे भारी असतं नाही- बाहेरून कितीही आग लागू देत, आतला अंधार अचल, अविरत आणि जवळपास अजिंक्य! म्हणून सूर्य माथ्यावर असला की डोक्यात अंधारात चाचपडायचं बळ आणि अनुभव दोन्ही गोळा करावा. ज्यांनी वचन दिलं नाही त्यांना गृहीत का धरावं? उद्या पृथ्वी फिरलीच नाही तर...

मध्ययुगीन इटाली तील वास्तु वैभव ..

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 11/05/2021 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
युरोपात बौद्ध्दिक पुनरुथ्थान व औधोगिक क्रान्तीचा काळ येण्यापूर्वी ५ ते ६ शतकांचा काल मध्ययुगीन काळ मानला जातो. या काळात तेथील अनेक देशात चर्चेस चे बान्धकाम राजाश्रयाने झाले जसे आपल्या देशात देवालयांचे बान्धकाम झाले . तथापि युरोपात राजा व प्रजा यान्च्या मधील एक " श्रीमन्त" लोकांचा गत होता .त्यानी केवळ धार्मिक बान्धकामे वा राजवाडे असे न करता गढ्या ,हवेल्या असेही बांधकाम केले. त्याकाळतही युरोपात मोठमोठे पूल नदीवर बान्धल्याचे दिसते. इटाली हा ऐतिहासिक व सांस्कृतिक रित्या जगातील एक महत्वाचा देश आहे.

आज जरी

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 11/05/2021 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रधगीने रातराणी उत्फुल्लपणे- परिमळेल तेव्हा व्याधविद्ध मृगशीर्ष जरासे मावळतीवर- ढळेल तेव्हा केतकीत नागीण निळी टाकून कात- सळसळेल तेव्हा नि:शब्दांची धून खोलवर रुजून ओठी- रुळेल तेव्हा वास्तवतळिचे अस्फुट अद्भुत कणाकणाने- कळेल तेव्हा... ....वीज शिरी कोसळली तरीही, सावरेन मी अद्भुत अवघे विरून, वास्तव क्षणोक्षणी मग- छळेल तेव्हा... ....आज जरी निष्पर्ण तरी बहरेन उद्या मी
काव्यरस

काही बोलायचे आहे ( विरसग्रहण)

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 11/05/2021 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही हाय का डेरिंग बोलायचं? डेरिंगच नाय तर कसा बोलशील. अन डेरिंग करुन बोललाच तर फुकाट जोड खाशीन याच भ्याव हाये ना. आन नको तोलु देवळाच्या दारात भक्ती. भक्तीत खोट निघाली तर चारचौघात खोटा पडशीन! माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही आरं ते प्लास्टिकच फूल हाये फुलाचा शेंट मारलेला डिट्टो फुलावानी दिसतय. मधमाशाबी फशीत्यात.
काव्यरस

जोडीदार

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 11/05/2021 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक सूचना - सध्याच्या काळात , नकारात्मक , कोरोनाची पार्श्वभूमी असलेलं लेखन वाचू नये असं वाटू शकतं . त्यांनी कृपया ही कथा वाचू नये . ---------- जोडीदार --------- रूमवर लोळत पडलो होतो. बाकीची पोरं लॉकडाऊनला कंटाळून घरी गेलेली . उन्हाळ्याची दुपार . गरमीने नुसता जीव चाललेला . वर पंखा नावालाच फिरत होता . वारंच लागत नव्हतं . एकटं पडल्यासारखं वाटत होतं . पश्याचा फोन आला . लय जुना रूममेट . त्याचं नाव स्क्रीनवर बघून जीवाला बरं वाटलं . आणि मग डोकं फिरलं !... त्याने एक निरोप दिलेला. त्याचा एक मावसभाऊ याच शहरात राहायचा. त्याची आई गेलेली . मदतीला कोणी नाही अन अशावेळी कोणी येतही नाही .

विनोद ...

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 11/05/2021 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या धाग्याचा उद्देश, फक्त हसणे आणि हसवणे, इतपतच आहे. मी वाचलेले काही विनोद देतो... -------------- "येथे हवा भरून मिळेल...!!" लेखक - डॉ. आर. डी. कुलकर्णी. काही वर्षापूर्वी माझ्या दवाखान्यात घडलेला मजेदार किस्सा. एक दिवस दुपारी दवाखाना बंद करण्याच्या वेळेला, साधारण मध्यमवयीन दिसणारा रुग्ण माझ्याकडे आला. त्याला अधून मधून चक्कर यायची असं त्यानं सांगितलं. तपासणी करत असताना त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारून मी त्याचा रक्तदाब पाहायला लागलो. तो जरा गोंधळल्यासारखा झाला आणि म्हणू लागला की “डाक्टर साहेब, मी लई गरीब माणूस हाये.

लाँकडाऊन

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 11/05/2021 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
विसाव्या शतकातील विसाव्या वर्षात लाँकडाऊन हा जुना सर्व सामान्यानां माहीती नसलेला शब्द प्रयोग बोलचालीचा झाला आणि घाटावरच्या " विसाव्या " चे वारंवार दर्शन घडवून गेला. आता "विसावा ", या शब्दाची एवढी भीती बसली आहे की चुकनही कोणी त्याचा उपयोग केला तर अंगावर काटे येतात. अशाच एका कडक लाँकडाऊन च्या दिवशी घरी बसुन कंटाळलो होतो म्हटंल चला जरा फेर फटका मारुन यावा. मी स्वताः बाहेर पडलो का नाही कारण मी बाहेर पडूच शकत नव्हतो. पडू म्हणले तरी घरी बायको, मुले काँलोनीतले मीत्र, सिक्युरिटी स्टाफ आणी रोड वर पोलिसांचा कडक बंदोबस्त.करोनाची भीती ती वेगळीच.......

गोष्ट एका सुजलाम सुफलाम जंगलाची

लेखक OBAMA80 यांनी सोमवार, 10/05/2021 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील प्राण्यांचा व घटनांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तिंशी व त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी संबंध नाही. यात वर्णिलेल्या घटनांचा जर सद्य किंवा भूतकाळातील घडलेल्या घटनांशी काही जरी संबंध आढळला तर तो किव्वळ योगायोग समजावा, ही नम्र विनंती) पूर्व, पश्चिम, उत्तर ते दक्षिण असे प्रचंड विस्तारलेले एक जंगल होत. गोड्या पाण्यांनी काठोकाठ भरलेली तळी, सुपीक जमीन, बारमाही वाहणार्‍या नद्या यांनी तो प्रदेश सुजलाम सुफलाम बनला होता. विविध प्रकारचे प्राणी त्यात गुण्यागोविंदाने रहात होते.

अपवाद

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 09/05/2021 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. आनंदाची अभिधाने आणि समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात.