बायबल-कारी.
प्रारंभी देवाने स्थलावकाश व समरभूमी निर्माण केली.
तेव्हा (समर)भूमी आय्डीविरहीत व शून्य होती, आंतरजालीय पृष्ठावर गांभीर्याचा अंधःकार होता आणि देवाचा आत्मा (आंतर)जालावर तळमळत राहिला होता.
तेव्हा देव बोलला, हास्यचैतन्याचा प्रकाश होवो आणि प्रकाश झाला !
देवाने हास्य-चैतन्य-प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने हास्यप्रकाश आणि प्रशासकी गांभीर्यांधार वेगळे केले.
देवाने हास्यप्रकाशाला दिवस आणि गांभीर्यांधाराला रात्र म्हण्टले ; हा पहिला दिवस.
मग देव म्हणाला, आंतरजालाच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते आंतरजालास (म्हणजे त्यातील लोकांस एकमेकांमधे) विभागणारे होवो.
मिसळपाव