Skip to main content

गेल्या सहस्त्रावधी वर्षांत हिंदुस्थानमध्ये लागलेल्या होळ्या!!

लेखक Sumant Juvekar यांनी गुरुवार, 27/05/2021 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या होळीला मला आठवल्या त्या राजपूत स्त्रियांनी केलेल्या जोहारच्या होळ्या पृथ्वीराज, संभाजी महाराज, राजा दाहीर यांनी केलेल्या सर्वस्वाच्या होळ्या, नंतर इंग्रजांबरोबर स्वातंत्र्ययुद्धात अनेक वीरांनी केलेल्या आपल्या संसाराच्या होळ्या. जन आला दिन होळीचा, उधळीत विविध हे रंग आसेतु-हिमाचल राष्ट्र, होलिका स्वागता दंग ! उत्साह खरोखर मोठा, पक्वान्ने घर घर बनती पण मज या हर्षोल्हासी, वेगळ्या होलिका स्मरती! भूपाल सिंध प्रांताचा, आठवतो मज दाहीर ज्याने पहिला या देशी, झेलला यावनी वार! कोणी न सहाय्या आला, आर्यावर्तातुनि वीर धन, दासी, पत्नी, कन्या, वृक लुटून गेले पार! (वृक=लांडगा) सिंधची जाहली होळी,

नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 27/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.

मृत्यूचा दंश

लेखक मार्गी यांनी बुधवार, 26/05/2021 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. सर्व जण कसे आहेत? सर्व जण आणि आपले जवळचे लोक ठीक असतील अशी आशा करतो. सध्याच्या दिवसांमध्ये आपण सर्व जण ज्यातून जात आहोत, त्या संदर्भात काही विचार शेअर करतो. सध्या आपण सतत मृत्युचा सामना करत आहोत. आपल्यापैकी अनेकांनी जवळचे लोक गमावले आहेत. आपल्यापैकी अनेकांनी मरणप्राय यातना सहन केल्या आहेत. आपल्याला शक्यतो कधीच मृत्यु हा डोळसपणे बघायला शिकवलं जात नाही. शक्यतो लहानपणापासून आपल्याला मृत्यु ही गोष्टच कळू दिली जात नाही. स्मशानसुद्धा गावाच्या बाहेर असतं आणि आपण हा विषय कधी आपल्या बोलण्यातही आणत नाही. पण डोळसपणे बघितलं तर कळतं की, मृत्यु ही शाश्वत गोष्ट आहे.

अर्धवट कागदे. - कथा

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 26/05/2021 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना - ही कथा पुर्णपणे काल्पनिक आहे.एकूण पाच भागात ही कथा प्रकाशित करण्याचा मानस आहे. त्यातील एक भाग आज प्रकाशित होत आहे. ---- माझ्या बदलीला आता फक्त एक आठवडा राहिला होता. अजून बरीच पॅकिंग राहिली होती. घरातला पसारासुद्धा काढायचा होता. आमची अडगळीची खोलीसुद्धा डोळ्याखालून घालायची होती. बराच पसारा होता त्या खोलीत. खोलीत गेलो आणि तिथले बाबांचे पुस्तकाचे शेल्फ स्वच्छ करत बसलो. एकाहून एक जाड पुस्तके तिथे कोंबून बसवली होती. त्यातली कित्येक पुस्तके वर्षानुवर्षे तिथेच पडली होती. त्यातल्या एका पुस्तकाची तर पानेही बाहेर निघत होती. ते पुस्तक नीट करायला मी ते बाहेर खेचले.

भाजलेले फेटा (ग्रीक , डोक्यवरचा नाही! ) + अँग्लोटि पास्ता

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 25/05/2021 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
भाजलेले फेटा + अँग्लोटि पास्ता साहित्य: नामक किंवा तत्सम पास्ता ( हे पास्टे कोरडे पास्ते नसून सारण भरलेले ताजे असतात ) कोरड्यापस्त्याप्रमनचे ते उकलूल शिजवून घेणे ( पाणी उकळताना थोडे तेल आणि मीठ घालावे ) आज मी जो पास्ता वापरला आहे तो पालक + रिकोटा चीज चा आहे - रिकोटा चीज हे साधारण चकय्या सारखे असते स्वतःला विशष अशी चव नसते - कोणी म्हणता पनीर सारखे ,, पण मला तरी तसे वाटतात नाही ) - रसाळ टोमॅटो ( देशी किंवा वेलीसकटचे असतील तर उत्तम किंवा छोटे असे चेरी टोमॅटो असतील तर चांगलेच - फेटा (शेळीच्या दुधाचे चीज ) हे चीज जरा कोरडे आणि खरात + नाम्बत असते त्यामुळे वेगळे मीठ किंवा आंबटपणा साठी का

गोष्ट सांगा गणित शिकवा... . १०

लेखक राजा वळसंगकर यांनी सोमवार, 24/05/2021 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला पाणबुडी चालवायची आहे का? ... **************** chart आत्ता पर्यंत: संध्याकाळी जेवणानंतर सगळं कसे मस्त वाटत होतं. तेव्हड्यात काकांनी आईस्क्रिमचा गुगली बॉल टाकलाच... स्कुप मधे आईस्क्रिम जास्त का सोफ्टी मध्ये? टीम पुणे त्रिकोणी ग्रहावर भ्रमण करीत होती. एरेटॉसथिनिस काका बरोबर ट्रिप वरून कालच परत आले होते... गोष्टीचा आधीचा भाग....

शाप

लेखक पाटिल यांनी सोमवार, 24/05/2021 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
नेटफ्लिक्स,ॲमेझॉन,सोशल मीडिया अन-इन्स्टॉल कर सगळं गच्च भरून गेलंय डोकं अजून किती कोंबशील वाचू नकोस काही अर्थ नसतो त्यात पुस्तकांचाही वैताग येण्याचे दिवस आणि व्हिस्कीचाही कंटाळा येण्याच्या रात्री सगळे स्वतःपासून पळण्याचे धंदे बंद करून घे चहुबाजूंनी कडेकोट मग स्वतःला कवटाळ व्हायचं ते होईल भेंचो कायकू डरताय ? साधी हुरहूर तर आहे तिला डरण्याचं वय आहे का हे? संध्याकाळी ग्रेसची प्रॅक्टिस कर, भय इथले संपत नाही वगैरे.. मग पाठोपाठ आत्मकरुणेचा महापूर मोठमोठ्ठे लोंढे येतायत दुथडी.. झेपणार नाही तुला.. पळ.. शेपूट घाल नेहमीसारखा गटांगळ्या खा ओरड..

कोरोनाच्या बातम्यांचा गोळीबार

लेखक chittmanthan.OOO यांनी सोमवार, 24/05/2021 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच बातम्या बघायला टीव्ही लावला तेवढ्यात ब्रेकिंग न्यूज आलीच, पिवळ्या बुरशीचा पहिला पेशंट सापडला. आता बुरशी पण मॅचिंग मधेच यायला लागल्या. काळी झाली पांढरी झाली आज पिवळी सापडली आणि एक 4 नवीन रंगात आली म्हणजे चांगला सप्तरंगी घोडा लागतोय माणसाला. ती काळी बुरशी डोळ्यावर मेंदूवर परिणाम करत्या पांढरी बाकीच 3-4 अवयव धरत्या आधीच कोरोना मूळ लोकांची गांड फाटल्या. सांगायला एक अवयव सुरक्षित नाही.निस्ता गोळीबार झालाय बघा. चॅनेल वाल्यांची तर पार स्पर्धा सुरू असत्या तू मोठा साप सोडतो का मी मोठा साप सोडतो.

अहं

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 23/05/2021 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. तर काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य.

चोर आले तर ? ( बालकथा )

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 23/05/2021 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
चोर आले तर ? ( बालकथा ) ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- विजूने डोक्यावरचं पांघरूण बाजूला केलं ,तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते . त्याचा विश्वासच बसेना. कारण एवढा वेळ काका त्याला काही झोपू देत नसत . ' मग काका ? ' आईने हाक मारली " उठला का विजूराजा ? " “ हो आई . काका कुठे आहेत गं ? " काकू आईबरोबर होती . तिला हसू आलं. ती म्हणाली , “ विजूराजा , आज तुझी मज्जा ! काका आणि बाबा गेले आहेत दुसऱ्या गावाला. पण काकांनी तुला अभ्यास दिलाय बरं .” विजूचं घर शेतात होतं. ते सगळे एकत्र रहायचे .