भाजलेले फेटा + अँग्लोटि पास्ता
साहित्य:
नामक किंवा तत्सम पास्ता ( हे पास्टे कोरडे पास्ते नसून सारण भरलेले ताजे असतात ) कोरड्यापस्त्याप्रमनचे ते उकलूल शिजवून घेणे ( पाणी उकळताना थोडे तेल आणि मीठ घालावे ) आज मी जो पास्ता वापरला आहे तो पालक + रिकोटा चीज चा आहे
- रिकोटा चीज हे साधारण चकय्या सारखे असते स्वतःला विशष अशी चव नसते - कोणी म्हणता पनीर सारखे ,, पण मला तरी तसे वाटतात नाही )
- रसाळ टोमॅटो ( देशी किंवा वेलीसकटचे असतील तर उत्तम किंवा छोटे असे चेरी टोमॅटो असतील तर चांगलेच
- फेटा (शेळीच्या दुधाचे चीज ) हे चीज जरा कोरडे आणि खरात + नाम्बत असते त्यामुळे वेगळे मीठ किंवा आंबटपणा साठी काही घालू नये
- ऑलिव्ह तेल
- बेल पेपर + हिरवी / तांबडी ढब्बू मिरची माध्यम काप
- चवीला लाल तिखट किंवा पाप्रिका , कोरडे इटालियन स्पायसेस , काली मिरी
- खायाची तुळशीची पाने ( बासिल ) + पार्सली
- "टेस्टी" किंवा मोझ्झरेल्ला
कृती:
पास्ता वर सांगितल्याप्रमाणे भरपूर पाण्यात शिजवून घयावा मनात थंड पाणी शोधून थोडे तेल लावून ठेवावा
- ओव्हन / केक भांड्यात खाली जाड टोमॅटो चे काप आणि इतर भाजपा पसरव्ययात + फेटा चीज चे तुकडे ऑलिव्ह + ऑलिव्ह तेल घालावे
( यात तुम्ही पेस्टो नामक चटणी पण घालू शकता ) आणि १८०-२०० अंश सेल्सियस वॉर साधारण २०-२५ ओव्हन मध्ये ठेवावे
- पास्ता एक ट्रे मध्ये पसरवूं त्याला थंडी पाप्रिका लावून घायवाई आणि अगदी थोडे मीठ
वाढणे:
प्रकार एक : वरील[पास्ता घेऊन त्यावर हे भाजलेली "इटालीय पावभाजी " पसरयावी"
प्रकार २ : वरील भाजी आधी चक्क पावभाजी सारखी ठेचून एकजीव करावी आणि मग दुसरी ट्रे मध्ये पासत्यावर पसरवून तवर थोडे "टेस्टी" किंवा मोझ्झरेल्ला चीज घालून "ग्रील " मध्ये भाजून घयावे
वरती कापलेले खायाची तुळशीची पाने ( बासिल ) + पार्सली भृभुरावी
भांड्यातील ऑलिव्ह तेल आणि रस शोषून भांडे साफ करण्यासाठी एखादा व्हिएन्ना पाव
बदल: पास्त्या ऐवजी आपण अर्धवट उकडलेले बटाट्याचे काप पण वापरू शकता


वाचने
8676
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
परत फोटुत गंडलो
प्रकाशित करण्यास आधी
In reply to परत फोटुत गंडलो by चौकस२१२
पूर्वादृष्य बघितलं परंतु
हा मदत धागा पहा...
In reply to पूर्वादृष्य बघितलं परंतु by चौकस२१२
पायरी ४.
या शेअरिंग लिंकस नाहीत.
(No subject)
मस्त