Skip to main content

रेसिपी हवी आहे!!

लेखक किट्टु यांनी बुधवार, 11/03/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
मला 'वांगी काप' कसे करतात त्याची रेसिपी हवी आहे. प्लीज कोणी मदत करेल का? 8>

लज्जत सुखाची

लेखक जयवी यांनी बुधवार, 11/03/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
लेवून तवंग सुखाचा आयुष्य बनतं गुळचट न अडचणींचे डोंगर आडवे न आशांचे किल्ले रासवट ऐश्वर्याच्या सरळसोट, उंचच उंच भिंती न कुठे अश्रूंचा कोनाडा, न कुठे दु:खाची पणती प्रकाशाची दारं उघडी सताड रात्रीचा अंधारही कुंपणाच्या पल्याड असतं आयुष्य असं बेचव आणि अळणी जरी पाऊस सुखाचा, तोंडात मिठाची गुळणी सुखाला हवी खरी, फोडणी खमंग दु:खाची हिंग थोडा चिंतेचा अन्‌ मोहरी हवी कष्टांची तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी सुखाची अशा मग लज्जतच न्यारी. जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

मनाच्या कुपितले - बराक ओबामा

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 11/03/2009 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा अकरावा लेख या सदरातील सर्व लेख तुम्ही येथे पाहु शकता.
बराक ओबामा - पासवर्ड फुटलाय.
बराक ओबामा, गेले वर्षभर अख्या जगभर ज्याची आणि फक्त ज्याचीच चर्चा चालू होती, ते हे व्यक्तिमत्व या काळात प्रत्येकाला या व्यक्तीबद्दल किती लिहू आणि किती नको असे झाले होते. पण, या व्यक्तीची संपूर्ण माहिती कुठेच मिळत नव्हती. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले गेले. पण, थोडक्यात योग्य माहिती मिळेल असं कोणतच साधन नव्हतं.

चालचलाऊ गीता

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 11/03/2009 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
:P आज अचानक श्री. ज. के. उपाध्ये यांची "चालचलाऊ गीता" ही खूप लहानपणी वाचलेली कविता सापडली. मिपाच्या सदस्यांना होळीच्या मेजवानीनिमित्त सादर! होळीच्या रंगीबेरंगी, रंगतदार, रंगीत शुभेच्छा! पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग लेकांनो! होऊनिया रोग | मराना का! लढाई का असते सोपी?
Taxonomy upgrade extras

काही मुक्तके

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 11/03/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
युद्धे रोज नवी युद्धे होतात, शस्त्रेही नवीच असतात, युद्धांची कारणे मात्र, अजुनही जुनीच असतात....! आरक्षण कितीही मोठे झालो तरी, पांगुळ गाडा सोडणार नाही, माणुस बनुन दोन पायावर, आम्ही कधीही चालणार नाही....! सबंध पोप प्रेमाचे पोवाडे गात आहेत संत शांतीचा संदेश देत आहेत शास्त्रज्ञ शस्त्रांची निर्मिती करत आहेत राजकारणी राजकारण करत आहेत आता तुम्ही मला सांगा... तुमचा, माझा याच्याशी , काय सबंध ?....!!!
Taxonomy upgrade extras

पिकले पान

लेखक मी गौरी यांनी बुधवार, 11/03/2009 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी गौरी.... मिपाची एक नवी सभासद.... रेखाटन हा माझा फावल्या वेळात जोपासलेला एक छंद. हे मी काढलेले असेच एक ..तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.

"न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर बहिरी आणि मुकी पण असते"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 11/03/2009 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसायानी मला त्यांच्या कॉलेजच्या प्रोफेसर असतानाच्या जीवनातली एक गंमतीदार पण हृदयस्पर्शी घटना सांगितली. प्रो.देसाई त्यावेळेला रुईया कॉलेजमधे नुकतेच ज्युनीअर लेक्चरर म्हणून कामाला लागले होते.ते मला म्हणाले, "न्यायदेवता नुसती आंधळीच नसते तर मुकी आणि बहिरीही असते.कसं ते ही माझी गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला कळेल. माझ्या फिझीकसच्या वर्गातली मुलं,मुली आणि मी गणपतीपुळ्याला सहलीसाठी गेलो होतो.गांवातल्या एका शाळेत आमचा मुक्काम होता.शाळांना त्यावेळी उन्हाळ्याची सुट्टी होती.गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा अप्रतिम दिसायचा.त्या दिवसात बर्‍याच लोकाना हा पिकनीक स्पॉट माहित नसल्याने परिसर फारच स्वच्छ होता.समुद