Skip to main content

शरद पवार भविश्यातील पंतप्रधान ? ?

लेखक हरकाम्या यांनी शनिवार, 14/03/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपले क्रुशीमंत्री आणि क्रिकेट बोर्डाचे अध्य्क्श श्री. शरद पवार ह्यांना सध्या पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागलेली आहेत. आणि त्यादिशेने त्यांची वाटचाल चालू आहे, हा माणूस अत्यंत हुशार आहे हे नक्की. कुठ्लेही पाउल टाकताना हा माणूस अत्यंत योजनाबध्द रीतिने टाकतो. समजा हा माणूस पंतप्रधान झाला तर काय होईल आणि त्यातल्यात्यात त्यांनी परराश्ट्र खाते त्यांनी संभाळले तर काय होईल हे सांगता येत नाही. पण आपला शेजारी ?? पाकिस्तान याची चांगलीच पंचाईत होईल. पाकी सत्ताधार्यांना कसे वागवे हेच समजणार नाही.

महाश्वेता

लेखक जृंभणश्वान यांनी शनिवार, 14/03/2009 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष झाले असेल मी पाल बघून. परवा पालीवर माझी नावडती मैत्रिण हा लेख वाचला आणि पालीची खूप आठवण आली - कसा मी रोज सकाळी उठून अर्ध्या झोपेत धडपडत धडपडत बेसिनपाशी जायचो आणी पालीला बघुन दचकायचो. नंतर आपली रोजची पालच आहे ते बघुन कसा सुखावायचो वगैर वगैरे सगळे आठवून दाटून कंठ आला एवढी आठवण आली की मग कविता करण्याशिवाय पर्याय नव्हता.
Taxonomy upgrade extras

"हजेरी" हे नाम आहे क्रियापद नाही.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 14/03/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
हजेरी म्हणजेच "असणं" काही "करणं" नाही. "असण्यावर" माझी श्रद्धा आहे.अलीकडेच मला ह्याची आठवण आली.त्याचं असं झालं की कोकणात त्यावर्षी खूप मोठं वादळ आलं होतं.नारळाची उंच उंच झाडं मुळासकट उन्मळून पडली होती.काही घरांची छप्परं उडून गेली होती.नळे, कौलं तुटून घरं उजाड झाली होती.

(सांगावा)

लेखक आंबोळी यांनी शनिवार, 14/03/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : क्रांति यांची जोगवा बरेच दिवसाच्या गॅप नंतर अचानक आलेला हा सांगावा गुरुवर्य केशवसुमार याना अर्पण ! नातेवाईकांच्या गावातून कुणी सांगावा धाडला? जीव पाखरू होऊन कुणाचा अभाळा भिडला वैशाखातल्या दुपारी असा घाला हा घातला ? काम धाम सोडा, चला टापशी गुंडाळा आला मैफलीला रंग , रडू हुंदक्याला भेटला अंतरात दु:खाचा असा उमाळा दाटला बुक्कागुलाल लाऊन दारी मुडदा डोलला देऊया खांदा त्याला आता लोकाना बोलवा झाकला लाकडानी बघा काडीही लावली जरा थांबा कवटी आता फुटेल आतली ======================= कंदीलसुमार.............. १४-०३-२००९

काही नोंदी, अशातशाच...

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 14/03/2009 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
शहाद्याहून धडगावच्या दिशेने एस.टी. निघाली. अंतर साधारण पासष्ठ किलोमीटरचे. त्यापैकी सुमारे चाळीस किलोमीटरचा रस्ता घाटाचाच. सातपुड्याचं पहिलं पूड चढून गेल्यानंतर काही काळात मोबाईलची रेंज जाते. त्यामुळं अगदी न कळतच माझी नजर मोबाईलच्या स्क्रीनवर गेली. बॅटरी पूर्ण होती. म्हणजे मोबाईल चालू-बंद असा करीत वापरला तर तीन दिवस त्याची साथ-सोबत होण्यास हरकत नव्हती. निश्चिंत होऊन मी बाहेर नजर वळवली. बसनं घाटाचा मध्य गाठला तेव्हा पुन्हा एकदा माझं लक्ष मोबाईलवर गेलं आणि चमकलो. मोबाईलची रेंज आली होती. अर्थातच, माझ्या सेवादात्याची नव्हे तर दुसऱ्याच सेवादात्याची. दोघंही खासगी क्षेत्रातीलच.

जोगवा

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 13/03/2009 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षत्रांच्या गावातून कुणी सांगावा धाडला? जीव पाखरू होऊन माझा आभाळा भिडला वैशाखातल्या दुपारी कुणी गारवा पेरला? मनी फुलोरा फुलला, रानी मयूर भारला आला मैफलीला रंग, ताल सुराला भेटला अन्तरात आनंदाचा असा उमाळा दाटला मोतिपोवळे माळून दारी प्राजक्त डोलला हळूवार गूज काही वारा कानात बोलला झाकोळल्या दृष्टीला या दिसे प्रकाश आतला माझ्या फाटक्या झोळीत असा जोगवा घातला
Taxonomy upgrade extras

माझी नावडती मैत्रिण

लेखक किट्टु यांनी शुक्रवार, 13/03/2009 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज पण मला आठवतं, तिची आणि माझी पहिली भेट... तिला पाहुन मी इतकी जोरात ओरडली होती, कि माझ्या दोन्ही रुम-पार्टनरस(रु-पा) पळत आल्या होत्या. तो दिवस तिचा आमच्या रुम मधला पहिला दिवस होता. आणि तेव्हा पासुन ती आमच्या रुम मधे तळ ठोकुन बसली. जा जा म्हंट्ल तरी बयेच जायच नाव नाही, सर्व करुन झालं होतं अगदी धक्का मारुन, हाकलुन.. पण ती नुसती निर्लज्ज.. हळुहळु तिला माहीत झालं होत की मला ती अजिबात आवडत नाही, मग काय मी जेव्हा एकटी रुम वर असणार तेव्हा त्या बाईसाहेब अगदी थांबल्याच पाहिजे.. ~X( हळुह्ळु मला तिची भिती कमी वाट्त होती पण ती मला कधी रुम मधे आवडलीच नाही.

आभार मिपा व मिपाकरांचे

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 13/03/2009 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव आणी मिपाकरांचे चे आभार कसे व्यक्त करु अस प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता आणी डोक्यात ही कल्पना आली. रुक्ष वाळवंटात जसा सापडावा अमृताचा झरा तशी मराठीची तृष्णा शमे मिसळपावच्या घरा मराठमोळ्या माणसांना फक्त मिपाचाच आधार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! काव्य, चर्चा, साहित्याचा अनमोल असा ठेवा संगे कौल,कलादालन आणी पाककृतींचा मेवा लहानथोरांसाठी हे मराठीचे अक्षय भांडार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! कोणी न वाटे इथे परके जरी आले कधी प्रतिसाद तिरके भावाबहिणीचे गोड भांडण, तसे एखाद्या काव्याचे विडंबन किती आपुलकी, जिव्हाळ्याची इथे बहार मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!! चुकुन कुठे कंपुबाजीची तक्रार, कधी तंट
Taxonomy upgrade extras

घोरपड

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 13/03/2009 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताच्या अंधारात प्रतिभेची घोरपड घेऊन सर करतेस प्रसिद्धीचा कोंढाणा गड आला पण घोरपडीचे काय? काही म्हणतात, घोरपड ही तर दंतकथा कोणी म्हणतं , ते तर प्रतीक, चिवट जीवननिष्ठेचे म्हणून सांभाळ गं आपापली असलेली आणि नसलेली घोरपड कारण किल्ले येतील आणि जातील पण तेवत राहील , फुलत राहील मनामनात ... एक घोरपड
Taxonomy upgrade extras