शाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही?
शाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही?
ही २० मिनिटांची फित मुलांच्या क्रियेटीव्हीटी क्षमतेबद्द्ल अनेक चांगले मुद्दे मांडते. ज्या खुस्खुशीत लयीने श्री.
प्रतिक्षा.... !
प्रतिक्षा.....!
प्रतिक्षेत सखे तुझ्या.. कसे मन.. सैरभैर झाले....
ओठांवर मग.. तव विरहाचे.. आर्त गीत उमटले...
नकळत होई भास पुन्हा ग... तव स्पर्शाचा क्षणोक्षणी....
मंद चंदनी गंध तुझा मज... लावी पिसे ग.. मनोमनी..
आतुर तव भेटीला नभ.. मृग थेंब बनुनी बिलगले..
ओठांवर मग ....... [१]
वाटे मजला सौधामध्ये... असशील बहुधा तु अजुनी...
वळूनी बघता होई हसे.. मज चंद्र खुणावे..तो गगनी...
त्या बिंबातुन तव प्रतिमेचे... रुप निशी प्रकटले...
ओठांवर मग .......[२]
रेशीमस्पर्शी मीठीत तुझीया...वाटे मज मी.. स्वर्गी असे..
तुझ्या नि माझ्या प्रीतिचे गे... सुंदर घरकुल मनी वसे..
परि ना कळले..
Taxonomy upgrade extras
सूर भैरवीचे
मज छेडती अवेळी ते सूर भैरवीचे
करती अगम्य खेळी ते सूर भैरवीचे
भिजुनी तुझ्या स्मृतिंनी माझ्या मनात ओली
ती रात्र पावसाळी अन् सूर भैरवीचे
भुलवून या मनाला मज दूर दूर नेती
हलकेच सांजवेळी ते सूर भैरवीचे
माझ्या मनातली मी गीते दिली तरीही
गाती तुझ्याच ओळी ते सूर भैरवीचे
स्वप्नात साद देते मज पैलतिरी इवले
घर एक चंद्रमौळी अन् सूर भैरवीचे
घननीळ सावळ्याची ती पावरी घुमावी
श्रवणात अंतकाळी, जणु सूर भैरवीचे
Taxonomy upgrade extras
(सगळ्यांसाठी..)
अवलिया साहेबांच्या गंभीर कवितेमुळे काही सुचेनासे झाले मग हा गंभीर्पणा दुर करण्यासाठीच हे विडंबन
अवलिया साहेब.
वारा
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स............
हाय, मी वारा
मला ओळखले नाही, हा कसे ओळखणार बरे! बरेच दिवस भेटच नाही आपली. अहो तुम्ही ५ वर्षाने आलेल्या राजकारण्याला ओळखू शकत नाही तसे मला तरी कसे ओळखणार... अगोदर मी अदृश्य त्यात मी काय कोणत्या पोस्टर वरून वगैरे पण दर्शन देत नाही त्यामुळे मला ओळखायचा प्रश्न येत नाही,....................... हा आता बघा आता ओळखलंत ना , हा एवढे बोचत आहे म्हटल्यावर ओळखणारच. हा तोच तो तुम्हाला बोचणारा मी वारा.. काय पण दिवस आलेत मला माझी ओळख सांगायला तुम्हाला त्रास द्यावा लागतोय..
खंत
बोलली नाहीस कधी
न सांगताच पण काही
मज उमजली होती सखे
तगमग अलवार तूझी
मिटल्यास पापण्या तू
पण रुद्ध डोळ्यांमधली
मज जाणवली होती
आतुरता व्याकुळ तूझी
मिटलेल्या ओष्ठकळ्या
कबुलणार नाहीस तू
सखे ओळखली होती
मुग्ध हळवी प्रीत तूझी
वृंदावन डोळ्यांमधले
तू गं राधा कृष्णमयी
गोकुळात विरघली होती
मुक नि:शब्द वेदना तूझी
विषप्याला अमृत झाला
श्यामखुळी तू वेडी मीरा
कृष्णात मिसळली होती
स्निग्ध शांत चेतना तूझी
मज कळली नाही कशी
खुण आपल्या नात्याची
सखे मीच हरवली होती
धुंद ओढाळ मुरली माझी
विशाल
प्रादेशिक पक्षांचे पीक आवरण्यासाठी
देशात गेल्या काही वर्षांत प्रादेशिक पक्षांचे वाढते वर्चस्व राष्ट्रीय पातळीवर फार अडचणीचे ठरत आहे. लोकसभेसारख्या राष्ट्रीय निवडणुकीत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरून हे पक्ष राष्ट्रीय पक्षांवर मात करून लोकसभेत पोहोचत आहेत. बरे लोकसभेत येऊनही ही मंडळी ज्या मुद्यांवर निवडून आली, ते सोडवितात असेही नाही. पण ते मुद्दे उपस्थित करून हंगामा करण्याचे काम मात्र करतात. (याचा अर्थ ते मुद्दे महत्त्वाचे नसतात, असे नाही.)
५४३ सदस्यांच्या आपल्या लोकसभेत बहूमताचा जादुई आकडा गाठण्याच्या नादात या पक्ष्यांना भलतेच महत्त्व येऊन घोडेबाजार तेजीत येतो. मग एक दोन खासदार असलेल्या पक्षांनाही 'भाव' येतो.
तर या देशात कायदा आणि सुव्यव्स्तेची हामी कोणी द्यायाही
IPL ला सुरक्षा देण्याचा विषय सध्या गाजतोय काहिच्या मते हे राजकारण आहे
पण देशामधे सरकार सुरक्षेची हमी देत नाही हे गंभीर बाब आहे. election म्हणजे काय युद्ध नव्हे.
१) युधाची परिस्तिती अतिरेक्यानी निर्माण केली आहे अशी कबुलीच सरकार ने दिली नाही काय?
२) केंद्र सरकार आणी राज्य सरकार सुरक्षेची हमी द्यायला तयार नाहीत तर कायदा आणि सुरक्षेची हमी कोणी द्यायची?
३) खर सांगायची तर अशी सुरक्षा मागायची व द्यायची वेळ येते यातच कायदा व्यवस्था मोद्लीये असे नाही वाटत काय ?
मिसळपाव