Skip to main content

मन

लेखक जागु यांनी सोमवार, 30/03/2009 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मन... हलक्याश्या फुंकरीने दूर उडणारं दिशाहीन कुठेही भरकटत जाणारं स्वप्नाच्या देहात जगणारं वास्तव्याच्या खडकावर वसणारं ! मन... तप्त निखार्‍यातून पेट घेणारं दूर क्षितीजाला जाऊन भिडणारं सागराच्या लाटांवर फेसाळणारं कधी उंच सिंहासनावर बसणारं! मन... प्रितीच्या पाझरात चिंब भिजणारं भावनांच्या प्रवाहात वाहून जाणारं स्वतःशीच कुजबूजत राहणारं हलकेच बिनस्पर्शी चुंबणारं ! मन... स्वतःच अस्तित्व नसणारं !
Taxonomy upgrade extras

सावळा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 30/03/2009 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याची तनु सावळी सावळीच सावली का न मी झाले सावळी ? राधा खंतावली सावळ्याच्या मुरलीसवे सुर ही सावळे 'काय माझे झाले असे हे' राधेला ना कळे गंधावली गवळण वेडी रास सावळा खेळी सावळ्याची प्रीत मनी अन सावळा जळी स्थळी पैलतीरी सावली सावळी राधिके साद घाली गेली वेडावुनी गोपिका बासरी धुंदावली प्रीत सावळी, भाव सावळा श्याम तो सावळा सुखाची चाहुल सावळी जग राधे सावळा विशाल.

ओसाड राजमार्ग

लेखक जयवी यांनी सोमवार, 30/03/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
सोपं जगायची सवय झाली की .... कठीण उत्तरं नकोशी होतात थोडीशी बेरीज, वजाबाकी करुन उत्तरं कशीबशी जुळवता येतात. उगाच ती क्लिष्ट आकडेमोड कशाला सापडतोच कुठला तरी वशिला चढ उतार नकोच असतात आडवळणं मग शोधली जातात तीच वाट दाखवतो पुढच्या पिढीला नकळत आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत मिरवत जातो दिमाखात त्याच मार्गावरुन खरी वाट सोयिस्करपणे विसरुन सवयी त्याच अंगवळणी पडतात आणि खरे राजमार्ग ओसाड पडतात. जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

मनाच्या कुपितले - स्टेज आणि मी

लेखक विनायक पाचलग यांनी सोमवार, 30/03/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपितले या सदरातला हा पंधरावा आणि अंतिम लेख
मी आणि स्टेज
(माझा आत्तापर्यंत झालेला स्टेजप्रवास) तशी अंगात स्टेजवर जावुन बडबडायची होउस दांडगी ,त्यामुळे दिसली स्पर्धा की घे भाग अस नेहमीच व्ह्यायच(नंबर यायचा नाही हा भाग सोडा,पण बोंबलायचो)अगदी बालवाडी पासुन .तेव्हाचे फोटो अजुन आहेत, आता ते पाहिल्यावर माझे मलाच हसु येते पण चालायचेच स्वतःवर हसण्यात जी मजा असते ती दुसर्‍याला हसण्यात नाही हे मात्र खरे ..असो , तर असे करत मी ४थीत आलो ,आणि कधी नव्हे ते मला शाळेसमोर भाषण करायची संधी मिळाली विषय होता ल

<<----देवानं तोतया कवींना असं का बनवलं---->>

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 29/03/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
उस्फुर्त प्रेरणा देवानं तोतया कवींना असं का बनवलं? ऊठ सुट येता जाता काहीही लिहाव सगळेच स्वतःला कलाकार समजतात पण मिपाकरांनीच का ते वाचाव? प्रतिसादासाठी गळे काढावे, कधी कंपुबाजी म्हणुन नाचावे प्रत्येक विडंबन म्हणजे पाणचटपणावर फोडणी दळभद्री मणभर खीर, कुणाला पचलीच नाही पण तोतया कवींच्या राजालाच का बरं खुमखुमी! कुणी झोपेत कविता लिहितं कुणी नाइलाजानं कवी बनतं कुणी शब्द चोरुन कविता पाडत असते. अशा कवितांपेक्षा विडंबनांना जास्त चव नसते? कुणी "लिहू नका' सुचवू पाहतं क्वचित कुणी थेट हल्ला करतं कारण खर्‍या कवी कवियित्रींचे कवीपण ह्या गर्दीत कुठेत
Taxonomy upgrade extras

आई! नको वध करू माझा!

लेखक उमेश कोठीकर यांनी रविवार, 29/03/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
गे आई! नको वध करू माझा तुझ्याच या चिमण्या जीवाचा आकांत तुझ्याच उदरी तुला पाहवेल का ग माझा? मातृत्व तुझे मिळावे म्हणूनी मी देवाकडे हट्ट धरिला जन्मत:च माझा मृत्यूदिन तू का ग ठरविला? मुलगी म्हणूनी दु:स्वास का ग?
Taxonomy upgrade extras

आय.सी.यू.---एक अनुभव,एक चिंतन!

लेखक वैशाली हसमनीस यांनी रविवार, 29/03/2009 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
इंटेंसिव्ह केअर युनिट हे शब्दच फार अवघड आणि बोजड वाटतात नाही ? हे शब्द नुसते उच्चारले तरी सामान्य माणसाची छाती धडधडते,श्वास कोंडल्यासारखा वाटतो,उर धपापतो आणि उदगार निघतात,'अरे,बापरे,सिरियस कां ?'तर अश्या ह्या आय.सी.यू.मध्ये मी तीनवेळा जाऊन १०-१५ दिवस माझ्या धडधड्त्या हर्‍दयासहीत घालविले आहेत आणि तरीही त्यावर कांही लिहीण्याइतपत मी आज बरी आहे.

गुलाम!

लेखक उमेश कोठीकर यांनी रविवार, 29/03/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा जन्म दु:ख माझे अष्ट्पुत्रा! शाप माझे! माझा कळप पुरुषी येथे स्थान काय तुझे? तुझे अर्थार्जन माझे तुझे प्रजनन माझे श्वास घे तू जगण्यापुरते मात्र नियंत्रण माझे! संतती! पौरूष माझे कन्यादान पुण्य माझे! घरा येता अवकळा मग पांढरे पाय तुझे! असो पोकळ पौरूष कर पूजन तू माझे तुझ्या अस्तित्वी पहारा तुझ्या मागे नाव माझे! तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! मंगळसूत्र! चिन्ह माझे! बाळग जाणिवेचे ओझे! ताट वाढ आधी मला जे उरेल ते तुझे! तू लक्ष्मी? धन माझे जे जे तुझे ते ते माझे चल!
Taxonomy upgrade extras