थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'
थोरांची ओळख
जालिंदर जलालाबादी :
या सदरामधून आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कामगिरीची ओळख करून देणे, हा उद्देश आहे.
जालिंदर जलालाबादी हे साठच्या दशकात लिहायला सुरुवात केलेले महत्त्वाचे विद्रोही कवी आणि लेखक. पुढे त्यांनी जगभर विशेषत: अफ़्रिकेमध्ये मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा फ़डकावत ठेवला.
त्यांचे कुटुंब मूळचे अफ़गाणिस्तानचे... फ़ाळणीमध्ये त्यांचे कुटुंबीय पळून भारतात आले...त्यांची अफ़ूची शेती होती.जगभर पसरलेला व्यापार होता. पण पुढे कुटुंबीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर जालिंदरजींचा जन्म झाला.
दास
या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा
आप, तेज, वायु, धरा, सार्यांतच भास तुझा
तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा
नाम तुझे मुखी राहो, ध्यानी मनी वास तुझा
अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा
कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा
नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा
मनमोहन, यदुनंदन, यमुनातटी रास तुझा
तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा
देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा
माझी ही कविता आमच्या मुंबईहून प्रसिद्ध होणा-या कार्यालयीन अंकात {संचारिका २००७=०८} मध्ये पूर्व प्रकाशित झाली आहे.
`पद्मश्री'चा सन्मान...कित्ती छान!
अक्षयकुमारला "पद्मश्री' सन्मान झाला, तेव्हा कोण टीका झाली होती! पुरस्काराला काही किंमतच उरली नाही, कुणालाही देतात, वशिलेबाजीचा जमाना आहे, वगैरे वगैरे! 31 मार्चला हा पुरस्कार प्रदानही झाला. अक्षयनं त्याच्या आदल्याच दिवशी आपल्याला मिळालेला सन्मान किती योग्य होता, हे सिद्ध करून दाखवलं.
मुंबईच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये अक्षय रॅम्पवर चालला.मिसळपावची जडण घडण !
आपलं मिसळपाव वापरायला जास्तीत जास्त सोप्पं आणि सुरेख करण्याचं ठरलेलं आहे. ह्या कामात मिसळपाववर भरभरून प्रेम करणार्या मिपाकरांना या धाग्यावर मिसळपाव बद्दल अपेक्षा, बदल आणि वेगवेगळ्या संरचना सुचवण्याबद्दल आवाहण करीत आहोत.
मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं? ते अधीक चांगलं कसं करता येईल?
मिसळपाव. कॉमवर पहिल्यांदा आल्यावर तुम्हाला काय आवडलं नाही? ते बरोबर कसं करता येईल?
मिसळपाव. कॉमवर नोंदणी करतांना काय अडचणी जाणवल्या? त्यात काही बदल सुचवायचे आहेत का?
रोजच्या काळात मिसळपाववर वावरतांना काय अश्या बाबी आहेत की ज्या अधीक चांगल्या केल्या गेल्या पाहिजेत?
कॉनफिकर - १ एप्रिलचा महा-झटका !
कॉनफिकर हा एक वायरस असून ह्यांने आता पर्यंत १ करोड वीस लाखाच्या वर संगणकांवर हल्ला केला आहे, ह्याला अश्या पध्दतीने कोड केला गेला आहे की हा स्वतःच १ एप्रिल ला कार्यरत होतो व आपले काम चालू करतो, अजून पर्यंत हे कळाले नाही आहे की हा कार्य कसे करतो डायरेक्ट हल्ला करतो की हळू हळू करतो हे अजून समजले नाही आहे,
हा आपल्या संगणकावर पुर्ण ताबा मिळवतो व आपल्या सर्वर वरुन आलेल्या आदेशांचे ( कमांन्डचे) पालन करतो. ह्याचा उद्देश तुमच्या संगणकाला त्रास देण व तुमची गोपनिय माहीती चोरणे ह्यासाठी केला जातो / जात आहे.
गाडीच्या गाडीवाना...
गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली माळराना S S S
तुज्या गाडीचा गा बैल
बैलापाठी नक्षाची झुल
तुज्या गाडीचं गा चाक
चाक धावतया एकटाक
गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली माळराना S S S
तुज्या बैलाच्या गळ्यात चाळ
चाळ वाजत्यात खुळखुळ
तुज्या कपाळाचा गा घाम
घाम देतोया दाम
गाडीच्या गाडीवाना
गाडी चालली माळराना S S S
Taxonomy upgrade extras
मिसळपाव