शब्द
वाटते तुझ्यावर काही लिहावे
मनातील भावनांना कागदावर निरखावे
न्याहाळताना तुला, तंद्रित जावे
सहवासी तुझ्या वाहवून यावे.
शब्द शब्दांना जुळवून घ्यावे
सुगंधी रचनी तुला हुंगावे
शाईतून तुझे प्रेम पाझरावे.
मखमली लालीत तुला पसरावे.
वाचताना तुज ओठ हसावे
डोळ्यांतून भाव पाझरावे
दाखवताना तुज हे शब्द
तुझ्या ओठचा शब्द व्हावे.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव