Skip to main content

मिपाच्यावरी पंगती रंगलेल्या...

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 08/04/2009 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पिवळा डांबिस यांची पंगत -२ मिपाच्यावरी पंगती रंगलेल्या... यलोनॉटि हा काढतो खूप खोड्या... मिपाकर असे वाचुनि तृप्त झाले... प्रतिसाद त्या देवुनि बोळविले... (पंगतीत गप्प केलेला) केशवसुमार

राजकारणी आणि गुन्हेगार यांची अभद्र युती

लेखक हरकाम्या यांनी मंगळवार, 07/04/2009 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर मिपावर चर्चा झालीकी नाही हे मला माहिती नाही . पण सध्या सगळेच पक्ष निवडुन येण्याची क्षमता या गोंडस नावाखाली समाजातील गुन्हेगार घटकांना आपल्या पक्षाचे तिकिट देताना दिसतात. संजय दत्त सारखा प्राणी तर निवडणूक लढवण्याची परवानगी मिळण्यासाठि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतो. अमरसिंहासारखे नेते त्याच्यामागे शेपटाप्रमाणे धावत असतात.

बूटरुपी मिसाइल.

लेखक हरकाम्या यांनी मंगळवार, 07/04/2009 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक बुटाचे काम हे मानवाच्या पावलांचे धूळ, काटे,रस्त्यातील खाचखळगे, व अन्य तत्सम पदार्थ यापासून संरक्षण करणे असेच वाटत होते. याच बूटाने " डोक्यात बुट निघणे " यासारखे वाक्प्रचार दिले. पण या बुटाला सध्या काय झाले आहे समजत नाही. सध्या हा मानवनिर्मित प्राणी सध्या मान्यवर लोकांच्या अंगावर धावून जाताना दिसतो. याला सध्या काय झाले आहे ते समजत नाही.

मनश्री

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 07/04/2009 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
अरुण शेवतेंचं 'हाती ज्यांच्या शून्य होते' वाचलं तेव्हाच 'मनश्री'शी ओळख झाली आणि तिला अधिकाधिक जाणून घ्यायची इच्छाही.. कारण तिच्या हातात फक्त शून्यच नाही तर अंधारभरलं शून्य होतं पण त्या अंधारालाही उजळायला लावेल अशी तिची जिद्दकथा.. तिची,तिच्या आईची आणि सार्‍या कुटुंबाची! मनश्री जन्मली तिच मुळी डोळ्यात अंधार घेऊन,तिला जन्मत: बुब्बुळच नव्हती आणि त्यात भर म्हणून की काय फाटक्या ओठाची भर, मेंदूची वाढ,मणक्यांची क्षमता, मुकेबहिरेपणा .. अजून कायकाय तिच्यापुढे वाढून ठेवलं होतं ते समजलं नव्हतं. उदय आणि अनिता सोमण ह्या मध्यमवर्गीय दांपत्याचे हे लेकरु देवाचं उलट दान घेऊन जन्मलं.

सारेगमप - महाराष्ट्राचा आवाज

लेखक शुभान्कर यांनी मंगळवार, 07/04/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा सारेगमप सुरु झाले आहे. So called प्रोफेशनल गायक गात आहेत. मला व्यक्तिशः कुणाचेच गाणे सफाईदार वाटत नाही. खूप चांगल्या हौशी गायकांसारखे किंवा थोडे अधिक बरे/वाईट. तुम्हाला काय वाटते?

सारेगमप- महाराष्ट्राचा आवाज (अद्ययावत)

लेखक बाकरवडी यांनी मंगळवार, 07/04/2009 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
सारेगमपचे नवीन पर्व सुरू होउन आता २ आठवडे होतील. या पर्वात १० प्रसिद्धीच्या झोतात असलेले नव्या दमाचे तरूण गायक- गायिका आहेत. सर्वजण हा कार्यक्रम पहात असतील.परंतु ह्यावेळी कोणीच धागा सुरू केला नाही. का कोणी हा कार्यक्रम पहातच नाही? का little champs च्या अनपेक्षित निकालाने सगळे कंटाळले काय? असो, आपणास या नव्या पर्वाबद्दल काय वाटते ते सांगा.तसेच नवे परिक्षक असलेले पं.मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याबद्दलही सांगा

(पहिला नोकरी अर्ज..)

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 07/04/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
(सुहास यांच्या पहिले प्रेमपत्र.. वरुन साभार) कॉलेजमध्ये, विनामोबदल्यात, 'क्ष' ने 'वाय'कंपनीला लिहीलेल्या आणि मी चोरुन वाचलेल्या नोकरीच्या अर्जाने प्रेरीत.. "प्रयत्न पहिला माझा हा" "नकार मजला देऊ नकोस" "रिझ्यूम पाठवितो तुला" "तो झिडकारुन देऊ नकोस" "उठता बसता ध्यास तुझाच मज" "तो 'आन॑द' हिसकावुन घेऊ नकोस" "राहीन एकनिष्ठ तुझ्याशी मी" "हे स्वप्न हिरावुन घेऊ नकोस" "मनापासुन अर्ज दिला आहे मी तुज" "पक्त कॉल देऊन जाऊ नकोस" "प॑चप्राण डोळ्या॑त आणुनी रिप्लाय पहातो" "अ॑त माझा पाहु नकोस" "रिझ्यूम देऊनी वाट पहातो" "कॉल मजला देशील का? "रिप्लाय त्वरित देऊनी
Taxonomy upgrade extras

खाण्याला उपमा नाही

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 07/04/2009 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गीत : प्रेमाला उपमा नाही ) गीत - जगदीश खेबुडकर संगीत - प्रभाकर जोग स्वर - अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर चित्रपट - कैवारी (१९८१) --------------------------------------------------------------------------------------- मी कसा टाळू हा शेट्टी, ते गत जन्मीचे देणे खाण्याला 'उपमा' नाही हे ऊडप्याकडचे खाणे मळकेपण पिउनी ओले कपांचे कटिंग झाले मी व्यथा फुल्पात्र का शोधू, हे 'फूल' म्हणू की 'अर्धे' टमाटांची लेऊन प्युरी हे क्रीम ओघळे खाली मी कशी ओळखू जादू, हे पनीर म्हणू की छोले का पित्ताने माथे विटती खर्जात मग ढेकर उठती मी कशी भावना बोलू, हे उदरभरण असे का गिळणे ? ---------------------------------------
Taxonomy upgrade extras

आपणांस खालील पुस्तक माहीत आहे काय?

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 07/04/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या मासाच्या अंतीम आठवड्यात कचेरीतील मार्च शेवटाच्या कामामुळे काही वेगळे करण्याचा विचारसुद्धा करवत नव्हता. त्या वेळी अचानक भाचीच्या बालभारती (शासकीय) पुस्तकातील सरस्वती देवी च्या चित्रावर आस्मादिकांची द्रुष्टी गेली. देवीच्या करातील पुस्तक एखाद्या ग्रंथासम आणि हातातील मोत्यांची माळ जणू काव्यमोती सम मज भासू लागले. ही काहीतरी नव उर्मी आहे की काय अशी अंतस्थ शंका मनी दाटुन आली. तसे मी काही लेखक किंवा कवी नव्हे. आपले कचेरीत मान मोडून लिहीत बसावे हाच काय तो लेखणीशी संबंध. तरीही काहीतरी लिखाण प्रसवले पाहीजे असे राहुनराहून वाटू लागले.