Skip to main content

यल्गार

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 09/04/2009 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
आता सोड तारे मोजायचं.. मोजताना चुकलं की आपणच हळहळायचं.. ही मोजणी नेहेमीच चुकणार.. इथे रोजच मृत्युला नवा घास मिळणार.. बाँब आणि बुलेटस आपलं प्राक्तन असणार .. आपलेच हात आणि आपलेच गळे.. लक्षात ठेव आपल्याच काळजाला.. आपणच पाळलेल्या श्वापदांचे सुळे.. ते म्हणतात आग विझवलीय.. आमच्याच राखेखाली ठिणगी दडपलीय.. म्हणुन म्हणतो तारे मोजणं सोड.. राखेखालची ठिणगी शोध ऐक्याची मार फुंकर.. चेतव वन्ही स्वत्वाचा आणि कर यल्गार.. नव्या युद्धाचा अस्तित्वाच्या लढाईचा...! विशाल

चित्र-काव्य स्पर्धा

लेखक सुनील यांनी गुरुवार, 09/04/2009 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र-काव्य स्पर्धा खालील चित्र पाहून तुम्हाला स्फुरलेली कविता येथे टंका. स्पर्धेचे नियम - १) सदर स्पर्धा फोटो डकवल्यापासून किमान ७२ तास ते कमाल १२० तासांपर्यंत खुली राहील. २) स्पर्धेची वेळ संपल्यावरच निकाल जाहीर करण्यात येईल. ३) स्पर्धेतील प्रथम विजेत्याचे नाव आमच्या खरडवहीत ठळक अक्षरात लिहिण्यात येईल!! (अगदीच आग्रह झाला तर ठाण्याच्या मामलेदारची मिसळ खिलवू देण्याबद्दल विचार करण्यात येईल!!) ४) अन्य विजेत्यांची नावेदेखिल आमच्या खरडवहीत (ठळक नसली तरी) लिहिण्यात
Taxonomy upgrade extras

मोगरा फुलला...

लेखक सुनील यांनी गुरुवार, 09/04/2009 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला दिवस... दुसरा दिवस... तिसरा दिवस... स्थळ - घरचा बगिचा दिनांक - ७. ८ आणि ९ एप्रिल, २००९ कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!

चैत्रगौर

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 09/04/2009 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायचंय, सगळ्या सुगरण ताया स्वैपाकघरात गुन्तल्या, तेव्हा म्हटलं, आपण लिम्बू-टिम्बू कंपनीनं गौर सजवावी.

कैरीची डाळ, पन्हे आणि जालिंदर जलालाबादी!

लेखक रेवती यांनी गुरुवार, 09/04/2009 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
भडकमकर मास्तरांचा जालिंदरजींबद्दल लिहिलेला लेख वाचला आणि आमच्या मनात खळबळ उडाली. इतक्या थोर साहित्यिकाचे साहित्य आतापर्यंत न वाचल्याने मनात विषाद उत्पन्न झाला, त्यामुळे प्रतिक्रिया काय द्यावी हे समजेना. तशीच उठून स्वयंपाकघरात गेले व वाटीभर हरभर्‍याची डाळ नीट धुवून भिजत टाकली. पुन्हा मिपावर येऊन बघते तो पाषाणभेद यांनी 'लिहिते व्हा' ह्या जालिंदरजींच्या पुस्तकाबद्दल खरडवहीत विचारणा केली होती. फारच अस्वस्थता आल्याने पायात सपाता अडकवून जवळच्याच पुस्तकाच्या दुकानात जालिंदरजींचे साहित्य शोधण्यास बाहेर पडले. दुकानात पोचताच दोन सुकुमार ललनांनी स्वागत केले आणि काय हवे असे विचारले.

२१ - परीक्षण

लेखक विकास यांनी गुरुवार, 09/04/2009 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही आठवड्यांपुर्वी 21 नावाचा एक २००८ साली काढलेला चित्रपट अचानक पहाण्यात आला. त्या कथेचे मूळ असलेली सत्य घटना बॉस्टनशी म्हणजे एम आय टी शी संबंधीत असल्याने कधीतरी ऐकली होती. केवीन स्पेसी हा आवडता नट असल्याने बघुया तरी म्हणत आम्ही बघायला बसलो आणि बर्‍याच दिवसांनी मनोरंजनासाठी काहीतरी नवीन पहायला मिळाले असे वाटले.

मिपाकर भगिनींना नम्र विनंती..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 08/04/2009 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजू, चित्रा, शाल्मली, रेवती, भाग्यश्री, शितल, चकली, चित्रादेव, स्वाती दिनेश, इत्यादी मिपाकर भगिनींना एक नम्र विनंती.. आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा. त्या त्या भगिनीच्या नावाने (उदाहरणार्थ - आजचे हळदीकुंकू प्राजूकडून!) असे शीर्षक असलेला पाठवलेल्या पदार्थांचा फोटू त्या त्या सुवासिनीच्या नावासहीत मुखपृष्ठावर चढवला जाईल.

अभिनंदन!!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 08/04/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुकयाची आवली... हे मानपत्र ..!!! माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून.. लेखिकेला आलेले हे मानपत्र तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारेच आहे. लेखिकेचे अभिनंदन! आणि मिपा तर्फे शुभेच्छा!!