Skip to main content

ताबडतोब रस मलाई.. :)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 15/04/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार खवय्यांनो, (झालं! आली का परत एक नवा प्रयोग घेऊन..असं कोण रे म्हणतंय तिकडे...??) रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तश्शी. आम्रखंड्,श्रीखंड.. हे पदार्थ तर छानच. गुलाबजाम, खीर तर रोजचेच. रसमलाई माझी अतिशय आवडती डिश आहे. गोड पदार्थांमध्ये जर मन लावून मी काही खात असेन तर ती रसमलाई. चपटे पेढ्याच्य आकाराचे गोळे असले की, रसमलाई. लहान लहान द्राक्षासारखे गोळे असले की अंगूर मलाई.. माझ्या कोल्हापूरी घशातून ही रसमलाई इतकी अलगद उतरते... व्वा! काय सांगू आता. इथे स्वादची रसमलाई मिळते.

प्रभातरंग

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 15/04/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
पहाट झाली उधळले प्रभातरंग सुखावले नयन मन आनंदात गुंग सोनेरी किरणे फुला-पानांत ओसंडे निसर्गसौंदर्यास कळा सतरावी चढे नवचैतन्य पहाट विखुरते नवरंग पाण्यात झळाळे नवसुर्य प्रतिबिंब पक्षी किलबिलाट छेडे सुर हळुवार वेलीफुलांना येई तारुण्याची बहार काळोख भेदे प्रकाश जशी निराशेस आशा सुर्य विराजमान होई संपवुन अंधारी निशा टीपः कविता आवडल्यास किंवा न आवडल्यास/ बदल करावेसे किंवा विडंबन करावेसे वाटल्यास जरुर कळवावे/ करावे. आपला (प्रभातरंगप्रेमी) मराठमोळा.
Taxonomy upgrade extras

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाग १

लेखक सातारकर यांनी बुधवार, 15/04/2009 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी - अमराठी वाद आज अगदी ऐरणीवर आला आहे अस मला वाटत होत. प्रत्यक्षात स्वतंत्र भारताच्या जन्माआधीपासूनच हे भांडण चालू आहे अस एकंदरीत उल्लेखांवरून दिसून येत. कदाचित मिपाकरांना ह्यातल्या बय्राचश्या गोष्टींची माहीती असेल देखील पण मला बहुतेक सगळच नविन होत म्हणून माझ्यासारख्यांसाठी हा लेखन प्रपंच. राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी बाबासाहेबांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला होता. त्यांच Thoughts On Linguistic States (१९५५) हे पुस्तक नुकतच वाचल. त्यात त्यांनी ह्या समस्येच्या वेगवेगळ्या बाजूंचा सविस्तर उहापोह केला आहे.

बालगीत -खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी.

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 15/04/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
-------------------------------- सार्‍यांशी दोस्ती आता सार्‍यांशी गट्टी, खेळायचं खूप आता सुट्टीच सुट्टी. खेळायचे घरी आता कॅरम आणि पत्ते सार्‍या खेळात होईल माझीच फत्ते. 'अभ्यास करा,' अशी आता होणार नाही कटकट टि.व्ही.
Taxonomy upgrade extras

कसाबची आई

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 15/04/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
काल आपले परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांनी कुठेतरी सांगितले की कसाबची आई मुंबईला येणार आहे.... ... ही बातमी टीव्ही वरती वाचून डोके आउट झाले. कितीही विचार केला तरी ही काय पाकिस्तानवर कुरघोडीची राजकीय चाल वगैरे आहे , असे वाटत नाही... या सरकारला इतक्या फेनॅटिक दुष्ट गुन्हेगारांचा इतका पुळका का? आता या नराधमाच्या कथेत एक ह्यूमन अँगल आणायचा विचार आहे काय या लोकांचा? असे करणे हा हल्ल्यात मृत आणि जखमी लोकांचा अपमान नाही का? आणि तिला येऊ कशाला देत आहेत हे ? एका परदेशी गुन्हेगाराची आई आपल्या देशात यायचा संबंध काय? ... तिला व्हिसा देणार यांची हीच मिनिस्ट्री ना?

प्रेम म्हणजे ..

लेखक jenie यांनी बुधवार, 15/04/2009 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे .. प्रेम म्हणजे जीव लावणं फुला सारखा तुझा चेहरा हातांच्या ओंजळीत घ्यावा भेटित आपल्या प्रीतीचा मधुगंध दरवळावा... तुझ्या भेटित ह्रुदयाची या पाकळी पाकळी फुलून यावी परस्परांना जीव लावणं जीवाला जीव देणं जीवात जीव आसेतोवर जीवलग राहाणं विश्वासाने हातामध्ये आपला हात देणं निर्धाराने प्रेमाची शतजन्माची साथ करणं..

संसार एक घर

लेखक जागु यांनी बुधवार, 15/04/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
संसार, म्हणजे एक घर थोड गुपितच ठेवावं आरपार दिसू नये म्हणून पडद्यांनी सजवावं संसार, म्हणजे एक घर भावनांना हळूवार टिपावं अश्रूच्या धारांना पागोळ्यांत साठवावं संसार म्हणजे एक घर प्रेमाच्या पायावर बांधावं उन्हाच्या झळा साहण्यास सोशिकतेच छप्पर असावं संसार म्हणजे एक घर काचेच्या खि़डक्यांचं असावं तडा जाऊ नये म्हणून विश्वासाच कुंपण असावं संसार म्हणजे एक घर प्राजक्ताने अंगणी फुलाव टाकाऊ वस्तुंनाही तडजोडीने सजवावं.
Taxonomy upgrade extras

चवदार, चटकदार जवळा!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 15/04/2009 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : सुका जवळा (या नावाची सुकी मासळी बाजारात वाट्यावर मिळते. साधारण १० रुपायाचा एक वाटा असतो) तेल, कांदा, गरम मसाला, २-४ कोकमं, मीठ चवीप्रमाणे. दोन माणसांकरता. बाजारातून छानपैकी तीन वाटे सुका जवळा आणावा. थोडा निवडावा. काही खडेबिडे असतील तर काढून टाकावेत. नंतर तो जवळा तव्यावर थोडा भाजून घ्यावा व त्यानंतर स्वच्छ धुवावा. पाणी निपटून टाकावे. पातेल्यात तेल घेऊन झकासपैकी कांद्याची फोडणी करावी. कांदा छान लालसर परतून घ्यावा व त्यात सुका जवळा टाकावा. मिश्रण थोडा वेळ चांगले परतून घ्यावे, जवळा शिजू द्यावा.