अस्वल
का रागावलात हो बाबा माझ्यावर.
मला न सांगताच निघुन घेलात.
तीन दिवसांसाठी आजीकडे गेले, परत आले तेंव्हा दिसलाच नाहीत.
फोन पण करत नाहीत तुम्ही.
आधी कसे कॉलेजमधे पोचताच फोन करायचात.
तुमचा फोन आल्याशिवाय मी शाळेत जायची नाही.
'ठकु' म्हणायचात तुम्ही मला.
मला ते खुप आवडायचे.
बाबा, मी सध्या कुणाशी जास्त बोलत नाही.
मिसळपाव