लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी शनिवार, 02/05/2009 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी तळ्यावर प्रो.देसायांची वाट बघून बघून थकलो.आता घरी जावं म्हणून उठून चालायला लागलो.वाटेत एका बाकावर एक गृहस्थ पुस्तक वाचताना मी पाहिलं.वाचनात ते अगदी गर्क झाले होते.
लेखकअमोल केळकरयांनी शनिवार, 02/05/2009 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
१मे पासून पुण्यातील रिक्षाचालक संपावर गेल्याची बातमी वाचनात आली. कारण काय तर १ रु. भाडे कपात करण्याचा निर्णय संबंधीत खात्याने त्यांच्यावर लादला आहे.
आमच्या सारख्या पुण्याच्या बाहेर रहाणार्यांना पुण्यात आल्यावर रिक्षा प्रवासा शिवाय पर्याय नाही. पी.एम्.टी तसेच पी.सी.एम्.टी चे बस रूट माहित नाहीत. उद्या पासून २-३ दिवस लग्न, मुंज आदिंचे मुहुर्त, सुट्ट्या या कारणाने अनेक बाहेरचे लोक/ पाहुणे पुण्यात येण्याची शक्यता आहे. मला देखील रविवार/ सोमवार पुण्यात यायचे आहे. पण रिक्षा संपामुळे अवघड परिस्थिती वाटत आहे.
लेखकधनंजययांनी शनिवार, 02/05/2009 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
(हे पुस्तक मी मैथिलीसाठी, म्हणजे माझ्या अडीच वर्षांच्या पुतणीसाठी बनवले होते. आता तिने बघितले आहे, मग आणखी लोकांनी गंमत लुटायला हरकत नाही. चित्रे माझी मैत्रीण आंद्रेया ग्रानादोस हिने काढली आहेत. त्यामुळे चेहरे दक्षिण-अमेरिकन आहेत, मराठमोळे नाहीत! तिला मराठी मुळीच येत नाही. माझ्या अशा-तशा अनुवादाला अनुसरून आणि वेड्यावाकड्या स्केचेसचा अर्थ लावून तिने ही चित्रे काढली आहेत!
लेखकदशाननयांनी शुक्रवार, 01/05/2009 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले.
लेखकविकियांनी शुक्रवार, 01/05/2009 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
खास मिपाकरासांठी मुरुड-जंजिरा किल्ला व परिसराचे वॉलपेपर्स.आवडल्यास नक्की कळवा.
प्रस्तुत वॉलपेपरर्स चे प्रकाशन प्रथमच मिपावर होत आहे.हे वॉलपेपर अन्यत्र कोठेही प्रकाशित झालेले नाही.
लेखकस्वाती दिनेशयांनी शुक्रवार, 01/05/2009 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऍमस्टरडॅमची आणि आमची परत गाठभेठ होईल, असं वाटलं नव्हतं...पण ट्यूलिप्सची शेतं आणि बागा आम्हाला खुणावत होत्या.आमची मागल्या वेळची भेट ओल्या पावसात चिंब भिजलेली होती.क्रिकेट तिरंगी सामन्यांचे निमित्त होते,पण तेव्हा ट्यूलिप्सचा हंगाम नव्हता.ही नाजूक फूलं मार्च एंड ते मे या काळात बहरतात.कॉकेनहॉफ हे ट्यूलिप्सचे नंदनवन! ऍ' डॅम पासून तासदीड तासाच्या अंतरावर...दरवर्षी इथे लाखो ट्यूलिप्सची लागवड होते,आणि इतरही कितीतरी प्रकारची फुले!
लेखकस्वप्निल मनयांनी शुक्रवार, 01/05/2009 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
आताच माझी Exam झाली त्यावेळी सुचलेली कविता
Exam म्हणजे Exam असते
तुमची आमची अगदी सेम असते
अखेरच्या क्षणापर्य॑त रट रट रटायच असत॑
कितीही अभ्यास केला तरी tension येतच असत॑
शेवटच्या दिवसापर्य॑त Notes शोधायच्या असतात
Notes मिळल्या तरी सगळ्या वाचायच्या नसतात
Exam जवळ आली की देव देव करायच॑ असत॑
म॑दिरात जाऊन रोज एक नारळ फोडायच॑ असत॑
Exam म्हणजे Exam असते
तुमची आमची अगदी सेम असते
पेपर हातात पडला की आधी सगळ॑ वाचायच॑ असत॑
काय काय येत नाही ते बाजुला काढायच॑ असत॑
शेजारचा काय सोडवतो ते टापायच॑ असत॑
दिसलच काही तर सरळ छापायच॑ असत॑
Result लागेपर्य॑त enjoy करायच॑ असत॑
कारण त्यात काय येनार हे आ
लेखकटारझनयांनी शुक्रवार, 01/05/2009 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. अरुण वडुलेकर यांनी सादर केलेले "एक होती परी" ह्या बालगीतांचे रसग्रहण वाचून आणि विशेशत: परीची कविता वाचून,
अशीच एक मनांत ठसलेली पराची कविता सादर करण्याचा मोह आवरत नाही. या कवितेचा जनक कोण आहे ते माहीत्ये का तुम्हाला ..