बड्डे
सकाळी सकाळी बायकोने बड्डे 'अमृत' केला आणि लक्षात आले की के.ई.एम. मधे सकाळी ७.१५ पहिले ट्यांहां केलेल्याला ५४ पुर्ण आली. डॉक्टरने उलटा लटकवुन पाठीवर मारल्यावर किचीत रडलो होतो असे आई म्हणायची. म्हणजे निषेधापुरताच.
सिंह चालताना मागे वळुन बघतो त्याला म्हणतो त्याला सिंहावलोकन म्हणतात. तस कुत्र पण चालताना मागे वळुन बघते. त्यामुळे गेल्या ५४ वर्षात काय मिळाले आणि काय गमावले ह्याच्या हिशोबाला मी 'कुत्र्यावलोकन'च म्हणेन. उगाच साला आपल्याला सिंह समजणार्यापैकी मी नव्हे.
_____________________________________________________
" काल तुम्ही स्वःतशी जरा जास्तच हसत होतात, खरे सांगा, कुणाची खेचलीत"?
मिसळपाव