चादर ट्रेक - ३
चादर ट्रेक २
कामाच्या ताणामुळे पुढील भाग देण्यासाठी खूप उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
वैद्यकीय तपासणीसाठी आम्ही चालतच त्यांच्या ठरविलेल्या ठिकाणी पोहोचलो. चालता चालता गेल्या ६-८ महिन्यांचा काळ सर-सर डोळ्यासमोरून जात होता. ज्या परीक्षेसाठी आम्ही सगळे बरीच तय्यारी करत होतो कोणी सायकलिंग करून, कोणी व्यायाम योगा करून, कोणी नुसतेच जॉगिंग करून आपआपली शारीरिक क्षमता वाढवीत होते केवळ चादर ट्रेकसाठीच, त्याचीच आज परीक्षा होती.
मिसळपाव