Skip to main content

अभिनंदन

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 24/03/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोर्टाचे अभिनंदन कारण १. शिक्षकांना पल्स पोलियो, हागणदारी सर्वे व इतर जोखडातुन मुक्त केल्याबद्दल २३. लिव इन रिलेशनशिप ला मान्यता दिल्याबद्दल (कृष्ण आणि राधेचा दाखला का द्यावा ते मात्र कळाले नाही)

सर्व मराठी वर्तमानपत्रे उभ्या आकाराची असावीत! (टॅब्लॉईड)

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 24/03/2010 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिड्-डे, पुणे मिरर, मुंबई मिरर, लंडनमधील "टाइम्स" व इतर काही छापील वर्तमानपत्रे ज्या आकारात येतात (बहुदा त्या आकाराला टॅब्लॉईड म्हणतात) त्या आकारात सगळीच वर्तमानपत्रे असावीत असे मला व माझ्या सारख्या असंख्य वर्तमानपत्र-वाचक-मंडळींना वाटते. सर्व लोकप्रिय मराठी वर्तमानपत्रे त्याच आकाराची असावीत. कारण शहरांमध्ये, विशेषतः मुंबई-पुण्यात नोकरदार मंडळींचे दिवसातील चार पाच तास प्रवासातच जातात. आणि अशा वेळेस चालू घडामोडींचे ज्ञान तसेच मनोरंजन मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे वर्तमानपत्र. पण, त्याच्या सध्याच्या चारवेळा घडी केलेल्या आकारत ते वाचणे फार कठीण जाते. फार तर फक्त मुख्य पान वाचता येते.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आयचा घो!

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 24/03/2010 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
डिडब्लु टिव्ही हा जर्मन चॅनेल माझा आणि माझ्या कुटुंबाचा आवडता चॅनेल आहे. आम्ही रोज न चुकता या चॅनेलवरचे काही कार्यक्रम बघत असतो. हा चॅनेल सातत्याने बघून जर्मनी हा पण माझा देश आहे आणि सारे जर्मन माझे बांधव आहेत ही भावना आमच्यात वाढीस लागली आहे. काही दिवसांपूर्वी या चॅनेल वर टुमॉरो-टुडे या शास्त्रीय नियतकालिकात एका आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त एका औषध-विज्ञानाच्या विद्वान प्राध्यापकांची मुलाखत झाली. मुलाखतीचा विषय होता - सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत प्लासिबो-इफेक्टचा अंतर्भाव अधिकृतपणे करावा का? प्राध्यापक महाशयांनी 'काही हरकत नाही' असा सूर लावला होता.

निकालाचा शोध...

लेखक अभिषेक९ यांनी बुधवार, 24/03/2010 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे. -शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक. अभ्यासाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल बरेच 'शोध' लागतात असे आढळून येतं. तो निकाल 'result ' असेन तर बऱ्याच जणांना अमानवी शोध लागल्याचे बोलले जातं. त्यातील बऱ्याच जणांना असा शोध लागतो की त्यांनी दररोज १६ ते १८ तास अभ्यास केला होता. आता हा असला अभ्यास अमानवीच म्हणावा लागेन, नाही का? अहो मानव म्हटला तर त्याला ६-८ तास झोप पाहिजे, एखादा तास जेवणास लागेल, बरं विद्यार्थीदशा म्हटली म्हणजे फिरणे (हुंदडणे) आलेच.

अरुनाचल...

लेखक अभिषेक९ यांनी बुधवार, 24/03/2010 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
अरुणाचलचा दौरा संपला। प्रवास, प्रवास अणि फ़क्त प्रवास! तब्बल ८ राज्य, १७ नद्या (गोदावरी, वर्धा, महानदी, संख, गंगा, ब्रह्मपुत्रा,लोहित), दक्खनच्या पठारावरून सातपुड्याच्या दक्षिणेकडून दंडकारण्य, मग छोटा नागपूर करून गंगेचे विस्तीर्ण मैदान, अहोमच्या पुण्यभूमीतून अरुणाचल गाठले! एकंदर प्रवास ९००० कि.मी. चा... १५ दिवस... १२ वीर..