Skip to main content

कधीतरी .... कुठेतरी.... थोडेसे रसग्रहण....

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/03/2010 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी .... कुठेतरी.... .........खरेतर लेखन हा आमचा प्रांत नव्हे, तरिपण या छायाचित्रांचे थोडेसे रसग्रहण करण्याचा एक प्रयत्न..... खालील चित्राचे चार भाग, म्हणजे आकाश, दूरचा डोंगराळ प्रदेश, खालील जमिनीचा उतार, घरे आणि त्याभोवतालची झाडे, खडक.... या चारी भागात एक सुंदर समतोल तर आहेच, शिवाय या सर्वांवर असलेले धुक्याचे एक हलकेसे आवरण या चारी भागांना बांधून ठेवते. अगदी समोरील झुडुपांचा, घराखालच्या खडकांचा, तसेच घरांच्या छपरांच्या सावलीचा भाग, लहान झाडांचे खुंट आणि मोठ्या झाडांच्या फ़ांद्या...या सर्व चित्रात विखुरलेल्या गहिर्‍या जागा, आणि तश्याच विखुरलेल्या प्रकाशमान जागा...

मनाचे खेळ!

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 26/03/2010 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक न असलेल्या अंधऱ्या खोलीतल्या दोन न असलेल्या खुर्च्या. मध्यभागी न टांगलेला दोनशे वॉटचा दिवा न हिंदोळणारा. तिथे उपस्थित न असलेल्यांच्या सावल्या तशाच मंद गतीने न हिंदोळवणारा. त्या खोलीच्या भिंती सहा इंच जाड दगडी (न असलेल्या - आता हे पुन्हा पुन्हा सांगत नाही). एका खुर्चीवरच्या व्यक्तीला खुर्चीला जखडून ठेवलेलं. तिला आपण अ म्हणू. अज्ञात, अनॉनिमस, अविचारी म्हणून... दुसऱ्या, समोरच्या खुर्चीवर तात्या. तात्या तो दिवा फिरवून त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर भणभणता झोत टाकतात. "शेवटचं विचारतो. बोल, कोण आहेस तू?" दुर्दैवाने त्यांना चेहेऱ्याच्या जागी एका गहन काळिम्यापलीकडे काहीच दिसत नाही.

अर्थ आवर-Earth Hour

लेखक बेभान यांनी शुक्रवार, 26/03/2010 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या, म्हणजे शनिवारी, २७ मार्च दिवशी, रात्रि ८:३० ते ९:३० हा एक तास Earth Hour (अर्थ आवर) म्हणुन पाळला जातो. या एक तासामध्ये सर्व उद्योगधंदे, सर्व संस्था आणि घरातील विनाकारण चालू असलेली विजेची उपकरणे बंद ठेवण्याचे अवाहन wwf- वर्ल्ड वाईल्डलाईफ़ फंड या संस्थेने केला आहे. होणा-या हवामानबदलाच्या परिणामाविषयीची जागरुकता वाढविण्याच्या दृष्टीने या संस्थेने २००७ पासुन हे पाऊल उचललेले आहे. आयफेल टॉवर, दिल्लीच्या लाल किल्ल्यामधे ही हा ’अर्थ आवर’ पाळला जातो.

स्वर्गसुख

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 26/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
व.पुं.नी “पार्टनर” मधे स्वर्गसुखाची व्याख्या इतकी सुरेख सांगितलीये ना…!! “ज्यावेळी, जिथे, जे हवं… ते, त्या वेळी….. तिथे मिळणं म्हणजे “स्वर्ग“! पण त्यावेळी ते न मिळणं म्हणजे “नरक” असेल का ? नाही…. कदाचित ही व्याख्या फार हार्श होईल नरकाची. हवी ती गोष्ट न मिळणं म्हणजे अगदीच काही नरक नाही. कदाचित त्याला “समझोता ” असं थोडंसं बरं नाव देता येईल. त्या वेळेशी मनाने केलेला समझोता. असे समझोते बरेच करावे लागतात आयुष्यात. पण मनासारखी नोकरी, बायको, घर, संतती, संपत्ती…… सगळं काही मिळणं म्हणजे स्वर्ग नक्कीच नाही. कितीतरी अशा गोष्टी असतात ज्या शब्दात सांगता येत नाहीत. त्या फक्त त्या वेळी हव्या असतात.

अभिनंदन छोटा डॉन!

लेखक महेश हतोळकर यांनी शुक्रवार, 26/03/2010 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
छोटा डॉनच्या ब्लॉगची सकाळने घेतलेली दखल! http://www.esakal.com/esakal/20100325/5160732294887613459.htm * फॉरवर्डमधून या पाट्या सगळीकडे प्रसारित होत असल्या, तरी २२ मार्चला एका ब्लॉगमध्ये ही पोस्ट सर्वप्रथम झळकलीय. 'छोटा डॉन' नावाच्या या ब्लॉगवरची मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियाही जरूर वाचा. लगे रहो डॉन भाई. अभिनंदन.

ओळख - पुस्तक आणि लेखकाची

लेखक विकास यांनी शुक्रवार, 26/03/2010 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात इथल्या एका पुस्तकांच्या दुकानात असेच फिरत असताना एका पुस्तकाकडे लक्ष गेले आणि आम्हाला दोघांना एकदम आकर्षक वाटले म्हणून तात्काळ लेकीसाठी म्हणून घेतले. मुलीला दाखवल्याबरोबर तिला देखील लगेच आवडले (!) आणि लगेच हसतखेळत वाचून काढले (!!). ह्या पुस्तकाचे नाव आहे, "The Little Book of Hindu Deities" लेखकाचे नाव आहे, संजय पटेल. असे आवडण्यासारखे त्यात काय होते असे वाटत असेल ना?

घरच्याघरी जिलबी!

लेखक अम्रुताविश्वेश यांनी शुक्रवार, 26/03/2010 02:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : जिलबी साठी - २ वाट्या रवा १ वाटी मैदा २ चहाचे चमचे डाळीचे पीठ २ चहाचे चमचे आम्बट ताक ( ताक आम्बट असणे महत्वाचे) २.५ वाट्या उकळत पाणी केशर चवीप्रमाणे थोडस तेल ( मिश्रणावर घालायला ) तेल किन्वा साजूक तूप जिलब्या तळायला पाका साठी - ३ वाट्या साखर १.५ वाट्या पाणी केशर वेलची पूड कृती - ज्या दिवशी जिलबी करायची आहे त्याच्या आद्ल्या रात्री रवा,मैदा आणि डाळीचे पीठ चाळून घ्या. त्यामधे आम्बट ताक आणि उकळत पाणी घालून एकजीव करून घ्या.

१००% गव्हाच्या पिठाचा पाव - न तिंबता!

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 26/03/2010 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
हा पाव करण्यास सोपा आणि आरामशीर आहे. कणीक तिंबायचेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. पण पीठ फुगायला खूप वेळ लागतो. इडली वगैरे करताना पीठ फुगायला आपण रात्रभराचा वेळ देतो, तशा प्रकारे विचार करायचा... गव्हाचे पीठ १००% घ्यायचे आहे. अमेरिका-वगैरे देशांत शक्यतोवर "हार्ड रेड व्हीट" घेतल्यास त्यात तार अधिक येते. (तार येण्यासाठी "ग्लूटेन"चे प्रमाण अधिक असावे लागते.) पुणे-सोलापूर भागात "खपली" गहू मिळतो, तो चांगला. पुरणपोळीसाठी ज्या गव्हाची कणीक वापरता येईल, तो गहू (१००% कोंड्यासकट) बारीक दळून घ्यावा. (पुरणपोळीची किंवा मांड्यांची कणीक मळताना गोळा ओढून बघतात - त्याला लांबच लांब चार-पाच फुटांची तार येते.

हे सुरांनो चंद्र व्हा रे

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 26/03/2010 02:16 या दिवशी प्रकाशित केले.
हे सुरांनो चंद्र व्हा रे... अर्चना कान्हेरेंने आळवलेली ही विनवणी. ह्याला गाणं म्हणावं तर त्यातल्या आर्ततेशी प्रतारणा केल्यासारखं होईल. अगदी सुरुवातीचा आलाप डोळे बंद करून ऐकावा. एकदा नव्हे, दोनदा नव्हे अनेकदा. जोवर त्यासोबत झंकारणारा तंबोरा आणि तबल्यावरची थाप अंगावर काटा आणत नाही तोवर पुढे जाऊच नये. डोळ्यांत पाणी दाटण्यावेळी कधी बोलायचा प्रयत्न केला असाल तेव्हा कंठ, आवाज जसा कंप पावेल तशी तबल्याची सुरुवात. सुरांनो चंद्र व्हा म्हणताना 'व्हा'मध्ये येणारी जीवघेणी आर्तता ह्या दोन ओळींवर खिळवून ठेवेल.

मदत हवी - क्रॅश्ड हार्ड डिस्क

लेखक अश्विनीका यांनी गुरुवार, 25/03/2010 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार... मिपाकरांची मदत हवी आहे. एका मैत्रिणीच्या संगणकाची हार्ड डिस्क क्रॅश झाली आहे. त्यावर खूप महत्वाचा डेटा होता. शिवाय मुलांचे पहिल्या दिवसापासून ते शाळेचा पहिला दिवस असे विडिओज व फोटोज , त्यांच्या आवाजातील गाणी , अनेक दुर्मिळ फोटोज असं बरच काय काय होतं . आणि बॅक अप अजिबात घेतलेला नव्ह्ता. हा सर्व डेटा परत मिळवता (रिकव्हर करता ) येईल का? आणि शक्य असेल तर ते कसे करता येईल ? प्लीज , कोणाला काही माहिती असल्यास सांगा. धन्यवाद. - अश्विनी