Skip to main content

लिहा आणि कमवा - ऑनलाईन डिजीटल लायब्ररी.

लेखक II विकास II यांनी शनिवार, 27/03/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.sahityasampada.com/ ह्या संस्थेचा स्टॉल संमेलनात पाहीला. या संकेत स्थळाद्वारे आपण पुस्तके ऑनलाईन वाचु शकतो. जर तुम्ही लेखक असाल तर तुम्ही ह्या कंपनीशी करार करुन पैसे देखील कमावु शकता. नोंदणी शुल्कः १५ रु मासिक शुल्कः ३० रु अधिक माहीती साठी पत्ता: fuzzysoft@gmail.com sahityasampada@gmail.com दुरध्वनी: ०२४०-२३४७६३२ ९४२२२ ०९४८६ टिपः ह्या कंपनीशी माझा/मिसळपावचा कोणताही संबध नाही अथवा कोणताही प्रकारचा मोबदला मला/मिपा ला मिळत नाही.

मराठी सॉफ्टवेअर उपकरण - घरपोच फुकट सी डी

लेखक II विकास II यांनी शनिवार, 27/03/2010 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी सॉफ्टवेअर उपकरण घरपोच फुकट सी डी - सौजन्य भारत सरकार ०१ मराठी भाषेचे ट्रू-टाईप फॉन्ट्स व कि-बोर्ड ड्रायव्हर ०२ मराठी भाषेचे ट्रू-टाईप मल्टीफॉन्ट कि-बोर्ड इंजिन ०३ मराठी भाषेचे युनिकोड आधारीत ओपन टाईप फॉन्टस ०४ मराठी भाषेचे युनिकोड कि-बोर्ड ड्रायव्हर ०५ मराठी भाषेचे विभिन्न प्रकारचे फॉन्टस आणि स्टोरेज कोड परिवर्तक ०६ भारतीय ओपन ऑफीस(ओपन सोर्स) मल्टीप्रोटोकॉल संदेशवाहकचे मराठी स्थानीकरण ०७ मराठीचे अक्षर जोडणी तपासणीस ०८ मराठी-इंग्रजी शब्दकोश ०९ मराठी डेकोरेटिव्ह (अलकांरीक फॉन्ट) डिसाईनर उपकरण १० मराठी डाटाबेस सॉर्टीग ११ मराठी टंकलेखन सहाय्यक १२ मराठी मायक्रोसॉफ्ट शब्द उपकरण १३ मराठी मायक

नांदुरमधमेश्वर ची भटकंती

लेखक jaypal यांनी शनिवार, 27/03/2010 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाची २४ जानेवारी २०१० ची दुपार उजाडली. गाडी काढली आणि निघालो नासिकला एकटाच. खुप दिवस ठरत होत पण योग जुळत न्हवता. कधी हवामाना मुळे आलेल मळभ तर कधी रजेचा प्राब्लेम. या वेळेस मी ठरवल होत ग्रुपमधल कुणी बरोबर येओ अथवा राहो मी जाणारच. नांदुरमधमेश्वर नासिक पासुन साधारण ३०/३५ कि.मी वर आहे. येथे खुप जुना (ब्रिटीश कालीन असावा) मातीचा मोठ्ठा डॅम आहे. या डॅमच्या बॅक वाटर मधे चरण्यासाठी खुप लांबुन आणि परदेशातुन सुध्दा खुप पाणपक्षी येतात असे समजले होत आणि त्यांना (कॅमे-यात) शुट करण्यासाठी मी चालालो होतो. शनिवारचा हापडे टाकला होता.

आनंद ओवरी

लेखक सोम्यागोम्या यांनी शनिवार, 27/03/2010 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक नाटक पाहिलं आनंद ओवरी ! कान्होबा म्हणजे (तुकारामांचे बंधु) त्यांच्या दृष्टीतून तुक्याचे हे दर्शन निराळेच वाटले. किशोर कदमांचा अभिनय फार जबरी आहे असं काही मी कौतुक करणार नाही पण एकच पात्र असूनही जो काही परिणाम कथेला साधायचा आहे तो अचूक साधला जातो. मी काही नाट्य समीक्षक नाही.

मराठी ग्रंथालयासाठी सॉफ्टवेअर हवे...

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 26/03/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
बेळगावात नुकतेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने लोकमान्य ग्रंथालय सुरु झाले आहे. येत्या वर्षभरात ११११११ पुस्तके विकत घेतली जाणार आहेत. सध्या पुण्याच्या साहित्य संमेलनात ग्रंथ खरेदी सुरू आहे. पुस्तकांची माहिती, सदस्यांची माहिती, पुस्तकांची देवघेव, वर्गणी, स्मरण पत्रे, पुस्तकांची वा लेखकांची अकारविल्हे यादी हे सर्व मराठीतून करु शकणा-या एखाद्या सॉफ्टवेअरच्या शोधात आहोत. कुणी काही सुचवेल का?

दुधीची थालीपीठं/पराठे

लेखक दिपाली पाटिल यांनी शुक्रवार, 26/03/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
दुधीची थालीपिठं, फार फार तर गेलाबाजार पराठे म्हणा..."नावात काय आहे म्हणा...आपला संबंध फक्त खाण्याशी"...हे हे हे...हे माझं स्वगत, जेव्हा मला सांगण्यात येत होतं की "हे दुधीचं थालीपिठ,पराठा नव्हे..." :D दुधीच्या थालीपिठासाठी घरात असतील तेव्हढी पिठं एक-एक लहान मुठभर घ्यावीत...फक्त गव्हाचं पीठ एक मुठ जास्त घ्यावं...मी गहू, ज्वारी, कळणा, बेसन आणि तांदूळाचं पीठ घेतलं होतं...यात प्रत्येकी १ छोटा चमचा हळद, तिखट, धणे पूड, जीरे पूड, जीरे आणि चिमुट्भर ओवा, साखर, चिरलेली कोथिंबीर,चवीपुरतं मीठ आणि दोन च

कॅलेब

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 26/03/2010 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... मध्यंतरी टीव्ही च्या कोणत्या तरी चॅनलवर एक गाजलेला मराठी चित्रपट लागला होता. ''मुक्ता''. सोनाली कुलकर्णी, विक्रम गोखले, डॉ. श्रीराम लागू, अविनाश नारकर ह्या अभिनय क्षेत्रातील नामवंत मंडळींचा समावेश, जब्बार पटेल ह्यांचे दिग्दर्शन... अशी भट्टी जमल्यावर खरे तर चित्रपट सुपर ड्यूपर हिट व्हायला हवा होता. पण बहुधा तसे झाले नसावे. चित्रपटात हाताळलेल्या संवेदनशील विषयामुळे असेल कदाचित. पण ह्या चित्रपटात एक व्यक्ती मात्र भरपूर भाव खाऊन गेली. कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... माझा वर्गमित्र. मला कॉलेजमधील ते सुरुवातीचे दिवस अजूनही आठवतात.