Skip to main content

रेडिओ

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 29/03/2010 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
रेडिओ
लहाणपणी मला पडायचा एक प्रश्न असतील का रेडिओमधील माणसं सुक्ष्म? असतील ही माणसे आपल्यापेक्षा वेगळी एकत्र बसून वाजवतात वाद्ये सगळी एकतर रेडिओचा आकार छोटा गायक, वादक, तबला, पेटी, वाद्ये इतर पसारा केवढा मोठा! खासच असतील ही माणसे एकजात तरीही प्रश्न पडे कशी वाजवतात गाणी एकसाथ? एका गाण्यासाठी लता मंगेशकर येते तिचे गाणे म्हणून ती निघून जाते नंतरच्या गाण्यासाठी किशोर कुमार येतो त्याचेही गाणे म्हणून तो निघून जातो निश्चितच आहे सगळे वेगळे त्याशिवाय का सुरळीत चाले सगळे? हे सगळे प्रश्न मी विचारले माझ्या काका
काव्यरस

श्रीकृष्णाची चूक

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 29/03/2010 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
काल आणि परवा पुण्यात एका गिर्यारोहण संस्थेने पानिपतच्या रणसंग्रामावर श्री. निनाद बेडेकरांची दोन दिवस व्याख्याने आयोजित केली होती. दोन्ही दिवस मी माझ्या कन्येला घेउन या भाषणांना उपस्थित राहिलो होतो. माझी मुलगी सीबीएसई बोर्डाच्या शाळेत जाते. त्यांना जो इतिहास शिकवतात तो नि:सत्त्व इतिहास शिकवतात. त्यांना नेमलेल्या पुस्तकांवरून नजर टाकल्यावर माझे हे ठाम मत बनले आहे.

सुटका

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 29/03/2010 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
(मरणानंतर माणसाचे काय होत असेल, ह्या पुढचे दुसरे जीवन ईथेच पृथ्वीवर असेल की दुसऱ्या एखाद्या ग्रहावर? असा विचार कधीना कधी सगळ्यांच्याच मनात येऊन गेला असेल. मी असेही भाष्य ऐकले होते, की मरणानंतरचा काही काळ मृतात्म्याला खूप कठीण जातो. पुढचा प्रवास सुरू झाला नसतो. एक लोंबकळणारी विचित्र अवस्था असते. शरीर सोडले, तरी ईच्छारूप शरीराचे बंध सुटलेले नसतात. आपल्या संस्कतीत मरणानंतर आप्तस्वकीयांनी करण्याचे अनेक विधी सांगीतले आहेत. तेराव्या दिवशीचे श्राद्ध तर मृतात्म्याच्या शांतीसाठी आणि पुढचा प्रवास ठीक होवो यासाठी फ़ार महत्वाचे मानले जाते. चिनी संस्कृतीत देखील बरेच साम्य असणारे अशा प्रकारचे विधी आहेत.

पांढरी

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 29/03/2010 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिल्याची सुंदर गझल पंढरी वदंता वाटते आता.. कहाणी जी खरी होती त्वचा ही आमची काळी कधी ती पांढरी होती तिच्या बद्दल मते माझी जराशी वेगळी होती जवळ जाता मला कळले..दरी होती बरी होती तशी नव्हती भिती मजला जरा ही सासर्‍याची पण घरामधली तिच्या कुत्री.. जराशी चावरी होती तिला भेटायला जाईन का मी रिक्त हातांनी? चिलखताच्या बरोबर ढाल ही माझ्या करी होती तिच्या हातातले डाव्या लाटणे वाटले साधे बुडावर अदळता कळले अरे ती डावरी होती घरी यावे नि समजावे, कुणी मुक्काम ठोकावा शयनकक्षी निजे सासू..

छोले चाट

लेखक अरुंधती यांनी रविवार, 28/03/2010 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
करायला अतिशय सोपा, सुटसुटीत व चविष्ट पदार्थ!

आमचे काही पूर्व-जन्म....

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/03/2010 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे काही पूर्वजन्मः आणखी काही पूर्वजन्म पुन्हा कधीतरी...... १६२४ साली इंग्लंड मधील एक लढवय्या..... एक संस्थानिक..... अर्धांगिनीसहः

मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्री हरले बीग बी जींकले

लेखक बाबुराव यांनी रविवार, 28/03/2010 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
अभामराठी साहित्य संमेलनाला मुख्यमंत्री गैरहजर राहिले. ते काहून गैरहजर राहिले हे काय सांगाची गरज नाय.बीग बी उपस्थित राहिले. सात ठराव पास झाले. बेळगावच्या मराठी माणसावरचा अन्याव सहन केला जाणार नाय. कोर्टात महाराष्ट्र शासनाने मजबूत बाजू मांडावी. पुणे विद्यापीठाला क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे, असे काय ठराव मंजूर करण्यात आले. प्राचार्य आन अभासामहामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यायनी तीन वर्ष मात्र गाजीले.विश्वसाहित्य संमेलन काय घेतले. अध्यक्षपदाची सुत्रे स्वताच काय दिली.आन पुण्याच्या साहित्य संमेलनात मिरून काय घेतले. काय काय केले आन काय नाय केले.