Skip to main content

गर्द हिरवाईतील श्री केशवराज

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 11/04/2010 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
"घर सोडा घर आणि जरा बाहेर निघा, जग किती सुंदर आहे थोडं तरी बघा परदेश राहिला दूर तरी देश आपला छान, किती रंग! कसे रूप! पाहुनी हरते भान."
लहानपणी वाचलेल्या शांता शेळके यांच्या कवितेचा अर्थ आता पूर्णपणे समजु लागला आहे. भटकंतीची आवड ज्यांना लागली आहे त्यांना "घर सोडा" असे सांगावे लागत नाही. त्यांची पाऊले आपोआपच बाहेर वळतात. डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टींचा फायदा उचलत आम्ही दापोली भटकंतीचा कार्यक्रम आखला. तालुक्याचे ठिकाण असलेले हे शहर थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे "कोकणचे महाबळेश्वर" म्हणून ओळखले जाते.

लंच

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 10/04/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
लंच ऑफिस मधे जर तुम्हि लंच टिफिन घेवुन जात असाल तर लंच करताना मित्राबरोबर खाण्याचा डबा [डब्यातले खाणे]शेअर करता का?

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 10/04/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.

Ubuntu मदत new problem update

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 10/04/2010 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
Ubuntu काल download व install केल पण mouse चालत नाही,हा frequent problem असल्याच कळल blogs,forums वाचुन.तेथे solution दीलेले पण सर्व command line बद्दल होती व ती नक्की कुठे लिहायची ते नाही कळल.मी computer वगैरेचा course केला नसल्याने HTML codes,command lines वगैरेच फार ज्ञान नाही. Ubuntu चांगल असल्याच एकलय पण ह्या mouseच्या अडचणीमुळे नाही वापरावस वाटत.हा problem अजुन linux कडुन fix करायच बाकी आहे अस वाटत.पण कोणी माहीतीगार माहीती असेल तर सांगेल का?

मोनालिसाच्या बहिणी ?????

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 10/04/2010 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे अगदी लहानपणापासून संगीताचे बरे-वाईट संस्कार कळत नकळत घडत जात असले, तरी तसे चित्रकलेच्या बाबतीत मात्र होत नाही...... जगातल्या थोर चित्रकारांनी रंगवलेली काही चित्रे निदान डोळ्यांखालून जावीत, हा या धाग्याचा हेतु..... मोनालिसाच्या या बहिणी.....

प्रश्नमालिका

लेखक हेरंब यांनी शनिवार, 10/04/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा आपल्या देशासमोर प्रामुख्याने गरिबी, अशिक्षित वर्ग असे दोन तीनच प्रश्न होते. स्वप्नं मात्र भरपूर होती. आता इतक्या वर्षांनंतर पाहिले तर काय दिसते? सगळ्या स्वप्नांचा चुराडा आणि भरपूर जटील प्रश्न! सरकारी संस्कृतीप्रमाणे कुठलेच प्रश्न मुळाशी जाऊन सोडवायचेच नसतात. आता जे मोठे प्रश्न आहेत त्याची जंत्री पहा. १. काश्मीर प्रश्न २. अतिरेकी ३. नक्षलवाद ४. बांगलादेशी घुसखोरी ५. स्थानिक पक्षांची दादागिरी ६. भ्रष्टाचार ७. नैतिक अवमूल्यन ८. रुपयाचे अवमूल्यन ९.प्रदूषण १०. जातिवाद ११. आरक्षण १२. अंधश्रध्दा १३. भाववाढ १४. लोकसंख्या ही यादी अशीच वाढणे शक्य आहे.

पार्टी रे पार्टी

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 10/04/2010 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस अगदी विवाहित, कुटुंबवत्सल वगैरे असला म्हणून काय झाले, कधीतरी तो कनवाळू, दयाळू वगैरे जगन्नियंता त्यावर प्रसन्न होतो. कधीतरी अती होते आणि 'साल्यो, काही लाजाबिजा आहेत की नाही? किती दिवस झाले एकत्र बसून. तुमच्या साल्यांच्या रविवार -गुरुवारच्या सुट्ट्या, पोरांच्या परीक्षा आणि बायकांच्या कटकटीतून सवड अशी कधी मिळणार? असं ठरवून काही बसायला मिळणार नाही. बसायचं का आजचं? कुणाचं घर रिकामं आहे? तुझं? मग ठरलं तर! दोन तीन पेग हाणू, हा ठोंब्या चिकन करेल. व्हिस्कीचं माझ्याकडं लागलं. सोडापण आणतो मी. शिग्रेटी आपापल्या. साडेसातला बसायचं, अकरा वाजता आपापल्या घरी. पुढे ज्याच्या त्याच्या वकूबानुसार.

लावणी : मुंबईची सहल

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/04/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईची सहल
नागपुर पाहून झालं , नांदेड पाहून झालं , अमरावती पाहून झाली, लातूर पाहून झालं.... अहो इकडे बीड झालं, नगर झालं, नाशिक झालं, पुणं पाहून झालं.... तिकडे कोलापूर पाहून झालं, सांगली झाली, सोलापुर ही पाहून झालं.... आख्खा महाराष्ट्र पाहून झाला..... कोरस : आसं का? व्ह्यय तर मग.... अहो नागपुर पाहून झालं, नाशिक झालं, पुणं झालं ठाणं झालं, आता पाळी हाये मुंबईची इथं फिरून फिरून अंग माझं दमलं सवय नाही घामाची उपाय करा काही लाज राखून या गोड हुकूमाची अन मला चाखवाना कुल्फी

(या कंपूची दोन माणसे फिरतिल तुमच्या भवती)

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 10/04/2010 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच अन्य स्थळावर एका धाग्यात मी काही प्रतिसाद लिहिलेला असताना अचानक 'कंपू तुमचा पाठलाग न करो ही प्रार्थना' अशी धमकीवजा सूचना आली. मी भांबावलो. त्याच धाग्यात आधी मी औद्धत्य करून कंपूबाजीला आव्हान देतोय असं प्रश्नवजा विधान आलं होतं तेही दिसलं. तेव्हापासून ही भाई लोकं नक्की काय म्हणत असावेत याविषयी मनात विचार सुरू झाले. (त्यातूनच मूळच्या उत्कृष्ट काव्याचं विडंबन, केवळ भीतीपोटी झालं म्हणून कवीची क्षमा मागतो.) पुन्हा, अन्य स्थळावर हे मी अधोरेखित करतोय. मिपावर कंपूबाजी वगैरे काही नाही.
काव्यरस