लेखकयुयुत्सुयांनी शुक्रवार, 11/06/2010 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो,
कलादालनमध्ये फोटो टाकताना कृपया कॅमेरा वापरलात कोणता ते आवर्जून लिहा. या माहितीचा अप्रत्यक्ष उपयोग बराच आहे. कोणत्या कॅमे-याने किती चांगले (किंवा किती वाईट) फोटो येऊ शकतात ही माहिती नवीन कॅमेरा निवडताना/घेताना उपयोगी पडते. पिकासा सारख्या वेब-अल्बम मध्ये ही आणि इतर माहिती लगेच कळते. पण इथे डकवलेल्या फोटोंच्या बाबतीत तशी मिळत नाही. असो.
-युयुत्सु
लेखकहैयो हैयैयोयांनी शुक्रवार, 11/06/2010 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया
मित्रहो,
चेकोस्लोव्हाकिया देशातील नाडिग्रंथप्रेमींच्या प्रेमळ आग्रहास्तव येथील जनप्रिय प्रसिद्ध सदस्य नाडिग्रंथप्रेमी विंग कमाण्डर श्री. शशिकांत ओक हे एका महिन्याच्या दौर्यावर त्या देशी रवाना झाले आहेत. राजधानी प्राग येथे त्यांचा सुमारे एक महिना मुक्काम असेल. ह्या काळात भरगच्च कार्यक्रमाची आखणी असून योरोपातील अनेक ठिकाणांहून आलेल्या जनांकरिता प्रश्नोत्तरेदेखील होणार आहेत.
आपण सारे मिळून श्री. ओक सरांचे हार्दिक अभिनंदन करून ह्या परिषदेस शुभेच्छा देवू या.
धन्यवाद.
हैयो हैयैयो.
लेखकपाषाणभेदयांनी शुक्रवार, 11/06/2010 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
ही धुंद पावसाळी हवा
मंडळी, काव्यातील ओळीचा शेवटच्या शब्दाने पुन्हा नविन ओळ सुरू होणारी हे काव्य आहे. एक नवा प्रयत्न केला आहे. आस्वाद घ्या.
ती: ही धुंद पावसाळी हवातो: हवा हवासा गारवा
ती: गारव्यात तनू ही धुंदतो: धुंदीत रंगला खेळ नवा
दोघे: ही धुंद पावसाळी हवा....
लेखकसंजय अभ्यंकरयांनी गुरुवार, 10/06/2010 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
वाह तात्या!
संगीतातले अल्टिमेट काय असेल ते सारे या गाण्यात आहे.
जया, हरीभाई, लता, भूपेंद्र आणी तो आर. डी.!
ईश्वराने या सार्यांना या गाण्या साठी जवळ आणले!