योगायोग
योगायोग म्हणजे 'कोइन्सिडन्स' या शब्दाचा अर्थ एकाच वेळी दोन घटना घडणे एवढाच होतो. पण अशा असंख्य घटना क्षणोक्षणी घडत असतात. सगळ्यांनाच योगायोग म्हंटले तर त्याचे महत्व राहणार नाही. त्यातल्या आपल्याला महत्वाच्या वाटणार्या आणि परस्परसंबंध नसलेल्या दोन घटना अनपेक्षितपणे एका वेळी घडल्या तरच त्याला 'योगायोग' असे सर्वसाधारणपणे म्हंटले जाते. दोनापैकी एक जरी अनपेक्षित असली तरी कधीकधी तो योगायोग धरला जातो. सूर्य उगवला आणि सकाळ झाली याला योगायोग म्हणत नाहीत, कारण सूर्योदयाच्या वेळेलाच सकाळ असे नांव दिले आहे.
राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
"तशीच भाषा, तशीच शैली, तोच करारी बाणा.
महाराष्ट्राच्या उदयासाठी पुन्हा जन्मला राणा..
मराठ्याची कधी कुणा कलली नव्हती किंमत...
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब, तुम्हीच दाखवली हिंमत....
उठ मराठ्या, जागा हो..अशी जेव्हा साद दिली.....
मन सैनिकांनी...तेव्हा सर्वप्रथम दाद दिली......
आता आम्हा मराठ्यांमध्ये दिसणार नाही घबराट.......
कारण या महाराष्ट्राला लाभलेत आता "मराठी ह्रदयसम्राट"
मा. राजसाहेब ठाकरे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा...अगदी मनापासून..!!
आणि या महाराष्ट्रसाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभों..हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना..!!
!! मनसे जय महाराष्ट्र !!
(गाडीवरचा तो हात!)
ह्या लेखाची प्रेरणा ही चतुरंगचा "पाठीवरचा तो हात" हा खर्या अर्थाने हृद्य अनुभव आहे. त्यावरून जरी खालील अनुभव लिहीत असलो आणि म्हणून कंसात शिर्षक दिले असले तरी, ते चतुरंगच्या लेखाचे हे कृपया विडंबन समजू नये ही विनंती. त्याच्या लेखात महाराष्ट्रातील न भूतो न भविष्यती अशा निखळ व्यक्तीमत्वाचा जसा अनुभव आहे, तसाच ह्या लेखात अजून एक व्यक्तीमत्व जे कुणाला आवड न आवडो, त्याच्या शिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही अशा व्यक्तीचा जाता जाता अनुभव आहे. इतकेच काय ते साम्य...
माझी राजकीय विषयातील आवड लहानपणापासूनची. मी साधारण सातवीत, फार तर आठवीत होतो.
दो नैना और एक कहानी ..
दोघांपैकी कोणाचीच चूक नसावी आणि एकाला आतोनात त्रास व्हावा, याला काय म्हणावे ?
भेट तिची माझी
ती येईल का नक्की सांगितल्याप्रमाणे? की आयत्या वेळेस नवेच खेंगट काढेल? तिचा नवरा वैतागणार तर नाही ना, बायको सकाळी सकाळी तयार होऊन एवढी कोणाला भेटायला चालली आहे म्हणून?
मी असेच काहीसे विचार करत घरातून निघाले तेव्हा सकाळचे सव्वा आठ झाले होते. कोपऱ्यावरच रिक्षा मिळाली. रिक्षावाल्याला ''रुपाली हॉटेल, एफ्. सी. रोड'' सांगितले आणि मी निवांत झाले.
आज बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधील दूर परराज्यात राहायला गेलेल्या एका मैत्रिणीला भेटायचा योग जुळून आला होता. गेला आठवडाभर आमचे वेळापत्रक एकमेकींशी लपंडाव खेळत होते. ज्या दिवशी तिला वेळ असे त्या दिवशी नेमके मला काम असे.
मिसळपाव