Skip to main content

एका साधनेची समिधा

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 20/06/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत अनेक मोठ्या, कर्तृत्त्वावान पुरुषांच्या पत्नींनी आपापले आत्मचरीत्र लिहिले आहे आणि प्रत्येकवेळी त्या त्या पुरुषांच्या एका नव्या आयामाची ओळख समाजाला झाली. अशाच काहिश्या आशेने साधनाताई आमटेंचं "समिधा" वाचायला घेतलं. वाचु लागलो आणि वाचतच गेलो. बर्‍याच गोष्टी वाचताना स्तब्ध झालो पण तरीही न थांबता पुढचा शब्द वाचत गेलो.

काही किडे आणि फुलपाखरे........

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 20/06/2010 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
मघाशी टाकलेली फुले नविन आहेत. तिथे किडे आणि फुलपाखरे मिळाली नाहित. म्हणून काही काही जुनेच किडे लावतो आहे.

पुन्हा एकदा खाउच!

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 20/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा कविता... आजही ती वाचयला नाही तिच्याआयला! आज सार तसच घडल, मला आजही तीची नजर चुकवुन पाणी सोडायला मिळाल आज तिच्या वागण्यात संकोच नव्हता, बेशरमेचा फायदा उचलायचा माझा निश्चय होता. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, बर होत,ती आज पण घेउन आली होती. पावसाने फारच मेहरबानी केली, अंग भिजल्यावर ती मला 'चल घेउया' म्हणाली. तेव्हापासुन नशा काही अजुन उतरली नाही, आणि माझी हरवलेली वस्त्रे अजुन मिळाली नाहीत. - फाजील मन.
काव्यरस

रावणाची सीता

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 20/06/2010 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सीता जर रावणाला चाहू लागली अन् राम जर खलनायक ठरला तर रामायणाचे 'वामायन' होईल की नाही? अगदी तशीच स्थिती 'रावण' पाहिल्यानंतर (मायबाप दर्शकांची) होते. तब्बल साठ कोटींची दौलत ओतून, तेलगू-तमिळऱ्हिंदी अशा तिन्ही भाषेतील एकूण २२०० रिळे मणिरत्नमने अक्षरशः कचऱ्‍याच्या डबड्यात घातली आहेत. रावण पिक्चर काढून त्याला 'रत्ने' तर नाहीच पुरेसे 'मनी' देखील मिळणार नाहीत हे उघड सत्य आहे. रावणाचे ऍडव्हान्स बुकिंग तर सोडाच फर्स्ट डे फर्स्ट शो सुद्धा कुठेही हाऊसफुल्ल चा बोर्ड मिरवू शकलेला नाही.

I bet एवढा मोठा आंबा आपण पाहीला नसेल!! काही खुलासे.

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 20/06/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
येथे जाउन बघा! तो आंबा २० वर्षाच्या मुलाने हातात पकडला आहे,मुलगा सडपातळ असला तरी पंजा ब-यापैकी मोठा आहे.तेव्हा आंब्याच्या आकारावर शंका घेउ नका. आपणास माझ्या आंब्याच्या तोडीचे असे काहीच इथे दाखवता येणार नाही का? आणि हो हा आंबा पुर्ण झाडावर एकच आला होता. आंब्याची गि-हायक गेली मसनात!! काय विकायला नाही ठेवला!!

नैसर्गिक काष्टशिल्पं (माझ्या नजरेतुन)

लेखक jaypal यांनी रविवार, 20/06/2010 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"ये कौन चित्रकार है ? " हे माझं आवडत्या गाण्या पैकी एक गाण. निसर्गाची थोरवी, कलाकारी सगळ, सगळ ओतप्रत भरला आहे त्या काव्यात. भटकी जमात असल्याने ब-याच ठिकाणच्या भटकंती दरम्यान मला आढळलेली काही नैसर्गीक काष्टशिल्पं आपल्या समोर मांडतो आहे.

गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2010 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
गीत: भंगार डबा बाटली आसंल तर देवून टाका सिच्यूएशन: हिरो एक सीआयडी ऑफीसर. टास्क (मोहीम): एका गुंडाचा पत्ता काढायचा. हिरोने मग भंगारवाल्याचे रूप घेतले आहे. गाणे सुरू....
काव्यरस

असहमत! असहमत!! असहमत!!!

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 20/06/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
राग म्हणजे काय, लय म्हणजे काय, गायकी म्हणजे काय, तान म्हणजे काय, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वर म्हणजे काय, ते अण्णांकडूनच शिकावं
आज मिसळपावच्या एका स्तंभात वरील विधाने वाचायला मिळाली. ही बहूधा तात्यांची असावित कारण ते भीमसेनजींचे निस्सीम भक्त आहेत. एखाद्या कलाकाराचे भक्त असणे यात वावगं काही नाही.

मै सोला बरसका

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 20/06/2010 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
लॅच काढुन मी हॉल मधे प्रवेश केला. स्वयंपाक घरातुन आवाज येत होता. कुटुंबाचे मैत्रीणीबरोबर फोन वर बोलणे चालु होते. वाक्य कानावर आलो. तिथेच थबकलो. .>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> "अग ह्यांच्याबरोबर कुठे जायचे म्हणजे संकटच असते" ....... "अग, काल एका लग्नाला गेले होते. हे ऑफिसमधुन थेट आले. जरा उशिराच आले. आल्या आल्या ह्यांच्या फॅन क्लब ने घेराव घातला. साधारण १५ जणांचा ग्रुप होता. त्यातल्या एकाने प्रश्न विचारला. ह्यांनी उत्तर दिले. त्यातले ६ जण डोळ्यात पाणी येइपर्यंत हसले.