हॉट एअर बलून फेस्टीवल
पोरांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की इथे सर्वाना भटकायचे वेध लागतात. अर्थात तेही ठीकच आहे म्हणा कारण उन्हाळ्याच्या ह्याच तीन चार महिन्यात मनसोक्त भटकायला मिळतं. मग आहेच थंडीत बाहेर पांढरा एकसुरी रंग बघत दिवस रात्र घालवणं.
इथे एप्रिल महिन्यांपासूनच छोट्या छोट्या गावांच्या जत्रा सुरु होतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. त्यापैकीच 'हॉवेल' हे एक छोटंसं गाव. त्यांच्या 'हॉट एअर बलून फेस्टीवल' बद्धल बरंच ऐकलं होतं पण घराच्या अवघ्या तासा-दोन तासांच्या अंतरावर असूनही जाणं मात्र झालं नव्हतं.
मिसळपाव