Skip to main content

'चौरा' : विज्ञाननिष्ठ, चिकित्सक, बहुरंगी ‘राजा’माणूस !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 21/11/2021 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
चौरा व माझा मिपा परिचय उण्यापुऱ्या चार वर्षांचा. आमची प्रत्यक्ष भेट फक्त एकदाच. तरीसुद्धा मिपावरील प्रतिसादांमधून या राजाने जो मैत्रीचा पूल आमच्यादरम्यान उभारला तो अविस्मरणीयच. म्हणूनच चित्रगुप्त यांच्या धाग्यावर निव्वळ चार ओळींची आदरांजली लिहून माझे समाधान झालेले नाही. किंबहुना मी तेवढेच करून थांबणे हा चौकटराजांवरील अन्याय असेल. काल त्यांच्या निधनाची दुःखद बातमी वाचल्यापासून अगदी ‘आतून’ बरेच काही मनाच्या पृष्ठभागावर येत आहे. त्यांच्यावर अजून काहीतरी मनापासून लिहीले पाहिजे ही ऊर्मी स्वस्थ बसू देत नाही.

उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम

लेखक धष्टपुष्ट यांनी रविवार, 21/11/2021 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत भूलचुकीमुळे काही काव्यशास्त्रविषयक लेख "जे न देखे रवी" मध्ये लिहीत होतो. कालचा लेख इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. क्षमस्व! --- मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे. . या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत १. हर्फ गिराना काय प्रकार आहे २. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो --- या लेखाच्या व्याप्तीच्या बाहेर: १.

विपश्यना आणि रॅन्डम मी

लेखक पाटिल यांनी रविवार, 21/11/2021 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
(हे वाचणाऱ्यास विपश्यनेच्या दहा दिवसांच्या कोर्ससंबंधी अनुभवाने किंवा ऐकून वाचून माहिती असेल, असं गृहीत धरून लिहितोय.) १. तर फारा वर्षांनी एकदाचा दहा‌ दिवसांच्या सुट्टीचा जुगाड करून, पद्धतशीर बॅग वगैरे घेऊन, ट्रेनमधून उतरलो. रिक्षातून विपश्यना सेंटरच्या दिशेने जाताना 'कदम बंधू बिअर शॉपी' असा एक ओझरता बोर्ड दिसला. म्हटलं, कोर्स संपल्यानंतर आपल्यासारख्यांसाठी ह्या कदम बंधूंनी जवळच 'सोय' करून ठेवली आहे, हे एक बरंय. रिक्षातून उतरलो तर सेंटरच्या गेटवरच्या छोट्याशा हॉटेल कम् टपरीमध्ये दोन समवयस्क तरूण सिगरेट ओढत उभे.

मिपाकर 'चौकटराजा' यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 20/11/2021 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २० नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ५:२० वाजता, आकुर्डी पुणे येथे आपले प्रिय मिपाकर चौकटराजा (अरूण बर्वे) यांची प्राणज्योत मालवल्याचे समजले. मृत्यूचे कारण कोविड असल्याचे समजले. गेली काही वर्षे मी कायप्पावर त्यांचेशी नियमितपणे संपर्कात होतो. ते पियानोवर ओपी नय्यरची गाणी वाजवून रेकॉर्डिंग पाठवायचे, अलिकडे स्मूलवरही बरीच गाणी गात असत. मिपावर त्यांनी उत्तम दर्जाचे लिखाण केलेले असले तरी अलिकडे काही काळापासून ते मिपावर येताना दिसलेले नाहीत. गेले दोन-तीन आठवडे त्यांचेशी संपर्क होत नव्हता म्हणून काळजी वाटत होती, फेसबुक आणि स्मूलवरही ते येत नव्हते.

उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम

लेखक धष्टपुष्ट यांनी शनिवार, 20/11/2021 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे. . या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत १. हर्फ गिराना काय प्रकार आहे २. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो

डॉ वि ह सरांना आठवताना... भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 19/11/2021 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
9 1 डॉ विश्वनाथ हरी कुलकर्णी हे कैलासवासी झाल्याची माहिती ग्रहांकित च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. दिवाळी अंक बाजारात जाऊन विकत घेऊन वाचणारे कमी होत आहेत. त्यातलाच मी एक. ज्योतिष तंत्र आणि मंत्रच्या दिवाळी अंकात मुखपृष्ठ कथा करायला रमल तज्ज्ञ चंद्रकांत दादा शेवाळे यांनी विनंती केली होती.

तुझ्या घरातले अनारसे

लेखक चॅट्सवूड यांनी शुक्रवार, 19/11/2021 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या घरातले अनारसे कधी खायला मिळतील? माझ्या घरातले लाडू आता कधीही फुटतील!! तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या मला चहा बरोबर चालतील आमच्या चिवड्यांचे डबे आता रिकामेच राहतील तुझे ते चिरोटे (२) कायम लक्षात राहतील माझ्या त्या कडबोळ्या वातड होऊन जातील तुझ्या या फराळाला घरातले ही 'दात' देतील उन्हात टेरेसवर वाळवून वर्षभर पुरवून खातील...
काव्यरस

प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 19/11/2021 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचे शरीर पंच तत्व - माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन) पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो. हे संतुलन प्राकृतिक तत्वांच्या सहाय्याने ठीक करणे म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. भारतात प्राकृतिक चिकित्सा वैदिक काळापासून आहे. आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत शरीरातील कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे संतुलन प्राकृतिक तत्वांद्वारे केले जाते. योग, यज्ञ आणि आयुर्वेद ही प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा एक भाग आहे. गतकाळात सतत होणार्‍या विदेशी आक्रमण आणि युद्धांमुळे या पद्धती सामान्य जनतेपासून दूर गेल्या.

तोंड भरून बोला !

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 18/11/2021 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
गंमती वाक्प्रचारांच्या : भाग २ भाग-१ इथे ................................................................................................................... मागील भागात आपण हाताचे वाक्प्रचार एकत्र गुंफून एक गमतीशीर गोष्ट रचली. या भागात ‘तोंड’ या शब्दावरूनचे २५ वाक्प्रचार घेऊन अन्य एक गोष्ट रचली आहे. तोंडाचे वाक्प्रचार याहून अधिक माहीत असल्यास जरूर भर घालावी आणि गोष्ट पुढे चालू ठेवावी.

लोगो...

लेखक चिनार यांनी बुधवार, 17/11/2021 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
लोगो.. 'अ' कंपनीला 'ब' कंपनीने टेकओव्हर केलं. 'अ' कंपनी तशी जुनी पण गावठी. 'ब' कंपनी एकदम आंतेर्रराष्ट्रीय! काही तांत्रिक कारणाने 'अ' कंपनीच नाव बदलता येणार नव्हतं. त्यामुळे ती ब कंपनीची ग्रुप कंपनी म्हणून ओळखल्या जाणार होती. कागदी टेकओव्हर पूर्ण झाल्यावर हळूहळू प्रत्यक्षात कब्जा करणं सुरू झालं.रोजच्या रोज पॉलिसी,प्रोसेस, कल्चर, इथिक्स, कॉम्पलायन्स वगैरे शब्दांचा भडिमार सुरू झाला. मग कंपनीचा लोगो या विषयावर गाडी आली. आता अ कंपनीच नाव बदललं नसल्यामुळे आणि लोगो नावावरूनच बनलेला असल्यामुळे त्यात फार काही बदल करता येणार नव्हते. शिवाय त्या लोगोचा ब्रँडही मार्केटमध्ये ओळखीचा होता.