Skip to main content

लावणी: जाल हो राया उद्या

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 26/08/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी: जाल हो राया उद्या
जाल हो राया उद्या,रात आजची खास शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||धृ|| हात नका धरू हाती, सोडा मज थोडी लांब नाही जायची नको ओढा ओढी तुमच्या अशा वागण्यानं वेगळं वाटं खास शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||१|| तुम्ही शेवंती गजरा आणला मला माळला शुर रसीक पाहूनी तोरा जिव भाळला कसं जगावं तुम्हावीण लागली तुमची आस शृंगाराच्या राती थांबा आज विनवीते तुम्हास ||२|| कालच्या
काव्यरस

आतून किर्तन-वरून तमाशा

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी गुरुवार, 26/08/2010 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या वाचकांनो सप्रेम नमस्कार!!! मिसळपावची मनसबदारी मिळाल्याचा विरोप येऊन पडला होता पण दरबारात हजर झालो नव्हतो. आता झालो आणि एक पोस्ट टाकलीसुध्दा. आता ही माझी स्वत:ची ओळख करून देणारी पोस्ट - मिसळपाववर अशी पध्दत आहे की नाही ते माहित नाही पण अपने बारे में जरूर कुछ कहना चाहुंगा. तसा कानूनी पूछताछ करणारा रेडिमेड फॉर्म आहे व्यक्तिरेखा तयार करताना पण त्यात जास्त काही सांगता येत नाही. म्हणून इतर सगळ्या फॉर्म सारखा तोही निम्मा-अर्धा कोराच सोडून दिलाय. इथे का आलो?? येऊन काय करणार?? नसतो आलो तर काय फरक पडला असता? काय मिळणार इथे येऊन?

अफजल- कसाब पेक्षाही भयावह

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 25/08/2010 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
संसदेवरील हल्ल्याचा सुत्रधार मोहमद अफजल गुरु याचा दयेचा अर्ज अद्याप राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.माहितीच्या अधिकाराचा वापर करून पत्रकार अमन शर्मा यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे.काही प्रमुख वृत्तपत्रातून या बाबत छापून आले आहे.समस्त भारतीयांची क्रुर चेष्टा अशा भाषेत या घटनेकडे पाहावे लागेल.

शेरलॉक होम्सचे जग

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी बुधवार, 25/08/2010 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
शेरलॉक होम्सचे जग भाग १ पूर्वप्रकाशित: मायबोली आणि माझा ब्लॉग शेरलॉक होम्स हा विषय बर्‍याच दिवसांपासून मनात घोळतो आहे. विषय इंटरेस्टींग आहेच; त्याबद्दल असंख्य ठिकाणी छापून, लिहून आलेलं वाचूनसुद्धा शेरलॉकबद्दल मला लिहावं वाटत आहे - सखोल कायसं म्हणतात ते करायचा भुंगा डोक्यात गुईंगुईं करतोय. म्हणजे आंघोळ करताना नाही का एका कानात पाणी जातं आणि कितीही काही केलं तरी कानात सुईंफूईंबीईंईं असा आवाज चालुच राहातो तसं. हो..हो..शू:क्क्क्क..विषय गंभीर आहे..हे आवाज बिवाज बास आता.

पुतळे हटवा! इतिहास घडवा !!

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 25/08/2010 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याचे महापौर माननीय यानी जाहीर केल्याप्रमाणे लाल महालातून अखेर पुतळा हलणार तर! माननीय एका जबाबदार पक्षाचे असल्यामुळे ते दिलेली वाणी खरी करणारच. शेवटी दिलेला शब्द पाळणे महत्वाचे. त्या पुतळ्याचे काय करणार? सन्मानाने विसर्जीत करावा अशी एक सुचना (जर कुणाच्या भावना दुखत नसतील तरच!) --- आणखी काही सूचना. (हे सर्व केल्याने कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खात्री असावी) १. पुणे आणि इतर महत्वाच्या शहरातील पुतळ्यांची खानेसुमारी करावी आणि एक मोठा मास्टर प्लान बनवून असे भावना दुखवणारे सर्व पुतळे त्वरीत हलवावेत किंवा विसर्जन करावेत (ज.कु.भा.दु.