Skip to main content

मि. पा. वरच्या लेखनाचा दर्जा फारच खालवला आहे का? आणी मि. पा. 'मस्त' च्या ऐवजी आता 'ठीक' वाटू लागली आहे का?

लेखक येडबंबू यांनी गुरुवार, 26/08/2010 09:57 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1152
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मि.पा.चा दर्जा दिवसेंदीवस खालावत चालला आहे यात शंकाच नाही. कदाचीत मि.पा.ची वाढती लोकसंख्या हे देखिल याचे कारण असु शकेल. बर्‍याच जणांचा ईथे येण्याचा उद्देश "टाईमपास" हाच असतो. आम्ही मि.पा.वर येतो ते काहीतरी दर्जेदार, चांगले वाचायला मिळेल या आशेने. पण आजकाल मि.पा. वर अनेक,वेळा बालिश, दर्जाहीन लिखाण पहायला मिळते. आणि असल्या सवंग लिखाणाला मिळणार्‍या अलोट प्रतिसादा मुळे काही चांगले धागे वाचण्या आधिच पानावरुन वाहुन जातात. अनेक जुने चांगले लिहीणारे आयडी सुध्दा मि.पा. वरुन गायब झाले आहेत, टाईमपासच्या उद्देशाने आल्या मुळे मग "संध्यानंद" टाईप चे धागे मि.पा.वर पहायला मिळतात. पुर्वीच्या काळी आमचे मि.पा. असे नव्हते.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

तुमच्या मताशी सहमत आहे. आपल्या संपादक मंडळाने धागे आनि साहित्याला रेटिंग द्यायची पद्धत आणली तर???

In reply to by मी-सौरभ

अरेच्चा .. कौल उडाला म्हणून मला संदेश आला होता संपादक मंडळाकडून ... आता परत दिसतो आहे ... हम्म्म्म्म्म .... जादूटोणा आहे काय ? चला ठीक आहे ... ३२ मि.पा. करांना काय वाटते ते तरी कळाले आहे अत्तापर्यंत.

In reply to by येडबंबू

काय हवे, काय नको, लेखन कसे आहे/नाही इ. प्रकारच्या जाहीर चर्चा/काकू/कौल इ. ना धोरणाप्रमाणे मनाई आहे त्यामुळे धागा आधी अप्रकाशित केला होता, परंतु संपादक मंडळाने पुन्हा आढावा घेऊन धागा पुनःप्रकाशित करण्याचे ठरवले. धन्यवाद!

In reply to by संपादक मंडळ

मिपावर चांगले लेखन होत नाही असे नाही. पण फालतू उथळ धाग्यांची आवड असणारे वाचक आणि प्रतिसादकर्ते अधिक आहेत असे वाटते. कुठेही लेखनाचा दर्जा उंच असला की वाचकांचा असतोच असे नाही . केवळ टाइमपास, मनोरंजन करण्याच्या हेतूने येणारे याबरोबरच वादविवाद वाढवणारे मिपावर आजकाल अधिक दिसतात हे खरे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मी मि. पा. चा नियमीत वाचक आहे, वाढती लोकसंख्या हे कारण असु शकत नाहि त्यामुळे नवीन विषय, नवे विचार मिळ्णे अपेक्षित होते पन असे दिसत नाहि चर्चा खुपच उथळ असतात. तुमच्या मताशी पुर्णपने सहमत आहे. संपादकांनी विचार करावा.

हो ना .. कोण पण ऊठतो आणी काय पण लिहितो. हा कौल पण त्यातलाच एक. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कौलारू लोकांना आवरायची नितांत गरज आहे.

In reply to by प्रियाली

कौलारू लोकांना आवरायची नितांत गरज आहे. सहमत आहे..