Skip to main content

आणखी एक राहूल

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शुक्रवार, 27/08/2010 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक राहूल! बातमी पहा. बातमी एक दुर्दैवी गोष्ट ! भारतीय जनता पक्षाच्या आतील गोटातील काही पॉवर ब्रोकर पैश्यांसाठी त्यांना प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करून यशस्वी पण होतील. ज्यांनी आयुष्यभर पक्ष्याचा प्रचार केला त्यांच्यावर खुप वाईट दिवस येतील. १. हे गुणी बाळ प्रवेश केल्यावर वडिलाच्या पुण्याईवर सर्व धुरिणांना " मार्गदर्शन " करतील. २.यांनी लावलेले दिवे इतके प्रकाशमान आहेत की कार्यकर्ते भांबाउन जातील.

दहा लाखाची लॉटरी

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 27/08/2010 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
दहा लाखाची लॉटरी आज सकाळी ९.१८ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर, +९२३४२७९३६५१५ या नंबरवरून एक कॉल आला. मला दहा लाखाची लॉटरी लागली असे सांगण्यात आले. त्यासाठी मी त्यांना माझे पुर्ण नांव आणि राशनकार्डाचा नंबर सांगावा असा आग्रह होता. बॅंक अकॉउंट नंबर वगैरे जाणून घेण्यात त्यांना फ़ारसा रस दिसला नाही. त्यावरून हा प्रकार निव्वळ आर्थिक फ़सवणुकीचा नसून काही अवांतर गौडबंगाल असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मला वाटते. . . . मी दहा लाखाचे काय करू?

संपादकांच्या कथा आणि व्यथा

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 27/08/2010 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमर : मुळात या शीर्षकाचा लेख लिहावा ही कल्पना मिभोंनी आमच्या डोक्यात भरवून दिली त्यामुळे या सगळ्या भानगडीत मुख्य दोष त्यांचा आहे. मी फक्त लिहिण्याचं काम केलं. तसंच हे लेखन हलक्या फुलक्या, खेळीमेळीच्या वातावरणात घ्यावं ही नम्र विनंती. पुन्हा, माथी भडकलीच तर मिभो जबाबदार हे लक्षात असू द्या.) Be not afraid of greatness; some are born great, some achieve greatness, and others have greatness thrust upon them. शेक्सपिअरची थोरवी अशी की गेली चारशे वर्षं त्याचं थोरवीविषयीचं हे विधान अजून टिकून आहे. थोरवी कशी का मिळालेली असेना, थोर लोक नेहेमीच जगासमोर असतात. जग त्यांचा उदोउदो करतं.

श्री. श्री धमाल मुलगा यांचे अभिनंदन

लेखक निखिल देशपांडे यांनी शुक्रवार, 27/08/2010 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल मिपाचा दर्जा खुप खालवलाय म्हणे.. सारखे कैच्या कैच फुटकळ धागे येत असतात!!!! मग अशा फुटकळ धाग्यात आम्हीही एक भर घालावीच म्हणतो. संपादक मंडळाला आमचा धागा उडवायचा पुर्ण अधिकार आहे याचे भान आम्हाला आहेच. पण मिपाच्या लेखनप्रकारात आम्हाला सद्भावना, शुभेच्छा आणि अभिनंदन असे लेखनप्रकार दिसले आणि आम्ही हा लेख लिहायची हिम्मत केली. (आता तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला कळलंय की संपादक मंडळाला असे अभिनंदनाचे धागे आवडत नाहीत. कोण म्हणे रे तो आम्हाला कसे कळले??? अरे संपादक मंडळात राहुन अशा बातम्या कळत नाहीत रे भौ. त्यासाठी खास उपक्रमावर जाऊन रिकामटेकड्या लोकांचा खरडवह्या चाळ्यावा लागतात Wink.

आणखी एक तळीराम: श्री. वि. रा.भाटकर यांचा

लेखक पैसा यांनी गुरुवार, 26/08/2010 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहान असताना आमच्याकडे अपूर्व नावाचं डायजेस्ट (रीडर्स डायजेस्ट सारखं) येत असे. तेव्हा एकदा त्यात “मला दारू चढत नाही” अशी एक अफलातून कविता आली होती. काळाबरोबर ती विस्मृतीत गेली. पण हल्लीच आणखी कसलातरी संदर्भ शोधताना महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर ती दिसली आणि परमानंद जाहला. कविता मुळात खूप जुनी, म्हणजे 1961 ची. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे कवि श्री. वि रा भाटकर यांच्याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता नव्हतीच. पण “अपूर्व” मध्ये ही कविता छापताना असा उल्लेख दिला होता की कवि: वि. रा.

भटकंतीतली काही क्षणचित्रं

लेखक जिप्सी यांनी गुरुवार, 26/08/2010 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
आरंभी वंदिन गडांचा राजा :- राजगड राजगड :संजीवनी माची राजगड :- धुक्यात हरवलेला बालेकिल्ला ५ पांडवांचा डोंगर

खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 26/08/2010 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत सध्या खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा देशात सर्वदूर गाजतोय. खासदारांच्या पगारवाढीबद्दल सर्वसामान्य जनतेत विशेषत: शेतकरी वर्गात प्रचंड रोष असणारच, असे गृहीत धरून आलेली संधी "कॅश" करायला हवी, अशा उद्देशाने एका संपादकाने मला मेल केली. त्यातील मजकूर असा.

आनंदात जगा

लेखक स्पा यांनी गुरुवार, 26/08/2010 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदात जगा आयुष्य एकदाच मिळत :)