Skip to main content

मूव्हींग ग्राफिटी

लेखक भीडस्त यांनी सोमवार, 30/08/2010 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
वाहनांच्या पाठीवर लिहिलेला मजकूर खूपच मनोरंजक असतो.लांबवरच्या कंटाळवाण्या प्रवासातला शीणवटा क्षणात दूर करण्याचं सामर्थ्य ही कधी भावनाप्रधान तर कधी चटकदार असणारी वाक्यं अंगी बाळगून असतात. पण आताशा हे लिखाण मनोरंजनाबरोबरच उद्बोधनाचंही काम करत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर चालणार्‍या ट्रकच्या मागे वाचायला मिळालेली वाक्यं चांगलीच मासलेवाईक आहेत. १) जीवनाच्या वाटेवर सत्कार्य करताना कुत्र्यांपेक्षा माणसंच जास्त आडवी येतात.

पाकिस्तानात आलेला पुर व त्याला मदत करायची झालेली भारताला घाई

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 30/08/2010 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानात पुर आला. आतोनात नुकसान झाले. आपण माणुसकी म्हणुन ५० लाख डॉलर्स मदत देऊ केली आहे. गेले एक महीना भर आपण प्रयत्न करत आहोत की पाकिस्तान ने भेट कबुल करावी म्हणुन. पाकिस्तान कधी म्हणते कि त्याला भारताकडुन भेट नको. खाण्यापिण्याच्या गोष्टींवरच्या वेष्टणावरचे भारताचे चिन्ह काढुन मग ते पुर ग्रस्ताना वाटतानाची चित्र दुरदर्शन वर दाखवली जात होती ती सगळ्यानी पाहीलीच असतीलच. मदत मिळणा-यांना समजु नाही की भारताने मदत दिली आहे त्यापेक्षा भारताचा अपमान कसा होईल ह्यातच पाकिस्तानी नेत्यांना स्वारस्य आहे असे दिसते. आपण फारच आग्रह धरला म्हणुन त्यानी भेट कबुल करायचे ठरवले.

सौदी मध्ये मशिदींवरील स्पिकरला बंदी यावर

लेखक शेलार मामा मालुसरे यांनी सोमवार, 30/08/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
एच.जे.एस.च्या वेबसाईट वरील मजकुरानुसार, Ban on mosque-loudspeakers fitted in Saudi Arabia August 25, 2010 Shravan Krushna Pratipada Kaliyug Varsha 5112 Mumbai(Maharashtra): Ban has been imposed in Saudi Arabia to use loudspeakers on mosques. All loudspeakers in Mecca have been made non-functional by the Saudi Government as a stringent step towards controlling noise pollution. Here, even a small mosque uses loudspeaker to sound ‘baang’. The month of Ramzan crosses all limits of use of loudspeakers and sound pollution.

पांढरा दहशतवाद ?

लेखक गांधीवादी यांनी सोमवार, 30/08/2010 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारण्यांचा पांढरा दहशतवाद ठेचण्यासाठी कुठेतरी भगवा दहशतवाद जन्माला यायलाच हवा. चिदंबरम 'हे कायद्याचे राज्य आहे' असे सांगतात, तिथेच जर कायद्याने कोणी वागले तर त्याला मारून टाकण्यात येते, हे बरोबर आहे का ? सतीश शेट्टी सुद्धा असेच मारले गेले, काय गुन्हा केला होता त्यांनी ?

वल्कले कि कपडे ? **

लेखक इंटरनेटस्नेही यांनी सोमवार, 30/08/2010 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
सदर लेखन वाचण्यापुर्वी http://www.misalpav.com/node/14127 हा धागा वाचावा ही नम्र विनंती! वल्कले कि कपडे ? आमच्या वेळी कपडे ही कल्पना फारशी प्रचलात नव्हती...

एका तेलियाने

लेखक ऋषिकेश यांनी रविवार, 29/08/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय राजकारण हे जितकं रोचक तितकंच क्लिष्ट. तिथे एकाच वेळी प्रत्येक जण आपला पट मांडतो, आपली चाल खेळतो आणि त्याच वेळी प्रत्येक जण इतरांच्या पटावरचे प्यादे असतो. अश्या ह्या बहुआयामी राजकारणात जसजसं जग जवळ येऊ लागलं तसतशी अधिक क्लिष्टता व प्रसंगी अधिक रोचकता येऊ लागली. त्याच बरोबर हा पट शांत डोक्याने मांडून व इतरांच्या पटांवरील आपली परिस्थिती लक्षात घेऊन ज्यांनी हा खेळ खेळला ते त्या त्या मार्गाने पुढे गेले व इतर अनेक जण त्या खेळात वाईट प्रकारे भरडले गेले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर कोणत्या एका गोष्टीभोवती आंतरराष्ट्रीय राजकारण फिरलं हा प्रश्न विचाराल तर "तेल" हे उत्तर कोणीही देईल.

बहुगुणी वडे

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी रविवार, 29/08/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! आज आपण बहुगुणी वडे तयार करून पाहाणार आहोत. ही पाककृती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे स्वत:च्या जोखमीवरच या पाककृतीला हात घालावा. ही पाककृती फसल्याने पट्टीच्या खवय्यांनाही बध्दकोष्ट, अजीर्ण, कफ आणि बर्‍याच वेळा वात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाणार्‍यांना उबळ, उलटी, मळमळ, अंगाचा दाह, माथेशूळ उठणे इत्यादी त्रास झाल्यास तात्काळ पाककृती गुंडाळावी आणि काढता पाय घ्यावा - त्यांच्या पचनशक्तीला दोष देऊ नये आणि समजूत काढण्याच्या तर बिलकुल भानगडीत पडू नये.

बेहती हवा सा था वो..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 29/08/2010 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
बेहती हवा सा था वो...(येथे ऐका..) ३ इडियटस् चित्रपटातलं हे अप्रतिम गाणं. एका हरवलेल्या मित्राबद्दलचं हे मनोगत.. विशुद्ध, निरपेक्ष मैत्रीसारखं या दुनियेत दुसरं काही नाही.

हे कसले औदार्य?

लेखक केशवपुत यांनी रविवार, 29/08/2010 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज रविवार!!! म.टा. वाचायला घेतला, त्यामध्ये भारतकुमार राऊत यांचा लेख वाचनात आला..... हे कसले औदार्य? उत्तर भारतात जसे पावसाचे तांडव सुरू झाल्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे, त्याहून अधिक भयानक परिस्थिती पाकिस्तानात आहे. ज्या बातम्या हातात येत आहेत, त्यावरून दिसते की, दोन तृतियांश पाकिस्तानला पुराने वेढले आहे. कदाचित, एव्हाना परिस्थिती काबूत आली असेल, पण पुरानंतरची रोगराई, निर्वासितांचे प्रश्न आणि उद्योगांचे पुनर्वसन या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पाकिस्तानी सरकारला अनेक महिने झंुजावे लागेल.