Skip to main content

या रब्बा !! एक नवचित्रपटसंगीत अभ्यासिका

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 03/09/2010 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : आमचा हा लेख वाचुन एखाद्याने कपाळावर हात मारुन 'या रब्बा' म्हणल्यास आम्ही जबाबदार नाही. संगीताविषयी आम्हाला लहानपासुन प्रंचड प्रेम आणी आदर आहे, ते प्रेम भाषेच्या,प्रांताच्या,जातीच्या आधारवर विभागलेले नाही,मग ती संगीता जाधव असो वा जोशी,यच्च.संगीता असो वा कंदास्वामी नागार्जुना सिंथेल रेड्डी असो...अरे हे काय बोलतोय..सॉरी-सॉरी ..बाकी संगीता जाधव होती मात्र खंमग, म्हणजे कस सगळ जागच्या जागी,बांधा,नाक-डोळे,कांती,केशसंभार वगैरै कस एकदम बघत रहाव अस, एकदा तिला गाठुन (हो हो गाठुनच ,सध्या बया युरोपात 'जिलब्या' तळते असे एकुन आहे.) विचारायल हव की तुझ्या पत्रिकेत एकुण किती ग्रह आहेत ते ?

इतिहासाचे पुनर्लेखन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 03/09/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच. असो.. तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल. आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :- १) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ?

''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन!

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 03/09/2010 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात उद्या, म्हणजे ४ सप्टेंबर २०१० रोजी, शिक्षण हक्क समन्वय समितीच्या वतीने ''मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या'' आंदोलन! सध्या महाराष्ट्र शासन मराठी शाळांना मान्यता देण्याऐवजी मराठी माध्यमाच्या ज्या शाळांना अद्याप मान्यता मिळालेली नाही त्या शाळाच बंद करत आहे. केंद्र सरकारच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराच्या कायद्यामुळे मराठी माध्यमाच्या व शासनाची मान्यता नसलेल्या सर्व शाळांपुढे अस्तित्त्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नि:शब्द ……! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शुक्रवार, 03/09/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नि:शब्द ……! ! ! प्रीतीची आब अपुल्या, तू कधी ना राखली, अर्पिले सर्वस्व तुजला, परी प्रीत तू ना जाणली. होता कधी अधिकार तुजवर, तोहि अता ना राहिला, आसवाचा हक्क माझा, तोहि तू ना ठेवला. विरहाचे दुखः माझे, सांगू कुणा, आणिक कसे ? अंतरीचे शब्द शब्द, नयनांत मी आणू कसे ? निरंजन वहाळेकर
काव्यरस

पारध

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 03/09/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
"भिंतींवर थुंकणारा माणसाची औलाद नसेल" या खास पुणेरी पद्धतीच्या पाटीने आमचे जंगी स्वागत केल्यावर आम्ही आमचा मोर्चा तिकीटखिडकीकडे वळवला. प्रभातच्या दारावर तिकीट घेणारे आजोबा मी गेल्या १८ वर्षांपासून बघत आलोय. ते अजूनही तसेच दिसतात. पुणेरीपणाची 'सिनेमा बघायचाय तर बघा नाहीतर शनिवारवाडा बघा पण दारातून लवकर टळा' अशी एक खास मिजास चेहर्‍यावर ठेवून ते आत्मीयतेने तिकीटे फाडतात. तिकीटखिडकीवर मी ५०० ची नोट देत "दोन द्या" असे म्हटल्यावर तिथल्या माणसाने चेहर्‍यावरची सुरकुतीही न हलू देता थंडपणे "सुट्टे द्या!" अशी पुणेरी संयत डरकाळी फोडल्यावर मी गुपचूप सुटे काढून दिले.

दुबई ला जाताय..जरा जपून

लेखक अशक्त यांनी शुक्रवार, 03/09/2010 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक ढकलपत्रातून अस कळल की कोणाच्या तरि मित्राला खसखस बाळगल्या बद्दल दुबई मध्ये २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. लहानपणी आम्ही चार आण्याची खसखस...................फसफस...अस काहितरी गाण म्हणायचो. खसखस अनारश्यात खाल्ल्याचे आठवते. म्हणजे आता दिवाळी ला फराळ करुन प्रवास केला तर तुरुंगाची हवा खावी लागेल. ही बातमी बघा http://www.boddunan.com/forums/11-general-discussions/70531-a-very-very… थोड गुगल करुन पाहील, बातमी मध्ये तथ्य आहे असे वाटते.

मदत हवी आहे

लेखक priya_d यांनी शुक्रवार, 03/09/2010 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मि मिपावर नवीनच सभासद झाले आहे. येत्या गणेशोत्सवात म्हण्ण्यासाठी (माझ्या ८ वर्षाच्या मुलाला) काही सोपे श्लोक किंवा छोटी गाणी इ. हवे आहे. कोणी मदत करु शकेल का ? लिरिक्स सुध्दा चालेल. प्रिया

स्वार्थी लोकशाहीला कुठेतरी अटकाव घालायलाच हवा. पण कसा ?

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 03/09/2010 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
माझा महान भारत स्वतंत्र झाल्यापासून जेमतेम ६० वर्षच झालेली असताना त्याच्या एकमेवाद्वितीय महान अश्या लोकशाहीला जी वाळवी(कीड) लागली आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. ती वाळवी कमी करण्याचे नानाविविध उपाय जनता सुचवत आहे. त्यातलाच एक उपाय म्हणजे "माहिती अधिकार". ह्याचा वापर जरा कुठे सुरु झाला नाही तोवर हा अधिकार वापरनार्यांवर आणि प्रत्यक्ष त्या अधिकारावर रोज कुऱ्हाड कोसळू लागली आहे. पण कित्येक नागरिक अजूनही हे (माहिती अधिकाराचे) शास्त्र हातात घेऊन आज त्या वाळवीशी प्राणपणाने लढताना दिसतात.

नारळी भात.....

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 03/09/2010 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- २ वाट्या जुने तांदूळ, १ नारळाचा चव (खोवलेला नारळ) , २ वाट्या चिरलेला गुळ(पिवळा), १/२ वाटी साजूक तूप, ५/७ लवंगा, ९/१० बदामाचे केलेले काप,काजूचे तुकडे १०-१२, वेलदोड्याची पुड १/२ चमचा,पाव वाटी बेदाणे. कृती : तांदूळ धुऊन तासभर ठेवावेत. दोन चमचे तूप तापवून त्यात लवंगा टाकाव्या व त्यावर तांदूळ घालून परतावे. नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी घालून मोकळा भात करून घ्यावा. शिजलेला भात परातीत पसरून मोकळा करावा नंतर नारळाचे खोवलेले खोबरे व गूळ एकत्र शिजवून घ्यावे व त्यावर वरील भात घालून भात सारखा करावा.

गण: माझ्या गणाला गणपती आले

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 03/09/2010 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
गण: आमच्या गणाला गणपती आले
आमच्या गणाला गणपती आले वंदन करूनी मस्तक झुकले ||धृ|| रिद्धीसिद्धीचा स्वामी तू गणपती शरण आलो आम्ही अल्पमती कार्यारंभी दावूनी उपस्थीती दयाबुद्धीने आम्हा पाहीले आमच्या गणाला गणपती आले ||१|| कलाकारां होवोनी स्पुर्ती जगावेगळी मिळण्या किर्ती कला आगळी सादर करण्या कलाकार सारे एकच झाले आमच्या गणाला गणपती आले ||२|| सारी विघ्न
काव्यरस