Skip to main content

परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 07/09/2010 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे. ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो. तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे.

बेक्ड मोदक

लेखक नेहरिन यांनी मंगळवार, 07/09/2010 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
सारणासाठी साहित्य:- २ वाट्या सुकं खोबरं, १टेबलस्पून खसखस(भाजून पूड करुन), १वाटी पिठी साखर, १टी स्पून वेलदोड्याची पावडर, चिमुटभर मीठ. पारीसाठी साहित्य:- १वाटी बारीक रवा, १वाटी मैदा, १/२ वाटी दूध आणि पाणी, १टी स्पून मीठ , १चिमूट बेकिंग सोडा, १ टेबलस्पून वनस्पती तुप. From

आंब्याचे मोदक

लेखक नेहरिन यांनी मंगळवार, 07/09/2010 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव जवळ आल्याने मोदकांचा वेगवेगळ्या पाककृती देत आहे. आंब्याचे मोदक सारणासाठी साहीत्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आब्यांचा मावा (साटे), चिमुटभर मीठ, अर्था चमचा साजूक तुप पारीसाठी साहीत्य- दोन वाट्या तांदूळाचे पीठ, एक टेबलस्पून लोणी, अर्धा चमचा मीठ, पाणी From

सार्वत्रिक सक्तीचे शिक्षण कसे राबवावे?

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 07/09/2010 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मित्रासबरोबर काल गप्पा चालल्या होत्या. त्याने सांगितलेला हा प्रसंग.. "त्याचा इस्त्रीवाल्याच्या मुलाला शिकायचे नाही असे तो इस्त्रीवाला माझ्या मित्राला दोन वर्षांपूर्वी सांगत होता. तेव्हा मित्राने कारण विचारले असता त्याला शाळेत जे शिकवतात ते आवडत नाही (आणि त्यामुळे नीट येतही नाही). त्याची सगळी आवड गाड्यांचा "मेकॅनिक" किंव तत्सम मशिन्सना उघडण्यात आहे आणि शाळेत ते काही शिकवत नाहीत. इस्त्रीवाला नुकताच गावाहून आला होता. मुलगा गावी असताना नियमित शाळेत जात असे त्यामुळे त्याच्या पायाभुत गोष्टीच कच्च्या होत्या. त्याला इंजिनियर हो म्हणणे धाडसाचे ठरले असते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख

लेखक टग्या टवाळ यांनी मंगळवार, 07/09/2010 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जुन १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन मुख्य भूमिकांवर शिवसेना काम करते. १९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेनेनेच केलं.( शिवसेना पक्शावर बोलण्या सारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत )आक्रमकपणा हा शिवसेनेचा बाणा आहे, आणि आंदोलन करणे हा शिवसेनेचा स्वभाव आहे. "तोंड वाजवून न्याय मिळत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळावा - पण न्याय हा मिळालाच पाहिजे!" हि साहेबांची शिकवण आहे. तरी राज्यात शिवसेनेच सरकार का येउ शकत नाही. लोकांना शिवसेना हि विरोधी बाकांवर च हावी आहे ?

या वाक्यांचा अर्थ काय?

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 07/09/2010 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर फिरतांना अचानक काही संस्कृत वाक्ये दिसली. त्यांचा अर्थ काय असावा हा प्रश्न मनात आला तरी जाणकारांनी आपापल्या परिने (विजुभाऊंची नव्हे) उत्तरे द्यावी ही णम्र इनंती न लेखनं न व्यनीं तदपि च न जाने खरडमहो। न प्रतिसादं सहमतम् तदपि च न जाने च्योपपेस्तम् । न जाने धोरणम् तदपि च न जाने डुआयडीम्। परं जाने मालकानुसरणं क्लेशहरणम्।। संकेतस्थळे सदस्यास्ते बहव: सन्ति सरला:। परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव मित्रम्। मदीयोऽयं त्याग: समुचितमिदं नो तव आर्य। कुसदस्य जायेत क्वचिदपि कुसंपादक न भवति।। कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा