काळेवाडीचा पुणेरी पाहुणचार(?)
पाचचा गजर झाला आणि नानगुडे पाटील उठले. अंघोळ करून त्यांनी हनुमान चालीसा वाचली आणि अभ्यास चालू केला. साडेसात-आठच्या सुमारास अभ्या उठला. थोड्या वेळ gallery मध्ये जाऊन त्याने आजूबाजूला नजर टाकली. (का म्हणून विचारू नका.) हळूहळू काळेवाडी आघाडी जागी झाली. (तशी ती चोवीस तास जागी असते कारण जहापन्हा पहाटे कधीतरी झोपतात.)
मग नऊ वाजता बंगाना जाग आली. बंगानी थोडा वेळ पडल्या पडल्या विचार केला आणि मग पंख्याकडे नजर टाकली. (ती त्यांची खासियत आहे.) शेवटी बंगानी आता उठायला पाहिजे असा निर्णय घेतला. बंगांनी अंघोळ उरकून घेतली व खोलीला कडी लावून आतमध्ये रामरक्षा वाचायला चालू केली.
मिसळपाव

