Skip to main content

आजकाल..खरंतर..आणि आठ पैलू..

लेखक गवि यांनी मंगळवार, 23/11/2010 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
ओल्या मोज्यांचा येतो तसा शब्दांचा वास येतो. लोक लिहितात. बोलतात. आपण वास घेतो. "आजकाल" या शब्दानं सुरुवात झाली की टीकेचा, निराशेचा, अपचनाचा, वार्धक्याचा, त्रिफळा चूर्णाचा वास सुरु. "आजकाल" हा एवढा शब्द ऐकून मनाची निराशा सुरु करून टाकावी.

स्वैर विचार: १ कलाकार, २ चित्रपट, १ नाव

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 23/11/2010 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
CBFC कडून दिलेल्या जाणार्‍या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली. असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही. त्यातील काही नावे म्हणजे: 'संतान' - कलाकार जितेंद्र. जुना चित्रपट आला होता १९७६ मध्ये. आणि त्यानंतर १९९३ मध्ये. पहिल्या चित्रपटात जितेंद्रनेच संतान साकार केला होता.

गुंजग्रामीचे दिवस

लेखक यकु यांनी मंगळवार, 23/11/2010 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

काहिच्या काहि शब्द प्रयोग करुन भाषा घाण करु नका.

लेखक अभिजित - १ यांनी मंगळवार, 23/11/2010 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
मि इथे मिसळ्पाव वर बघतो कि बरेच लोक " काहिच्या काहि " या सरळ शुध्ध शब्दा एवजि " कै च्या कै " हा शब्द फार आवडीने वापरत असतात. हे असे करण्याचे कारण काय ? रिकलायनर वर बसुन असलि भाषा वापरलि कि माति चा सुगन्ध अन्गि लागतो का ? पण त्याच्याकरता मराठिचि अशि मारु नका !! शक्य तिकडे शुध्ध भाषा वापरा. नाहितरि भाषेवर सगळ्य बाजुने आक्रमण सुरु आहेच. सम्पन्न होत आहे भाषा या आक्रमणाने ?? अरे आता साजरा होणे या सरळ शब्दा एवजि पण लोक हा सम्पन शब्द वापरु लागले आहेत.

खिचडी : दिवाळी निमित्त सहकाऱ्यांनी सादर केलेले एक छोटे नाटक.

लेखक Manoj Katwe यांनी मंगळवार, 23/11/2010 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी निमित्त एकत्र जमून आमच्या कंपनीतील काही सहकार्यांनी मनोरंजनासाठी 'खिचडी' हे नाटक सादर केले. फिल्मी संवाद, घरगुती कुरबुर, विमान प्रवास आणि ऑन-सायीटला जाण्याची इच्छा ह्या सगळ्यांची खिचडी घेऊन आपल्याला १०-१५ मिनिटे दिलखुलास हसविण्यासाठी (त्यांच्या परवानिगीने) मी हे नाटक आपल्या समोर ठेवत आहे. सादर करत आहेत, 'ढपाळ आणि सुबुद्धी परिवार'.

विडा

लेखक शुचि यांनी मंगळवार, 23/11/2010 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर फिरता फिरता अनेक सद्गुरुस्तोत्रे वाचनात येतात. काही कळतात बरीचशी कळत नाहीत. काही संस्कृत स्तोत्रांची गोडी भाषांतरात हरवते. पण बरेचदा योग जुळून येतो आणि एखादं अप्रतिम, अनवट स्तोत्र समोर येतं जे की जे मन उजळून टाकतं, एक दिव्य आनंदानुभव देऊन जातं. असं स्तोत्र वाचून वाटतं - अरे हेच वाचण्यासाठी आपण मराठी मातीत जन्माला आलो. हेच ते सर्वोच्च, सर्वांगसुंदर स्तोत्र. आता याहून अधिक पाहणे उरले नाही. हा अनुभव मला "विसरू कसा मी गुरुपादुकाला" वाचताना आला. हाच देजा वू अनुभव "गुरु।गुणालया।परापराधिनाथ सुंदरा।" हे स्तोत्र वाचताना आला.

प्रतिबिम्ब

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 22/11/2010 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या छोट्याश्या कौलारू घराच्या एका कोपर्यात धुनीवर टांगलेला आरसा तेजाळला आहे नितळ आणि रिक्त आरशात तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटते आहे. माझ्या पादुका दरवाजाजवळच्या कोनाड्यात धीरोदात्तपणे प्रतिक्षा करत आहेत. हे घर जिथे मी सारे जीवन व्यतीत केले. जिथे काही क्षणांपुर्वीच प्रखर सूर्यप्रकाशात सचेतन मी भलत्याच खोड्या काढत खळखळून हसायचो. आज इथे संतजन लोटले आहेत. एकतारी छेडत निर्गुणी भजने गात आहेत. त्यांचा आनंद ...
काव्यरस

आज अचानक गाठ पडे....

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 22/11/2010 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षे झाली त्याचा शोध घेणं सोडुन दिल्याला, शाळेत असताना विवेकानंद आणि काही इतर जणांची पुस्तकं वाचुन मनाचे विचार एकदम प्रग्लभ वगॆरे झाले असं वाटलं होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा द्रुष्टिकोनच बदलला होता. त्यात भर म्हणुन पुढच्या शिक्षणासाठी गावातल्या सिद्धस्वामी मंदिराची शिष्यव्रुत्ती मिळालेली आणि त्या साठी त्यांच्याच संस्थेच्या कॊलेजात जावं लागलं. तिथल्या त्या सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना,ध्यान या मुळं तर सामान्य जीवनाबद्दलचं आकर्षणच नाहीसं झालं अशी वेळ आली होती. शिक्षण संपलं आणि शेजारच्याच गावांत नोकरीवर रुजु झालो.

कर्ण हा दानशूर होता, पराक्रमी होता पण त्याचावर खरच अन्याय झाला होता का ?

लेखक आत्मशून्य यांनी सोमवार, 22/11/2010 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
मूळातच कर्णाचा जन्म हा त्याची आई कून्ती कोणत्याही राज्याची राणी अथवा सून असताना झाला न्हवता,नीयोग क्रीया म्हणून तर नक्कीच न्हवे. मग केवळ कून्ती पूत्र म्हणून कर्ण हा पांडव अथवा एखाद्या राज्याचा वारस ठरतो काय ? कर्ण दानशूर होता, पराक्रमी होता म्हणून त्त्याने स्वतःचे राज्य बहूबळावर निर्माण करणे योग्यच आहे, त्या़स् क्षत्रिय न मानणे हे चूक आणी अन्यायकारकच.