Skip to main content

नवा दे घाव वेदनांना...........

लेखक मयुरेश साने यांनी बुधवार, 01/12/2010 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
किनारे लोटुनी सारे प्रावाही शांत वाहताना किती गर्दी तुझी आहे? इथे एकांत असताना मुका होईन मी जेव्हा तुझ्या दे त्रास ओठांना चुका मोजू नको माझ्या सजा दे खास ओठांना किती ओशाळले सारे पुरावे न्याय होताना तुझा आभास वावरवा अशी दे स्मृति आठवांना शब्द माझे मागती ती तुझी दे चाल गीतान्ना चन्द्र तू चांदणे मी लाजवू या चांदण्याना झोप माझी वाट पाही अशी दे जाग स्वप्नांना जाणीवा गोठल्या माझ्या नवा दे घाव वेदनांना माझी कविता ..मयुरेश साने..24-July-10
काव्यरस

बकुळीची फुले..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/12/2010 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
बकुळीची फ़ुले.. भर दुपारी , मालू अंगाणात पडलेल्या वाळलेल्या काटक्या गोळा करत होती. उद्या सकाळी बंबाला जळण तरी होईल! काठ्या वेचता वेचता ती अंगणात एका बाजूला गंभिरपणे उभ्या असलेल्या बकुळीच्या झाडापाशी आली. नकळतच तीने वर पाहिले.. बकुळ! ...... ************ "आऽऽऽऽई!! हे बघ... कित्ती फ़ुलं आली आहेत बकुळीला. उद्या आई याचा लांबच्या लांब गजरा कर मी शाळेत घालून जाईन. तुला माहितीये का.. अगं.. वर्गात एकीच्या जरी केसांत बकुळीची वेणी असेल ना.. तर दिवसभार घमघमाट असतो !! आणि ना...." जाई अखंड बडबडीत होती आणि मालू तिच्याकडे कौतुकाने पाहता पाहता तिच्यासाठी ताट वाढत होती. जाई ७ वीत होती.

शिरगाव ची मुले बी बी सी वाहीणी वर

लेखक शनआत्तार यांनी बुधवार, 01/12/2010 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , आमच्या शिरगाव हायस्कूल शिरगाव मधिल मुलांना संगणक शिक्षण मागील काही वर्षा पासून देण्यात येत आहे. गेल्या वर्षा पासून इंग्लंड मधिल न्यु कसल विद्यापीठा मार्फत सोल नावाचा प्रकल्प सुरू कर्ण्यात आला आहे. या प्रकल्पात विद्यार्थ्याना परदेशातील शिक्षकांकडून शिकवले जाते असा हा भारतातील ८ वा तर महाराष्ट्रातील १ ला प्रकल्प आहे. यात आमच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत ची ६०० मुले शिक्षण घेत आहेत. आमच्या शाळेतील मुलांनां दिल्या जाणा-या शिक्षणाची दखल बी बी सी या दुरदर्शन वाहीनीने घेतली. आणी आमच्या या मुलांनी माहीती तंत्रज्ञानाचा वापर करून घेत असलेले शिक्षण चित्रीत केले.

.

लेखक प्रियाली यांनी बुधवार, 01/12/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
.

हिरवा माज

लेखक विकास यांनी बुधवार, 01/12/2010 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चेच्या शिर्षकावरून असे सहज वाटू शकेल की ह्याचा संदर्भ अनिभा (अनिवासी भारतीय अथवा त्याहूनही अधिक अमेरिका निवासी भारतीय) असलेल्या व्यक्तींशी आहे म्हणून. पण तसा तो नाही तसेच तो कुठल्या धर्माशी संबंधीतही नाही. तर "हिरवा" रंग ज्याच्याशी समांतर मानला जातो त्या पर्यावरणाशी आणि त्यात काम करणार्‍या भारतातील पर्यावरणवादी संस्थांशी आहे. आज हिंदूस्थान टाईम्स मधील "CAG sniffs scam in NGO funding" बातमी वाचली.

..

लेखक प्रियाली यांनी बुधवार, 01/12/2010 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
..

आई...मिटलेला श्वास - ११

लेखक गणेशा यांनी बुधवार, 01/12/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
आई...मिटलेला श्वास -१० अंधारयुगी हरविलेले अंधुक संकेतचिन्हे घंटेच्या निनादात विखुरलेले शब्दथवे भग्न शिवालय अंधार्‍या कपारी सांध्यसंध्या उभी एकटीच दूरवरी मनभृंग पोखरे विचारांच्या भिंती छ्प्पर हरविलेले घरटे विराण रडती अंतरीचे दाटता धुके भासांची स्मरणे मागे दग्ध भाव निर्मिते मायेचे सोवळे धागे -------- शब्दमेघ
काव्यरस

लेखन स्पर्धा २०१०

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 01/12/2010 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली काही वर्षे मराठी आंतरजालाची उत्तरोत्तर प्रगती होते आहे. मराठी ब्लॉग्स, मीमराठी.नेट सारख्या मराठी सोशल नेटवर्किंग संस्थळावर अनेक मराठी जालकर नियमित लेखन करीत असतात. अनेक उत्तम ब्लॉग लेखक, लेखक मराठी आंतरजालावर प्रसिद्ध झाले आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा याबाबतची माहिती आवश्यक त्या वेगाने सर्व जालकरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे विविध सोशल नेटवर्किंग संस्थळांवर लिहिणारे जालकर अनेक उत्तम ब्लॉग्सबाबत अनभिज्ञ असतात, तर बहुतेक ब्लॉगर हे अशा सोशल नेटवर्किंग संस्थळावर फारसे दखलपात्र लेखन न होता ते निव्वळ वेळ घालवण्याचे कट्टे असतात असे समजतात.

३३ कोटी देव........

लेखक स्पा यांनी बुधवार, 01/12/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
असे म्हणतात, किंवा मानले जाते कि हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत..... इतके देव? एका देशाची लोकसंख्या एवढी होऊ शकते... मला एवढीच माहिती हवी आहे कि आपल्याला जास्तीत जास्त २५ ते ५० देवांची नावे माहित आहेत ... मग बाकीच्या देवांचं काय? कुठल्या ग्रंथात याचा उल्लेख आढळतो काय?