Skip to main content

सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे.

लेखक नीलकांत यांनी रविवार, 05/12/2010 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे. सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो.

तुला आपलेसे करावे किती ?...

लेखक मयुरेश साने यांनी रविवार, 05/12/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
तुला आपलेसे करावे किती ? जगावे किती ? मी ! मरावे किती ? किनाराच मी ! भरती ओहटिचा बुडावे किती ? मी ! तरावे किती ? तू जवळून जाता ! मनी बाग फुलते तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ? तुझी याद येते ! तसा तोल जातो सावरून मी ! वावरावे किती ? ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले लिलावात माझ्या ! हरावे किती ? चांदणे सारखे आज जाळू पहाते तुझे आज नसणे स्मरावे किती ? मिठी दे युगांची ! धुके दूर सारु फुलांनीच दव पांघरावे किती ? तुला "मी "- मला "तू" - मला "तू" - तूला "मी" परक्या परी -हे झुरावे किती ? मयुरेश साने...दि.०५-डिसेंबर-१०
काव्यरस

बासुंदी......मदत हवी आहे...

लेखक मृगजळ यांनी रविवार, 05/12/2010 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागील आठवड्यात बासुंदी करायचे ठरवले...कृती माहित नसल्याने तयार बासुंदी मिक्स वापरले...पण म्हणावी तशी टेस्टी नाही झाली बासुंदी...जर कुणी मिपाकर खवा बासुंदीची कृती जाणत असेल तर ...कृपया मदत करावी...

माझ्या देशात राहणाऱ्या बाबास ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 05/12/2010 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षे झाली मी इथे परदेशात येऊन बसलो आहे बाबा देश सोडून येण इतकं सोपं असतं का बाबा ?-- आपल्या मातीचा वास आपल्या घराचा सहवास गणपतीची आरास हनुमानजयंतीला भल्या पाहटे उठून केलेली आरती नि ते गुळखोबरे …..
काव्यरस

मरण्यात अर्थ नाही

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 05/12/2010 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मरण्यात अर्थ नाही . संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही गंगाधर मुटे .....................................................
काव्यरस

सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 05/12/2010 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
वो तो है अलबेला । हजारों में अकेला ।।
सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा।
हिऱ्याला पत्थर समजून दुर्लक्ष केले। ... बांसरीला लाकडाची पुंगळी समजून विर्भत्सले। ... ज्योतीला न पहाता वातीला पाहून हिणवले। ... गायकाच्या सुरेल तानेला - वा वाह तर म्हणाल,... नृत्याच्या लचकदार आदाकारीला ठेका तरी धराल,...

श्रीदिपलक्ष्मी दिवाळी २०१०

लेखक सरपंच यांनी शनिवार, 04/12/2010 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, श्री दिपलक्ष्मी दिवाळी अंकाची आंतरजालावरील आवृत्ती मिसळपाववरून सर्वप्रथम उपलब्ध करून देताना मिसळपाव परिवाराला आनंद होतो आहे. या अंकाची मृद्रीत आवृत्ती मराठी साहित्य जगतात प्रसिध्दच आहे मात्र आता हा अंक सर्वत्र पोहोचायला सहज होईल. खाली दिलेल्या दूव्यावर टिचकी मारून हा अंक उतरवून (डाऊनलोड) घेता येईल.

नमस्कार मंडळी...

लेखक मृगजळ यांनी शनिवार, 04/12/2010 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
तशी मिसळ पाव म्हणजे लहानपणा पासूनच माझा जीव कि प्राण...एन्जिनिएरिग नंतर पुण्यात आलो नोकरी साठी. मग काय "काटा-किर्र" , "नेवाळे मिसळ " यांच्या कडे जाने सुरु झाले...